आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या असून, त्यासाठी देशात 1 लक्ष कोटी रू. निधी उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्रातही आदिवासी समाजासाठी घरे, रस्ते, वीज, पाणी, वसतिगृह व रोजगार अशा सुविधांसाठी योजना-उपक्रम राबविण्यात येत असून, पुढील ३ वर्षांत आदिवासींच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडेल, असा विश्वास …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,ओबीसींवर अन्याय होणार नाही; खोट्या नोंदी नकोच चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यास आक्षेप
ओबीसींच्या मनात आपल्यावर अन्याय होईल अशी भीती आहे. पण, तसे काही होणार नाही. कुणबी नोंदी आहेत,त्यांनाच अध्यादेशाप्रमाणे प्रमाणपत्र मिळणार असून त्यासाठी प्रमाणपत्र, कुणबी नातेसंबंध, ग्रामसमिती, तहसीलदारांच्या स्तरावरील समितीचा अहवाल घ्यावा लागणार आहेत. वंशावळ जुळल्यानंतर सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेनंतरच दाखला देण्यात येईल. फक्त खोट्या नोंदी होणार नाहीत याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याची …
Read More »नाल्याच्या प्रश्नावरून…सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली, दादा कोंडके सारखे…. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना एसंशिचे मंत्री संजय राठोड यांच्या उत्तरावरून नापसंती
पावसाळी अधिवेशनाच्या राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर संख्येने कमी असले तरी विरोधकांकडून राज्यातील जनतेच्या प्रश्नांवरून रण उठविले जाईल अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र संख्याबळाच्या संख्येत लहान असलेल्या विरोधकांमध्ये अनेक प्रश्नांवरून एकमत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकाबाजूला विरोधकांकडून दररोज विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नावरून सरकारचे लक्ष …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान, जलयुक्त शिवार अभियानातून महाराष्ट्र जलक्रांतीच्या दिशेने मृद व जलसंधारण विभागात रूजू झाले ६०१ अधिकारी, मुख्यमंत्र्यांचे हस्ते नियुक्तीपत्राचे वितरण
राज्यात जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेले जलयुक्त शिवार अभियान हे महत्वाकांक्षी अभियान असून. या अभियानाच्या माध्यमातून राज्यात लोकसहभागातून झालेली कामे ही जलक्रांतीच्या दिशेने पडलेले पाऊल आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत आयोजित जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) नियुक्ती पत्राचे (रिमोटद्वारे ऑन लाईन …
Read More »संजय राठोड यांच्या अडचणी वाढल्याः उच्च न्यायालयाचे आदेश निष्कर्ष कशाच्या आधारे ? तपासाचा तपशील सादर करा
महायुतीतील मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे दिग्रसचे आमदार संजय राठोड हे मागील काही वर्षापासून संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यातच त्यांच्याकडे कार्यकर्ती म्हणून रूजू झालेली एक मुलगी गर्भवती राहिली. तसेच त्या तरूण मुलीने आत्महत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात राज्यात एकच गदारोळ उडाला. त्याचबरोबर संजय राठोड आणि त्या मुलीचे कथित प्रेमसंबध …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध योजनांचे वाशिममध्ये उद्घाटन राज्यातील १९ मेगावॅटच्या पाच सौर ऊर्जा पार्कचे लोकार्पण
बंजारा समाजाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाची भूमिका निभावली. देशाच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रात या समाजाने काम केले. समाजाने खूप संत दिले. या संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली. बंजारा विरासत संग्रहालयामुळे समाजाची महान संस्कृती, प्राचीन परंपरा देशाच्या नवीन पिढीला परिचित होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे लोकार्पण बंजारा समाजाच्या प्रतिष्ठीत व्यक्तींशी संवाद
बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथील बंजारा विरासत संग्रहालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी, पंतप्रधान मोदी यांनी नंगारा भवन परिसरातील बंजारा विरासत संग्रहालयाची पाहणी करुन बंजारा समाजाच्या संस्कृती व इतिहास यासंदर्भात माहिती जाणून घेतली. तसेच नगारा वाद्याचे वादनही त्यांनी केले. यावेळी …
Read More »जलसंधारण विभागातील स्थापत्य गट-ब संवर्गातील ६७० पदांसाठीची फेरपरीक्षा जुलै महिन्यात घेणार असल्याची मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची माहिती
जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब संवर्गातील ६७० पदांसाठीच्या फेरपरीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार आहे. ही परीक्षा अधिक पारदर्शक, कोणत्याही तांत्रिक त्रुटींशिवाय पार पडावी असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले. मृद व जलसंधारण विभागाच्या जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब संवर्गातील ६७० पदांसाठीची फेरपरीक्षा आढावा बैठक मंत्रालय मध्ये आयोजित केली …
Read More »मृद व जलसंधारण विभागांतर्गत ६७० पदांची भरती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
मृद व जलसंधारण विभागांतर्गत राज्यस्तर व जिल्हा परिषदस्तर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) या संवर्गातील ६७० पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली. मंत्री संजय राठोड म्हणाले की, शासन अधिसूचना २१ सप्टेंबर २०२१ नुसार जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) या पदांचे …
Read More »उद्धव ठाकरे यांची खोचक टीका, आधी फोडाफोडीचे…..आता थेट पक्षच पळवला जातोय… पोहरादेवी शपथ बंद दाराआड अमित शाहबरोबरील चर्चेत अडीच अडीच वर्षेच ठरली
शिवसेनेतील फुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या प्रत्यक्षात अंमलबजावणीला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आता सुरुवात केली. तसेच या प्रक्रियेत बंडखोर गटाचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटाची बांधणी करण्यास …
Read More »
Marathi e-Batmya