Tag Archives: रमेश चेन्नीथला

रमेश चेन्नीथला यांची मागणी, डॉ आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या अमित शाहची हकालपट्टी करा महापुरुषांचा अपमान करण्याची आरएसएस भाजपाची विकृती

भारतीय जनता पक्ष व त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या मनात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रचंड राग आहे. भाजपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कधीच आदर नव्हता आणि आजही नाही. महापुरुषांचा अपमान करण्याची आरएसएस भाजपाची विकृती असून त्याच विकृतीतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधान निर्मात्यांचा घोर अपमान केला आहे. …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा एका दिवसात तब्बल ९ लाख ९९ हजार ३५९ मतांची वाढ कशी झाली?

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीतील महाघोटाळा दिसत असल्याने जनभावना अत्यंत तीव्र झाल्या आहेत. मतांमधील ७.८३ टक्के वाढीवर अनेक स्तरातून शंका उपस्थित केल्या जात आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतांची आकडेवारी पाहता मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजल्यानंतर मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या पाहिजेत. राज्यातील किती मतदारसंघावर संध्याकाळी ५ नंतर मतदारांच्या …

Read More »

रमेश चेन्नीथला याचा विश्वास, काँग्रेस महाविकास आघाडी स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन करेल मुख्यमंत्रीपदावरून कोणताही वाद नाही; निकालानंतर चर्चा करुन निर्णय घेऊ

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळेल व स्पष्ट बहुमतासह काँग्रेस महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे. टिळक भवनमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्रातील जनता काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे …

Read More »

रमेश चेन्नीथला यांचा आरोप, महायुती जनमत विकत घेतेय, विनोद तावडेंना तात्काळ अट करा पराभवाच्या भितीने भाजपाकडून राज्यभरात पैसे वाटून मते विकत घेण्याचा प्रयत्न

भारतीय जनता पक्ष आणि महायुती पराभवाच्या भितीने मोठ्‌या प्रमाणात पैसा आणि सत्तेचा गैरवापर करत असून भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना वसई विरार मध्ये मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडले आहे. विनोद तावडे यांनी पाच कोटी रुपये वाटल्याचे आरोप केले जात आहेत त्यामुळे तावडे यांना तात्काळ अटक केली पाहिजे अशी मागणी …

Read More »

रमेश चेन्नीथला यांचा आरोप, सत्ताधा-याकडूंन पोलीस यंत्रणेचा गैरवापर… पोलीस दलाच्या माध्यमातून रसद पुरवून मतदारांना प्रभावीत करण्याचा प्रयत्न सुरु

२० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीचा प्रचार आज संपत आहे. पण पराभव समोर दिसत असल्याने सत्ताधारी पक्षांकडून सत्ता, यंत्रणा आणि पैशाचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरु असल्याच्या तक्रारी काँग्रेस पक्षाकडे येत आहेत. यात सर्वात जास्त पोलीस दलाचा वापर केला जात आहे. अत्यंत निष्पक्ष निवडणुका आणि लोकशाहीसाठी …

Read More »

रमेश चेन्नीथला यांची खोचक टीका, पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवा संपली… राहुल गांधींच्या उद्या चिमूर व धामणगाव रेल्वे येथे सभा तर प्रियंका गांधींच्या शिर्डी व कोल्हापुरात सभा, १७ तारखेला प्रियंका गांधी गडचिरोली व नागपूरात.

काँग्रेस अनुसूचित जाती व अनुसुचित जमातींचे आरक्षण संपवणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत खोटा व जनतेची दिशाभूल करणारा आहे. काँग्रेस पक्षानेच देशाला संविधान व आरक्षण देऊन मागास जातींना हक्क व अधिकार दिले व वर्षानुवर्षे मनुवाद्यांनी केलेल्या अत्याचारातून त्यांची सुटका केली. आरक्षण व संविधान संपवण्याचे प्रयत्न तर नरेंद्र मोदींचा भारतीय …

Read More »

काँग्रेसचे १६ बंडखोर उमेदवारांना ६ वर्षासाठी काँग्रेस पक्षातून निलंबित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कारवाई

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार तसेच काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी केलेल्या १६ जणांना काँग्रेस पक्षातून ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या आदेशावरून काव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने ही कारवाई करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी ही माहिती दिली आहे. …

Read More »

रमेश चेन्नीथला यांची माहिती, काँग्रेसच्या प्रचाराला खर्गे, राहुल-प्रियंका गांधी यांच्या सभा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंच्या प्रमुख उपस्थितीत १० नोव्हेंबरला महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार

वांद्रे-कुर्ला संकुलातील महाराष्ट्र स्वाभिमान सभेतून लोकसेवेची पंचसूत्री जाहीर करून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या झंझावाती प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लेकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह काँग्रेस …

Read More »

रमेश चेन्नीथला यांचा आरोप, जनतेचे दिवाळे काढून शिंदे भाजपाची दिवाळी माजी मंत्री अनिस अहमद यांचा वंचितमधून काँग्रेस पक्षात प्रवेश

भाजपा शिंदे अजित पवारांच्या शेतकरी विरोधी आणि केंद्राच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे राज्यातील शेतकरी उद्धवस्त झाले आहेत. एकीकडे महागाई प्रचंड वाढली असून सोयाबीन, कापूस आणि कांदा या शेतीमालाला रास्त भावही मिळत नाही. शेतकरी, कष्टकरी, गृहिणी यांचे दिवाळं काढून शिंदे भाजपाची दिवाळी सुरु आहे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश …

Read More »

रमेश चेन्नीथला यांचा विश्वास, मविआमध्ये कोणतेही वाद नाहीत मैत्रिपूर्ण लढत नाही महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपायुतीचा दावा फसवा व खोटा; प्रगती महाराष्ट्राची नाही तर युतीतील धोकेबाजांची-नाना पटोले

महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कोणताही वाद राहिलेला नाही. ज्या मतदारसंघात मित्रपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत ते दोन दिवसात चर्चा करुन मागे घेतले जातील. समाजवादी पक्षाशी सुद्धा चर्चा सुरु असून त्यावरही लवकरच निर्णय होईल. महाविकास आघाडीत कोणतीही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त करत भाजपा युतीत मात्र जागावाटपावरून प्रचंड …

Read More »