Tag Archives: शिवजयंती

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात भारतीय सेनेची मानवंदना आणि शिवरायांच्या जयघोषाने महाराष्ट्र सदन दुमदुमले

‘जय भवानी, जय शिवाजी’चा गगनभेदी जयघोष, ढोल-ताशांचा गजर, तुतारींचा निनाद आणि शाहिरी पोवाड्यांच्या साथीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज देशाच्या राजधानीत अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी भारतीय सेनेच्या तुकडीने छत्रपती शिवाजी महाराजांना विशेष मानवंदना दिली. दिल्लीतील शिवजयंती राष्ट्रोत्सव समितीतर्फे कस्तुरबा गांधी मार्गस्थित नवीन महाराष्ट्र सदनात सोहळ्याचे आयोजन करण्यात आले …

Read More »

कुपवाडा येथील भारत- पाक नियंत्रण रेषेजवळ झाला शिवजयंतीचा सोहळा

काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम झाला. सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमानात लष्कराच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय लष्कराच्या जवानांचे अभिनंदन करीत त्यांचे कौतुक केले. हिमवर्षावात देखील काश्मीर खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष दुमदुमला. …

Read More »