नुकतेच मुंबई महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने रिपाईचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीबाबत जागा वाटपाच्या संदर्भात नाराजी व्यक्त करत भाजपाकडे किमान १६ जागा मागितल्या. परंतु भाजपाचे विधान परिषदेतील गटनेते प्रविण दरेकर यांनी रामदास आठवले यांची नाराजी दूर करणार असल्याचे जाहिर केले. मात्र आज रामदास आठवले यांनी त्यांच्या पक्षाच्यावतीने ३९ …
Read More »रामदास आठवले यांची मागणी, महायुतीने रिपब्लिकन पक्षाला किमान १६ जागा सोडाव्या जागा वाटपातील चर्चेत झालेली रिपब्लिकन पक्षाची नाराजी मुख्यमंत्र्याकडे आठवले मांडणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने रिपब्लिकन पक्षाला किमान १६ जागा सोडाव्यात. महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाला सन्मानाने बोलाविले नाही आणि चर्चेत सहभागी करुन घेतले नाही. त्याबद्दल रिपब्लिकन कार्यकर्त्यामध्ये तीव्र नाराजी आहे. ही नाराजी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून उद्या मांडणार आहोत. अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसापुर्वी रिपब्लिकन पक्षाला महायुतीकडुन …
Read More »रामदास आठवले यांची माहिती, रिपब्लिकन पक्षाला नगरपालिका निवडणुकीत राज्यभरात घवघवीत यश वर्धा ; सोलापूर; सातारा; रायगड; यवतमाळ; कोल्हापूर आदी जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विजयी
राज्यात नगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला राज्यभरात घवघवीत यश प्राप्त झाले आहे. कोल्हापुरातील हुपरी नगराध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाचे मंगलाराव माळगे हे बहुमताने विजयी झाले आहेत. हुपरी मध्ये शीतल कांबळे; पन्हाळा नगर परिषद मध्ये प्रतीक्षा योगेश वराळे; आजरा नगर परिषद मध्ये कलावती कांबळे हे रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक निवडून आले आहेत. सातारा जिल्ह्यात प्रतीक …
Read More »रामदास आठवले यांचे निर्देश, महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी उत्तम दर्जाच्या सुविधा पुरवा ६९ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त आयोजित बैठकीत दिले निर्देश
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे देशभरातून लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. या अनुयायांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अधिकाऱ्यांना दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीबाबत केंद्रीय …
Read More »रामदास आठवले यांचे आश्वासन, पुरग्रस्तांना अधिकची मदतीसाठी विशेष पॅकेज मिळवून देणार पूरग्रस्तांसाठीही केली कविता
आसमानी संकट कोसळून मराठवाड्यातील शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे. शेतपिकांचे नुकसान झाल्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्यासाठी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे थेट शेताच्या बांधावर पोहोचले. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार …
Read More »महाबोधी महाविहारप्रकरणी राज्यमंत्री रामदास आठवले भेटले पंतप्रधान मोदींना बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या देण्याची केली मागणी
महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांना बुद्धगया येथील महाबोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली त्या परमपवित्र स्थळी महाबोधी महाविहार उभारण्यात आले आहे.जगभरातील बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान बुद्धगया येथील महाबोधी महाविहार आहे.त्याची विश्वस्त व्यवस्था ही १९४९ च्या बी टी ऍक्ट नुसार चालते त्यात ४ बौद्ध आणि ४ हिंदू ट्रस्टी असून कलेक्टर चेअरमन असतो.त्यात बदल करून …
Read More »महाबोधी महाविहार ताब्यात देण्याच्या मागणीसाठी रामदास आठवले बिहारच्या राज्यपालांकडे मागणीसाठी घेतली बिहारच्या राज्यपालांची भेट
महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे यासाठी महाबोधी टेम्पल ऍक्ट १९४९ रद्द करावा या मागणीसाठी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बिहारचे राज्यपाल महामहीम मोहम्मद आरिफ खान यांची पटना येथील राजभवन येथे भेट घेतली. या भेटीवेळी रामदास आठवले म्हणाले की, बुद्धगया मधील महाबोधी महाविहार हे …
Read More »रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर संजय मल्होत्रा यांची केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सदिच्छा भेट डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतुनच रिझर्व्ह बँके ची स्थापना - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या द प्रोब्लम ऑफ रुपी या प्रबंधावर आधारित रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतुनच रिझर्व्ह बँकेची निर्मिती झाल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर संजय मल्होत्रा यांची आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले …
Read More »रामदास आठवले यांचा आरोप, विकास बनसोडे बौध्द युवकाची हत्या ऑनरकिलिंगमधूनच खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी
बीड जिल्हातील आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी या गावात ट्रक चालक म्हणुन काम करणाऱ्या बौध्द युवक विकास बनसोडे यांची प्रेम प्रकरणाच्या संशयावरून अत्यंत निर्घुण हत्या करण्यात आली. दोन दिवस घरात डांबुन ठेवून बेदम मारहाण करुन क्रूरपणे आकाश बनसोडेची हत्या करण्यात आली. या निर्घुण हत्येचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करीत …
Read More »रामदास आठवले यांचा टोला, झटक्याने करा अगर पटक्याने करा, मटण खायला मिळायला पाहिजे मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून आठवलेंनी लगावला टोला
देशातील इतर भाजपा शासित राज्यात वापरण्यात आलेल्या मुद्यांची कॉपी करत महाराष्ट्रातही धार्मिक आणि सामाजिक वातावरण तापविण्याचा प्रयत्न भाजपाकडून मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यातच मंत्री नितेश राणे यांनी झटका आणि हलाल मटणाच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. मंत्री नितेश राणे यांच्या भूमिकेचा अनेकांनी विरोध …
Read More »
Marathi e-Batmya