एसटी कामगारांची सुरक्षितता, प्रगती व्हावी त्याअनुषंगाने शासनातर्फे लक्ष देत वेळोवेळी निर्णय घेतले जातील. बँकेच्या संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे व चुकीच्या निर्णयामुळे बँकेचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अशा घटना होणार नाहीत याबाबत खबरदारी घेऊन सहकार आयुक्तांना सूचना केल्या असून पुढील कार्यवाही सुरु आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर दोन महिन्यांत चौकशी …
Read More »कपिल पाटील यांचा इशारा: मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष, प्रश्न सुटणार नाही
बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही तत्काळ जातनिहाय गणना जाहीर करा आणि राज्यातील जातीय विवाद थांबवून आरक्षणाचा गुंता सोडवा अशी मागणी जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव तथा आमदार कपिल पाटील यांनी केली. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पत्रही लिहिले. गुरुवारी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी …
Read More »महाराष्ट्र विधान परिषदेचा शतक महोत्सवः आजी-माजी सदस्यांचा स्नेह मेळावा
महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विधान परिषदेच्या आजी- माजी सदस्यांसाठी स्नेहमेळावा आणि परिसंवादाचे बुधवार ८ नोव्हेंबर २०२३ सकाळी ११.१५ वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ही माहिती दिली. संसदीय लोकशाहीत द्विसभागृह व्यवस्थेत महाराष्ट्र विधान परिषदेने उल्लेखनीय योगदान दिले आहे. …
Read More »त्या तीन आमदारांवरील कारवाईसाठी ठाकरे गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात? विधान परिषदेतील तीन आमदारांवरील कारवाईसाठी आग्रही
शिवसेना आमदारांच्या अपात्र आमदारांवरील कारवाई संदर्भातील सुनावणी लवकरच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कारवाई उशीराने का होईना जलद गतीने होताना दिसत आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे राज्याच लक्ष लागलं आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषदेच्या तीन आमदारांच्या बाबत निर्णय कधी होणार हा सवाल …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा सवाल, औरंगजेब इथल्याचा आदर्श कसा? निवडणूका आम्हालाही हव्यात पण… बारसू प्रकल्प पाकिस्तानात गेला
मागील काही दिवसांमध्ये औरंगजेब याच्या स्टेटसवरून दंगली घडल्या जात होत्या. याबाबत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करताना म्हणाले, औरंगजेब हा तुर्की मंगोल वंशाचा होता. तो इथल्या मुस्लिमांचा आदर्श कसा असू शकतो असे सांगत राज्याला अस्थिर करण्यासाठी हा प्रयत्न झाला होता. पण, कुणी औरंगजेबाचं महिमा मंडन करणार …
Read More »अहमदनगर जिल्ह्यातील एमआयडीसीबाबत तीन महिन्यांत निर्णय घेणार उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित ‘एमआयडीसी’ सुरू करण्यासाठी पाण्याची उपलब्धता, सलग क्षेत्र, वन्यजीव संरक्षण क्षेत्र, इको सेन्सेटिव्ह झोन आदी तांत्रिक बाबी तपासून येत्या तीन महिन्यांत निर्णय घेण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य राम शिंदे यांनी एमआयडीसी मंजुरीबाबत सद्य:स्थिती काय आहे या अनुषंगाने नियम ९७ …
Read More »नीलम गोऱ्हे यांना उपसभापती म्हणून…देवेंद्र फडणवीस म्हणाले, तो नियम लागू होत नाही उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणता येणार नसल्याची स्पष्टोक्ती
शिवसेना ठाकरे गटात असलेल्या विधान परिषदेच्या आमदार तथा उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नुकताच शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. त्यावरून विरोधकांनी उपसभापती हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे अशा पदावर असलेल्या व्यक्तीने राजकिय पक्षात प्रवेश करू नये या मुद्यावरून काल विधान परिषदेत मुद्दा उपस्थित केला. तसेच आजही याविषयीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. …
Read More »किरीट सोमय्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी केली सखोल चौकशीची घोषणा अंबादास दानवे, अनिल परब यांच्या मागणीनुसार सखोल चौकशी करण्याचे दिले आश्वासन
ईडी सारख्या तपास यंत्रणांचा धाक दाखवित आणि भाजपा पक्ष संघटनेत आणि विधान परिषद, राज्यसभा आदी ठिकाणी पद देण्याचे आमिष दाखवित भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महिलांचे लैगिंक शोषण करत असल्याचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. या व्हिडीओवरून विधान परिषदेतही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना ( …
Read More »“आमिष दाखवित…मराठी बायकांना”, किरीट सोमय्यांचे ते आक्षेपार्ह व्हिडिओज् अंबादास दानवे यांनी दिले सभागृहात पेनड्राईव्ह देत केली सखोल चौकशीची मागणी
मागील काही वर्षापासून ईडी, सीबीआयच्य़ा कारवाईचा धाक दाखवित तर कधी विधान परिषदेच्या एखाद्या समितीवर, महामंडळावर वर्णी लावतो किंवा राज्यसभेवर एखादे पद देतो, पक्ष संघटनेत पद देतो सारखी आमिषे दाखवित अनेक महिलांचे लैगिंग शोषण केल्याचा धक्कादायक आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर केला. …
Read More »विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपसभापती पदावर विरोधकांनी घेतला आक्षेप अखेर विरोधकांचा सभात्याग
विधान परिषदेचं कामकाज सुरु झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच संपलं. नव्या मंत्र्यांची ओळख करुन दिल्यानंतर शेकापचे जयंत पाटील यांनी विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरच आक्षेप घेतला. सभापती महोदया तुमच्यावर आक्षेप आहे असं ते म्हणाले. जे सभागृह आपण चालवत असताना ज्या या पदावर बसल्या त्यावेळी त्यांचा पक्ष नसतो असं जयंत पाटील …
Read More »
Marathi e-Batmya