Tag Archives: सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी काय याची निवडणूकीच्या उमेदवारी अर्जात सादर करण्याचा निर्णय एडीआर या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानेच निर्णय दिला होता. मात्र आज सर्वोच्च न्यायालयात याच अनुषंगाने आणखी एक याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूकीत उभा राहिलेला …

Read More »

भीमा कोरेगांव प्रकरणी शोमा सेन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर

२०१८ साली पुणे येथील भीमा कोरेगाव हिंसाचारापूर्वी शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या शोमा सेन यांना युएपीए कायद्याखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास ५ वर्षानंतर कार्यकर्त्या शोमा सेन यांना सर्वोच्च न्यायालयाने आज (५ एप्रिल) रोजी जामीन मंजूर केला. शोमा सेन या इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका आहेत. तसेच महिला चळवळीच्या …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र खरे

अमरावतीच्या भाजपा उमेदवार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देत नवनीत राणा यांचे मोची समाजाचे जात प्रमाणपत्र सत्य असल्याचा निर्वाळा देत नवनीत राणा यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासही मान्यता दिली. याशिवाय नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला स्थगितीही दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या जे के माहेश्वरी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने रामदेव बाबा यांना दिली शेवटची संधी

कोरोना काळात वैज्ञानिक दृष्ट्या सर्व निकषांवर खऱ्या ठरणाऱ्या औषधांना आव्हान देत आयुर्वेदीक पध्दतीच्या कोरोनील औषधे योग गुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने बाजारात विक्रीस आणले. तसेच ही औषधे कोरोना या आजारावर प्रभावी असल्याचे सांगत त्याच्या मोठमोठ्या जाहिराती जारी प्रसिध्द केल्या. या खोट्या दाव्याची सर्वोच्च न्यायालयात दाद घेण्यात आली. तसेच …

Read More »

वकिलांच्या पत्राची पंतप्रधान मोदींकडून तात्काळ दखल तर काँग्रेसचा पलटवार

देशभरातील विविध न्यायालयात भाजपाच्यावतीने न्यायालयात वकीलपत्र दाखल करत कायदेशीर बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांच्यासह मानन कुमार मिश्री, अदिश अगरवाल, चेतन मित्तल, पिंकी आनंद, हितेश जैन, उज्वला पवार, उदय होल्ला, स्वरूपमा चतुर्वेदी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड यांना पत्र लिहित न्यायपालिकेच्या कारभाराच्या अनुषंगाने काही मुद्दे उपस्थित केले. …

Read More »

केरळ सरकारची राष्ट्रपती मुर्मु यांच्यासह राज्यपालांच्या विरोधात न्यायालयात याचिका

केरळ सरकारने २३ मार्च रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर केरळ विधानसभेने मंजूर केलेल्या चार विधेयकांना कोणतीही कारणे न सांगता संमती रोखल्याबद्दल आणि केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्यावर ही विधेयके दीर्घकाळ आणि अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. कोणतेही कारण न देता चार विधेयकांना संमती रोखून ठेवण्याची …

Read More »

ईडीची मागणी अरविंद केजरीवाल यांना १० दिवसांची कोठडी द्याः न्यायालयाने निकाल राखून ठेवला

ईडी अर्थात सक्त वसुली संचालनालयाने, अरविंद केजरीवाल यांच्या १० दिवसांच्या कोठडीची मागणी करताना, न्यायालयाला सांगितले की आप सुप्रीमो अरविंद केजरीवाल हे “दारू धोरण घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार” होते. तरीही दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी असा युक्तिवाद केला की त्यांच्याशी संबंध जोडणारा कोणताही “थेट पुरावा” या प्रकरणात नाही. ईडीने न्यायालयासमोर युक्तीवाद करताना सांगितले की, अरविंद …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर राज्यपाल म्हणाले,… मंत्री पदाची शपथ देणार

तामीळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी राज्य मंत्रिमंडळात के पोंमुडी यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचा निर्णय घेतला. तरीही राज्याचे राज्यपाल आर एन रवि यांनी पोंमुडी यांना शपथ देण्यास टाळाटाळ केली. राज्य मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा याचे अधिकार मुख्यमंत्री यांना असतात ते अधिकार किंवा त्याविषयी निर्णय घेण्याचे अधिकार राज्यपाल यांना नसतात असे स्पष्ट …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, ‘घड्याळ’ चिन्ह वापरा पण प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे जाहिर करा

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्याचा दावा करण्यात आला. परंतु आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणूकीत निवडणूक चिन्ह म्हणून तुतारी चिन्ह वापरण्यास मान्यता देत अजित पवार गटाच्या निवडणूक घड्याळ निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे एसबीआयला आदेश, २१ मार्चपर्यंत सर्व तपशील सादर करा

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्टेट बँक ऑफ इंडियाला इलेक्टोरल बाँड्सशी संबंधित सर्व तपशीलांचा संपूर्ण खुलासा करण्याचे निर्देश दिले, ज्यात खरेदीदार आणि प्राप्तकर्ता राजकीय पक्ष यांच्यातील दुवा उघड करणाऱ्या बाँड क्रमांकांचा समावेश आहे, त्याची सविस्तर माहिती २१ मार्चपर्यंत सादर करावी असे निर्देश दिले. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने …

Read More »