Tag Archives: राष्ट्रवादी काँग्रेस

अजित पवार अर्थात दादा पर्वाचा अस्त…..विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार पार्थ आणि जय पवार यांच्या हस्ते पार्थिवाला मुखाग्नी, अमित शाह, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह अर्ध्याहून अधिक मंत्रिमंडळ

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थात महाराष्ट्रातील जनतेचे दादा यांचे काल विमान बारामती विमानतळावर उतरताना क्रॅश होऊन अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या चारही जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यातील अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराला केंद्रीय गृहमंत्री …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, भाजपा व राष्ट्रवादी सत्तेत राहुन एकमेकावर आरोप कसले करतात? सांस्कृतिक शहर, विद्यचे माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख आता ड्रग्ज; गुंडगिरी व कोयता गँगचे माहेरघर

राज्यात भाजपा, शिंदेसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ट्रिपल इंजिन सरकार आहे. तिन्ही पक्ष फक्त सत्तेची मलई खाण्यासाठी एकत्र आहेत. सत्तेत राहून अजित पवार भाजपावर व भाजपा अजित पवारांवर जाहीर व गंभीर आरोप करत आहेत. या दोन्ही पक्षांना आरोपच करायचे असतील तर सत्तेला चिकटून कशाला बसता, सत्तेतून बाहेर …

Read More »

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ९४ उमेदवार मुंबई पालिका निवडणूकीत ९४ उमेदवारांमध्ये ५२ लाडक्या बहिणी निवडणूक रिंगणात नशीब आजमावणार ;लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी

मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज ३० उमेदवारांची तिसरी आणि अंतिम यादी जाहीर केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईमध्ये एकूण ९४ जागांवर उमेदवार उभे केले असून पूर्ण ताकदीने व क्षमतेने यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक रिंगणात उतरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज तिसरी व अंतिम उमेदवार …

Read More »

जयंत पाटील यांनी मुद्दा उपस्थित करताच तटकरेंच्या मदतीला धावले एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांची योजना कधीच बंद होणार नसल्याची सारवासारव

नागपूरातील हिवाळी अधिवेशनात आज राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेसंदर्भातील मुद्दा उपस्थित करत म्हणाले की, लाडकी बहिण योजना आता सरकारला झेपत नसल्यानेच आता लाभार्थ्यांचे व्हेरिफिकेशन सुरु केले आहे. तसेच केवायसी करणे आदी नियमांची शोधाशोध तुम्ही सरकारने सुरु केली आहे. आता आऊट ऑफ कंट्रोल होत असल्यानेच सरकारने या गोष्टी …

Read More »

मुंबई, देवळाली, अहिल्यानगर, पिंपरीतील कार्यकर्त्यांच्या शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश उबाठा गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विविध पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबईतील वाकोला प्रभाग क्रमांक ९१ चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक सगुण नाईक त्यांची कन्या युवासेना कॉलेज कक्ष प्रमुख नमिता नाईक यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. तसेच उबाठा गटाचे दहिसर शाखा क्रमांक ७ चे शाखाप्रमुख अक्षय राऊत आणि युवासेना दहिसर विधानसभा चिटणीस नरेंद्र …

Read More »

सचिन सावंत यांची मागणी, काँग्रेसची जागा परस्पर आरबीआयला विकण्याचे रद्द करा काँग्रेस पक्षाला नरीमन पाईंट या जागीच नवीन कार्यालय बांधून देण्याचे आश्वासन पूर्ण करा अन्यथा न्यायालयात दाद मागू.

काँग्रेस पक्षासह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच जागी काँग्रेस पक्षासह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात ठेवून मेट्रो कार्पोरेशने ही जागा परस्पर रिझर्व्ह बँक …

Read More »

अजित पवार यांचा धर्मनिरपेक्षतेचा नारा, तर खासदार सुनेत्रा पवार रा.स्व.संघाच्या कार्यक्रमाला हजेरी कंगणा राणौत यांनी दिली माहिती, प्रश्न विचारताच अजित पवारांनी पत्रकारांसमोर जोडले हात

साधारणतः काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत आणि त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने आमची विचारधारा फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा असून आम्ही धर्मनिरपेक्षतेचे राजकारण करत असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या व्यासपीठावरून सातत्याने मांडली. परंतु त्यांच्याच पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी संसद अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत असून त्यांनी चक्क राष्ट्रीय …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, बंच ऑफ थॉटला अभिप्रेत असा जनसुरक्षा कायदा जनसुरक्षा कायद्याविरोधात काँग्रेसने राज्यभर आंदोलन करून होळी केली

देवेंद्र फडणवीस यांनी जनसुरक्षा नावाने आणलेला कायदा हा लोकशाही असुरक्षा कायदा आहे. महाराष्ट्राच्या या चिप मिनिस्टरला आता दिल्लीत जाऊन पंतप्रधान बनण्याचे स्वप्न दिवसाढवळ्या पडू लागले आहे आणि त्यासाठीच गोलवकर यांच्या बंच ऑफ थॉटला अभिप्रेत भारत करण्यासाठी फडणवीस यांच्याकडून हा सर्व खटाटोप केलेला आहे, असा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला …

Read More »

उदय सामंत यांचे आश्वासन, ट्रान्झिट कॅम्पमधील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी कायदा करणार विधान परिषदेतील लक्षवेधीला उत्तर देताना दिली माहिती

मुंबईमध्ये अनेक चाळी आणि वसाहतींचा पुनर्विकास होत आहे. या पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये ठेवण्यात येते. या ट्रान्झिट कॅम्पचे भाडे तसेच प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याबाबत लवकरच कायदा करणार, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य शशिकांत शिंदे यांनी ताडवाडी येथील बीआयटी इमारतीच्या पुनर्वसन प्रकल्पाबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला …

Read More »

विरोधी पक्षनेते पदावरुन विधानसभेत विरोधकांचा सभात्याग प्रश्नोत्तराच्या तास सुरु होण्याआधीच भास्कर जाधव यांच्याकडून बोलायला सुरुवात

पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होऊन आज दुसरा दिवस सुरु झाला. सकाळी प्रश्नोत्तराचा तासाची घोषणा करताच शिवसेना उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्याच्या विधिमंडळात महाराष्ट्राचे सुपुत्र तथा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई हे येत आहे. त्या पार्श्वभूमीवर सांसदीय लोकशाही राबविणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेत सरकार आहे पण विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावरील …

Read More »