रायगड जिल्ह्यातील खोपोलीमधील शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची काल काही हल्लेखोरांनी निघृणपणे हत्या केली. या हत्येने रायगडमधील राजकारण ढवळून निघाले रात्री उशिरापर्यंत स्थानिक नागरिकांनी पोलीस स्थानकाला घेराव घालून या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली. दरम्यान आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळोखे यांच्या कुटुंबीयांची त्यांच्या …
Read More »सुनिल तटकरे यांची मागणी, खोपोली प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करावी खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय
खोपोलीत जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय असून त्या घटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून निषेध व्यक्त करतोच शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास यंत्रणांमध्ये व्यापकता आणून एसआयटी ( SIT) स्थापन करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना केली. सुनिल तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, खोपोलीतील घटना …
Read More »एकनाथ शिंदे यांचा टोला, खरी शिवसेना कोणाची हे जनतेने दाखवून दिले घरात बसवणाऱ्यांना जनतेने घरीच बसवले
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच नगरपरिषद, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्येही शिवसेनेचा स्ट्राइक रेट भक्कम राहिला असून, आम्ही जनतेसमोर विकासाचा अजेंडा घेऊन गेलो, स्थानिक प्रश्नांवर भर दिला आणि कोणावरही टीका केली नाही, त्यामुळेच जनतेने आम्हाला भरभरून यश दिले, असे ठाम मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ठाणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, सत्ताधारी पक्षांचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने निवडणूक आयोगाचा गोंधळी कारभार, बोगस मतदान, पैसा व सत्तेचा निवडणुकीत प्रचंड गैरवापर
नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाचा गलथान कारभार अधिरेखीत झाला आहे. मतदान प्रक्रियेचा पुरता गोंधळ घातला गेला, तारिख पे तारिख चा खेळ केला. ही निवडणूक फ्रि अँड फेअर अशी झाली नाही. सत्ताधारी पक्षाकडून साम, दाम, दंड, भेद या नितीचा मुक्तपणे वापर करण्यात आला. निवडणुकीत बोगस मतदार, दडपशाही, सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा …
Read More »एकनाथ शिंदे यांची घोषणा, ५० एकरपेक्षा मोठ्या भूखंडांवर राबवणार ‘क्लस्टर रिडेव्हलपमेंट’ पहिल्या टप्प्यात १७ प्रकल्पांची निवड, एसआरए अभय योजनेला ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ
मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पामधील लाभार्थ्यांना दिलासा देणाऱ्या अनेक महत्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी १७ ठिकाणी एसआरए समुह पुनर्विकास प्रकल्पाच्या घोषणेसोबतच ‘एसआरए अभय योजने’ला डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ, तक्रारींच्या जलद निपटाऱ्यासाठी ‘एपेक्स ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटींची संख्या वाढविण्याच्या घोषणांचा समावेश आहे. त्याचबरोबर म्हाडाच्या ओसीसाठीच्या …
Read More »एकनाथ शिंदे यांची टीका, मुख्यमंत्री असताना घरात बसलात, आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरताय नगरभकास मंत्री म्हणत केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खरमरीत प्रत्युत्तर
मुख्यमंत्री असताना तुम्ही घरात बसलात! फेसबुकवरून राज्य चालत नाही, जनता संकटात असताना रस्त्यावर उतरावं लागतं. आता शेतकऱ्यांच्या बांधावर फिरताय… पण कमरेवर हात ठेवून उभं राहू नका, या आमच्यासारखे देणारे हात बना, आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही — आम्ही ‘देना बँक’ आहोत, ते मात्र ‘लेना बँक’ आहेत अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ …
Read More »एकनाथ शिंदे म्हणाले की, संतांचे विचार आणि वारकरी परंपरा ही समाजाला ऊर्जा देणारी शेगाव दुमाला येथे श्री संत ज्ञानेश्वर मोरे माऊली महाराज समाधी मंदिराचे उद्घाटन व भक्तनिवासाचे लोकार्पण
वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठल सेवा आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीत येणारा वारकरी हा आमचा प्रथम व्हीआयपी आहे. संतांचे विचार आणि वारकरी परंपरा ही समाजाला ऊर्जा देणारी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शेगाव दुमाला येथे श्री संत ज्ञानेश्वर मोरे माऊली महाराज यांच्या समाधी मंदिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे …
Read More »एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका, आंदोलने मोर्चे काढून सत्ता मिळत नाही शेतकरी, कष्टकरी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण सुख-समृद्धीसाठी विठ्ठल चरणी शिंदे यांनी केली प्रार्थना
आम्ही काम केले आहे, जनता पाहते आहे. आंदोलने-मोर्चे काढून सत्ता मिळत नाही; महाराष्ट्रात विकास करणाऱ्यांनाच जनता साथ देते.” राज्याच्या विकासाचा चेहरा आणि जनतेला दिलेल्या वचनांची आठवण करून देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरातून आज विरोधकांवर थेट राजकीय प्रहार केला. कार्तिकी एकादशीच्या दिवशी विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद …
Read More »एकनाथ शिंदे यांचा दावा, नैसर्गिक शेती हीच भविष्यातील क्रांती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राज्यपाल देवव्रत यांच्या उपक्रमाला पाठिंबा
नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठी क्रांती घडेल आणि याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळेल. भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन आपण सर्वांनी नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्याचा संकल्प करूया, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राजभवन येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या नैसर्गिक शेती परिषदेत एकनाथ शिंदे बोलत होते. या …
Read More »एकनाथ शिंदे म्हणाले की, दिवाळीचा दीपोत्सव महाराष्ट्राच्या गौरवशाली वाटचालीस नवी दिशा देणारा ठरो दिवाळी बळीराजाच्या आयुष्यात पुन्हा चांगले दिवस घेऊन येवो
दीपोत्सव राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि नवी ऊर्जा घेऊन येवो, अशा शुभेच्छा देतानाच दीपोत्सवाचा हा प्रकाश महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग उजळेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला दीपावलीच्या मंगलमय पर्वाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले की, “दिवाळी हा केवळ दिव्यांचा नाही, तर …
Read More »
Marathi e-Batmya