Tag Archives: राज्य निवडणूक आयोग

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडून महापालिका निवडणूकीची घोषणा राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान व १६ जानेवारीला मतमोजणी

बृहन्मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान; तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसह एकूण २ हजार ८६९ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, अद्ययावत मतदार याद्या प्रसिद्ध करा मुंबईच्या मतदार याद्यांतील त्रुटी दूर करण्याची केली मागणी

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होत आहेत. परंतु मतदारयाद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहेत. या मतदार याद्यांमध्ये दुबार मतदारांची संख्या तब्बल ११ लाख असून दुबार नावे असलेल्या मतदारांना शपथपत्र द्यावे लागणार आहे. हा मतदारांना नाहक त्रास असून यामुळे मतदानासाठी मोठ्या रांगा लागतील हे सर्व टाळून मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी मतदार याद्यातील …

Read More »

स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या बातम्यांमध्ये भारत निवडणूक आयोगाचे’ चिन्ह वापरू नका मुख्य निवडणूक अधिकारी यांची प्रसार माध्यमांना सूचना

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत प्रसारमाध्यमांकडून दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये भारत निवडणूक आयोगाशी संबंधित चिन्हे, इमारतींची दृश्ये किंवा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या छायाचित्रांचा वापर केल्याचे काही प्रकरणे दिसून आली आहेत. यातील संभ्रम दूर करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी प्रसारमाध्यमांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले की, संसदीय, …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा नगर पंचायतीचे मतदान संपल्यानंतर १७ ईव्हीएम मशीनचे सील तोडून पुन्हा मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पण अद्याप एफआयआरही दाखल केलेला नाही. हे सर्व प्रकार लोकशाहीचे वस्त्रहरण करणारे आहे, असा गंभीर …

Read More »

राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय, प्रचारकांच्या संख्येत केली वाढ प्रमुख प्रचारकांची संख्या आता २० ऐवजी ४०

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांच्या (Star Campaigner) संख्येची मर्यादा आता राज्य निवडणूक आयोगाने २० वरून ४० केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी असलेली प्रमुख प्रचारकांची मर्यादा वाढवून ४० करण्यात यावी, अशी मागणी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आयोगाच्या कार्यालयात १४ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत …

Read More »

आचारसंहितेसंदर्भातील प्रस्तावांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पाठवला प्रस्ताव

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कालावधीत आचारसंहितेतून सूट देण्यासाठी प्राप्त प्रस्तावांची छाननी करण्याकरिता लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या वेळी स्थापन करण्यात येणाऱ्या समितीच्या धर्तीवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली १६ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोगाच्या कार्यालयात …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’ सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाचे काम, आता जनताच धडा शिकवेल

मतदारयाद्यांमध्ये प्रचंड घोळ असताना त्या दुरुस्त न करता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर करणे हे योग्य नाही. निवडणूक आयोग दुबार तिबार मतदारांच्या नावासमोर ‘स्टार’ करणार हे सांगत असले तरी ती नावे वगळून मतदार याद्या निर्दोष का करत नाही? याचे उत्तर मात्र ते देत नाहीत. आयोगाचा हा कारभारच ‘दस नंबरी’ असून …

Read More »

सर्वपक्षीय शिष्टमंडळाची मागणी, मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करा, मगच निवडणुका घ्या मुख्य निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यांना भेटून केली मागणी

२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झाला होता. याच चुकीच्या याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तशाच वापरल्या जाणार असतील तर निवडणुका पारदर्शक होणार नाही. त्यामुळे सदोष मतदार याद्यांची तपासणी करून त्या दुरुस्त करा. दुरुस्त झालेल्या मतदार यादीवरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यावा अशी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज …

Read More »

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी संकेतस्थळ राज्य निवडणूक आयोगाने दिली माहिती

राज्यातील जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या आणि नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, या यादीतील नावे https://mahasecvoterlist.in/ या संकेतस्थळावर शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला तंबी, ३१ जानेवारी निवडणूका घ्या राज्य सरकारने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काढला गळा

सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणी दरम्यान ४ महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा राज्य सरकार अर्थात राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज करत ४ महिन्यात निवडणूका घेण्याऐवजी जानेवारी २०२६ पर्यंत निवडणूका घेण्याची परवानगी द्यावी यासाठी अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य …

Read More »