Tag Archives: सतेज बंटी पाटील

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, महाराष्ट्रात मतचोरीचा पहिला प्रयोग कामठीत भाजपाने मतचोरी करून महाराष्ट्रात १३२ आमदार निवडून आणले, मतचोरांना आता जनताच शिक्षा देणार: विजय वडेट्टीवार.

भारतीय जनता पक्ष मतचोरी करून सत्तेत आला आहे. महाराष्ट्रात मतचोरीचा पहिला प्रयोग भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदार संघात झाला. ज्या कामठीत मतचोरीची सुरवात झाली त्या चोराला सर्वात आधी धडा शिकवला पाहिजे. वोट चोर, गद्दी छोड,चा पहिला धमाका कामठीत झाला असून तो देशभर पाहोचला आहे. आता या मतचोरांना …

Read More »

सतेज बंटी पाटील यांचा आरोप नवीन ट्रॅक्टर नियम शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणार लहान ट्रॅक्टर मालक संकटात सापडण्याची शक्यता

केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन मसुदा अधिसूचनेमुळे देशभरातील कोट्यवधी शेतकरी आणि लहान ट्रॅक्टर मालक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अधिसूचनेत ट्रॅक्टरसाठी जीपीएस ब्लॅक बॉक्ससारखी उपकरणे सक्तीने बसवण्याची तरतूद आहे. ही अधिसूचना म्हणजे थेट शेतकऱ्याच्या खिशावर दरोडा असल्याचा आरोप काँग्रेसचे विधनपरिषदेतील गटनेते आमदार सतेज …

Read More »

आमदार सतेज बंटी पाटील यांचा सवाल, नवीन खनिकर्म प्राधिकरणाचा घाट कशासाठी? सरकारने काही सूचना केल्या आहेत का ?

प्राधिकरणाच्या नावाने स्थानिक स्वराज्य संस्था खिळखिळी होत असताना गडचिरोली जिल्ह्यात नवीन खनिकर्म प्राधिकरणाचा घाट कशासाठी घातला जात आहे ? असा सवाल विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. आपला जुन्या व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे काय? या प्राधिकरणांना काही नविन अधिकार दिले आहेत का ? असा प्रश्नांचा भडीमारही आमदार …

Read More »

शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध मात्र राज्य मंत्रिमंडळाची मान्यता महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती, २० हजार ७८७ कोटींची तरतूद

राज्यातील वर्धा ते सिंधुदूर्गला जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला आधीच पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर विरोध आहे. तसेच काहीही झाले तरी शेतकऱ्यांच्या जमिनी द्यायच्या नाहीत असा निश्चिय असताना हा प्रकल्प काहीही करून पुर्ण करायचा असा चंग राज्य सरकारने बांधला आहे. त्यामुळेच आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या ई बैठकीत शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला मंजूरी दिली. …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, … नवा अवतार राक्षसरुपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला परभणीतील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, उद्या सोमवारी संविधान बचाव यात्रा

भक्त प्रल्हादाची जी भक्ती आहे तशीच भक्ती काँग्रेस जनांच्या आचार, विचार आणि उच्चारातून दिसत आहे. आपण काँग्रेस काँग्रेस म्हणत आहोत तर दुसरा रावणाचा छळणारा विचार आहे तो पक्षांतर करा म्हणतो, आमचेच बरोबर आहे हे सांगतो. भक्त प्रल्हादाच्या भक्तीने नृसिंहाचा अवतार झाला तसाच नृसिंह अवतार ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून होईल आणि …

Read More »

शक्तीपीठ महामार्गाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य, समर्थनार्थ मोठा मेळावा होणार विरोधी पक्षननेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत मुद्दा उपस्थित करताच मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

राज्यातील देवस्थानांना जोडणारे रस्ते आधीच चांगल्या आणि सुस्थितीत असताना पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जात आहे. हा मार्गमार्ग १२ जिल्ह्यातून जाणार असून या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध असतानाही शक्तीपीठ महामार्ग मोठ्या प्रमाणावर रेटला जात आहे. आजच्या मोर्चात फक्त कोल्हापूरचे शेतकरी आले आहेत. मात्र भविष्यकाळात …

Read More »

अंबादास दानवे यांची ग्वाही, शक्तीपीठ महामार्ग ग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ विरोधी मोर्चाला समोर बोलताना दिली ग्वाही

शक्तिपीठ महामार्गग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे असल्याची ग्वाही विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांना दिली. मुंबई येथील आझाद मैदानावर शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित धडक मोर्चास आज उपस्थित राहून संबोधित केले. यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान कोल्हापुर येथील …

Read More »

सतेज बंटी पाटील यांचा सवाल, शक्तीपीठ महामार्ग कशासाठी ? शक्तिपीठ महामार्गाऐवजी मार्गावरील मंदिरांना ५-५ हजार कोटींचा निधी द्या

शक्तीपीठ प्रकल्पाच्या माध्यमातून विकास साधत असल्याचा भास सरकार निर्माण करत असून त्यासाठी समृद्धीमार्गाचे उदाहरण दिले. या महामार्गावर जो टोल मिळणे अपेक्षित होता तो मिळाला नाही. तरीही नविन शक्तिपीठ महामार्गाचा प्रकल्प कशासाठी ? असा सवाल काँग्रेसचे नेते सतेज बंटी पाटील यांनी यावेळी केला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील विधान परिषदेतील चर्चेत भाग घेतल्यानंतर काँग्रेसचे …

Read More »

काँग्रेस विधिमंडळ पदाधिका-यांच्या नियुक्त्या जाहीर: अमित देशमुखांवर जबाबदारी विधानसभा उप नेते पदी आ. अमिन पटेल, सचिवपदी आ. डॉ. विश्वजित कदम, विधानपरिषदेत गट नेतेपदी आ. सतेज पाटील

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विधानसभेतील काँग्रेसच्या उपनेतेपदी आ. अमीन पटेल यांची, मुख्य प्रतोदपदी माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची, सचिव पदी आ. डॉ. विश्वजीत कदम यांची आणि प्रतोदपदी शिरीषकुमार नाईक व संजय मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आलेली …

Read More »

सतेज बंटी पाटील यांचा इशारा, शक्तीपीठ महामार्ग विरोधात १२ मार्चला विधानसभेवर भव्य मोर्चा शक्तीपीठ बाबत सरकारची दुटप्पी भूमिका, शक्तीपीठ विरोधात न्यायालया ऐवजी रस्त्यावरची लढाई लढू

शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा असून, हा महामार्ग रद्द व्हावा या मागणी करिता १२ मार्चला विधानसभेवर भव्य मोर्चा काढणार असल्याचं विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज बंटी पाटील यांनी जाहीर केलं. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत ते बोलत होते. शक्तीपीठ महामार्ग बाधित १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक, विधान परिषदेतील …

Read More »