पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेला तरुण आणि तरुणीच्या पालकांना विशेष बाब म्हणून देण्यात आलेल्या १० लाखांचा धनादेश त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आला. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला कोर्टाने जामीन मंजूर केला असला तरीही या प्रकरणातील दोषींवर कारवाई करणारच असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी या मुलांच्या …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले “सिबील स्कोअर’ ची सक्ती बँकाना करता येणार नाही राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत वार्षिक पत आराखडा सादर
शेती हे महाराष्ट्राचं बलस्थान आहे. म्हणून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. बँकानीही शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात पाठबळ दिले पाहिजे. अल्प, अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकानी हात आखडता घेऊ नये असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या १६३व्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलताना म्हणाले की, पीक …
Read More »भंडारा जिल्ह्यातील ५४७ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन जल पर्यटनच्या वाढीव विकास आराखड्यास मंजुरी देणार
राज्य शासन सर्व सामान्यांचे व शेतकऱ्यांचे सरकार असून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंर्तगत केंद्र सरकारकडून सहा हजार व राज्य सरकारकडून सहा असे बारा हजार रुपये, सानुग्रह अनुदान व धानाला सातशे रुपये बोनस देणारे हे पहिले सरकार आहे. आता ५४७ कोटी रुपये खर्च करून भंडारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार आहे. …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, … मागासवर्गीयांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न माणगाव येथे राजर्षी शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त स्मारक उभारणार
स्वराज्याबरोबर सुराज्य निर्माण करणे तसेच रयतेचे राज्य आणण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे काम पुढे अविरत सुरू ठेवलं. राज्य शासन हाच विचार पुढे घेऊन जात असून समता, बंधुता, न्याय या तत्वाद्वारे मागासवर्गीय घटकांना विकासाच्या मुख्य …
Read More »राज्य सरकारचा अजब कारभार “हातचे सोडून, पळत्याच्या मागे” मान्यता दिलेले प्रकल्प सोडून घोषणेत असलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न
साधारणतः अडीच वर्षापूर्वी आमची नैसर्गिक युती आणि राज्याला विकासाच्या मार्गाने न्यायचा असल्याच्या घोषणा देत भाजपाच्या मदतीने सत्तेवर आलेल्या शिवसेना शिंदे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले. याच सरकारने राज्याला विकासा मार्गावर न्यायचे म्हणून अनेक वर्षापासून मागणी होत असलेल्या रेल्वे मार्गाला मान्यता दिली. त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली. …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन, केवळ फोटोपुरते योग न करता… रोज करा योग, नियमित रहा निरोग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला जगभर प्रसिद्धी मिळवून दिली. त्यातूनच २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा केला जात आहे. केवळ फोटोपुरते योग न करता योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक मानून रोज योग करून निरोग राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गेट वे ऑफ इंडिया येथे मुंबई …
Read More »रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महामंडळाची भेट विम्याचे संरक्षण, कुटूंबियांना मोफत उपचार, ग्रॅज्युईटी आणि मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणार
शहरातील रिक्षा आणि टॅक्सी चालवून प्रतिदिनी हातावर पोट असलेल्या लोकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आज शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांच्या पुढाकाराने भेटीसाठी आलेल्या रिक्षा टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी या महामंडळाच्या अंतर्गत मिळणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली. यावेळी राज्याचे एमएसआरडीसी मंत्री दादाजी …
Read More »तुकाराम मुंढे यांच्याकडे आता असंघटीत कामगारः वर्षभरात पुन्हा बदली राज्यातील सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
मागील काही वर्षापासून सततच्या बदल्यांमुळे चर्चेत असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची मंगळवारी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाच्या सचिव पदावरून बदली करण्यात आली. वर्षभरात बदली झालेले तुकाराम मुंढे यांना असंघटित कामगार विभागाच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे. राज्याच्या कुटुंब कल्याण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त म्हणून अमगोथु श्री रंगा नायक यांची …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, उबाठा पेक्षा आपला स्ट्राईक रेट चांगला शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीसाठी पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
१९ जून रोजी पार पडणाऱ्या शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनाच्या तयारीच्या अनुषंगाने आज पक्षाचे सर्व नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज मुंबईत पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीचा सविस्तर लेखाजोखा मांडला. या निवडणुकीत आपण संभाजीनगर, कोकण, ठाणे पालघर हे सेनेचे सर्व बालेकिल्ले …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला अपघातग्रस्तांना मदतीचा हात विक्रोळीजवळील अपघातग्रस्तांना ताफ्यातील गाडी देऊन गोदरेज रुग्णालयात केले दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला असून रस्त्यावर अपघातग्रस्तासाठी ते देवदूत ठरले. काल रात्री दीड वाजता पूर्व द्रुतगती महामार्गावरून ठाण्यातील आपल्या घराकडे परतत असताना विक्रोळीनजीक दोन दुचाकीस्वारांचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी तत्काळ गाडी थांबवून या अपघातग्रस्त नागरिकांची चौकशी करून त्यांना मदतीचा हात दिला. …
Read More »
Marathi e-Batmya