Tag Archives: सार्वजनिक बांधकाम मंत्री

शिवेंद्रसिंह भोसले यांची माहिती, तळेगाव ते शिक्रापूर महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटीस मान्यता अपघात कमी होऊन वाहतुकीस मोठा दिलासा

तळेगाव –चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी (माजी राज्य महामार्ग ५५) कि.मी. ०/०० ते कि.मी. ५४/०० या मार्गाच्या दुरुस्ती व रुंदीकरणासाठी एकूण ₹५९.७५ कोटी निधीस मान्यता देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी दिली आहे. तसेच या निर्णयामुळे तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल, अपघातांचा धोका टळेल तसेच औद्योगिक वाहतुकीला …

Read More »

गणेशभक्तांच्या टोलमाफीसाठी एकनाथ शिंदे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात श्रेय वादाची लढाई कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी

मागील अनेक वर्षापासून गणेशोत्सवाच्या सण काळात सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांकडून कोकणात जाऊ गणेशभक्तांसाठी मोफत बससेवा सुरु करण्याची चढाओढ लागत असे. त्यामुळे ज्या मतदारसंघात कोकणवासिय जास्त भागातील मतदार कम नागरिकांसाठी एक प्रकारचे आमिष म्हणून मोफत बसने कोकणात नेले जात असे. त्यानंतर आता कोकणवासियांकडे वाहन घेऊन जाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर या वाहनांना …

Read More »

वाढवण बंदर ‘फ्रेट कॉरिडॉर’ बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाला जोडणार १०४. ८९८ किलोमीटरचा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग, अंतर, वेळ, इंधनाची बचत

पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर (तवा) आणि हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग यांना फ्रेट कॉरिडॉर या शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने भरवीर (ता. चांदवड, जि. नाशिक) येथे यांना जोडण्यात येणार आहे. या १०४. ८९८ किलोमीटरच्या शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हा …

Read More »

अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार किरण लहामटे यांच्या विरोधात लेखी तक्रार कामात टक्केवारी खात असल्याचा मुंबई काँन्ट्रक्ट असोशिएशनचा आरोप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोले विधानसभा मतदारसंघातील  आमदार डॉ. किरण लहामटे हे  विकास कामासाठी कंत्राटदारांकडून टक्केवारी घेत असल्याचा आरोप मुंबई कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने केला आहे. यासंदर्भात असोसिएशनने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. अकोले तालुक्यातील रस्ते कामांच्या निघणाऱ्या ई निविदा प्रक्रियेत …

Read More »

शिवेंद्रराजे भोसले यांची घोषणा, मुंबई-गोवा महामार्गाच्या बांधकामाची त्रयस्त यंत्रणे मार्फत चौकशी मुंबई गोवा महामार्ग जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करणार

मागील काही वर्षापासून रखड़लेल्या मुंबई – गोवा महामार्गाच्या बांधकामाची त्रयस्त यंत्रणे मार्फत इन कॅमेरा चौकशी केली जाईल. यात जे कोणी दोषी असतील त्यांच्या वर कड़क कारवाई केली जाईल. मात्र आता हा महामार्ग जानेवारी २०२६ पर्यन्त पूर्ण केला जाईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी आज विधानसभेत दिले. …

Read More »

आशियाई बँकेच्या मदतीतून महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प टप्पा-३ सुरू सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते १४८० कि.मी. लांबीच्या रस्ते कामांचे ई-भूमिपूजन

आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित (एडीबी) महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प टप्पा-३ अंतर्गत राज्यातील २४ जिल्ह्यातील रु. १२ हजार ७६८ कोटी रूपये किंमतीच्या १४८० कि.मी. लांबीच्या दुपदरी सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे भूमिपूजन एकाच वेळी त्या-त्या ठिकाणी पार पडले. मुख्य भूमिपूजन समारंभ दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा सवाल, रस्त्यांवर खड्डेच खड्डे मग टोल कशाचा घेता? ट्रिपल इंजिन सरकार विरोधात जनमानसात प्रचंड असंतोष

विद्यमान ट्रिपल इंजिन सरकारने महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत दयनीय करून टाकली आहे. राज्यातल्या सर्वच प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे, गाडी चालवणे आणि प्रवास करणे, हे जीवावर बेतणारे आहे. रस्त्यावरचा प्रत्येक खड्डा महायुती सरकारच्या नाकर्तेपणाची साक्ष देतो, रस्त्यावर असणारे खड्डे आणि त्यावर जर मार्गच काढायचा नसेल तर तोल कशाचा घेता असा …

Read More »