अंबादास दानवे यांची ग्वाही, शक्तीपीठ महामार्ग ग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ विरोधी मोर्चाला समोर बोलताना दिली ग्वाही

शक्तिपीठ महामार्गग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे असल्याची ग्वाही विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांना दिली. मुंबई येथील आझाद मैदानावर शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित धडक मोर्चास आज उपस्थित राहून संबोधित केले.

यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान कोल्हापुर येथील सभेत सदरील शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांचा विरोध असेल तर राज्य सरकार हा महामार्ग करणार नसल्याचा आश्वासन दिलेला व्हिडीओ यावेळी दानवे यांनी दाखवला. तसेच यापूर्वीच राज्यातील देवस्थानांना जोडण्यासाठी चांगले रस्ते असताना शक्तीपीठ महामार्गाची काय आवश्यकता आहे, असा सवालही यावेळी केला.

पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, राज्य सरकार कंत्राटदाराच्या फायद्यांसाठी हा शक्तिपीठ महामार्ग करत असून शेतकरी हिताशी शासनाला काही देणे घेणे नाही, अशी टीकाही केली.

अंबादास दानवे शेवटी बोलताना म्हणाले की, विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आणि आता महायुतीचे सरकार आल्यानंतर सरकारला निवडणुकीपूर्वी दिलेल्या आपल्या शब्दाचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांचा विरोध असताना राज्य शासनाकडून हा महामार्ग केला जात आहे. राज्य शासन अशा पद्धतीने शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तीपीठ महामार्ग करत असेल तर शेतकरी बांधवांच्या आम्ही पाठीशी खंबीरपणे उभे आहे.  दरम्यान, सदरील प्रकरणी विधान परिषद सभागृहात विरोधी पक्षांच्या वतीने स्थगन प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती यावेळी अंबादास दानवे यांनी दिली.

याप्रसंगी आमदार जयंत पाटील, सतेज पाटील, कैलास पाटील, सचिन अहिर, प्रवीण स्वामी, राजू नवघरे, राजू शेट्टी व दिलीप सोपल उपस्थित होते.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *