Tag Archives: स्थानिक स्वराज्य संस्था

प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेसला सवाल, भाजपाच्या दबावामुळे युतीपासून दूर राहतेय का? काँग्रेसकडून युतीचा हात पुढे करण्याकडे वंचित बहुजन आघाडीचे लक्ष

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा आणि त्याचे मित्रपक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षांसोबत युती करण्यास आम्ही तयार असल्याचे मी २१ मे रोजी स्पष्ट केले होते, तसेच माझी पत्नी अंजली आंबेडकर यांनीही १८ जून रोजी त्याच भूमिकेची पुनरावृत्ती केली होती, असे …

Read More »

प्राथमिक शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी परिस्थितीचे भान राखणाऱ्या शिक्षकांचे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून कौतुक

राज्यात मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना शासनामार्फत सर्वतोपरी साहाय्य केले जात आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खारीचा वाटा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी एक दिवसाचे वेतन देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे कळविले आहे. राज्यातील पूर परिस्थितीचे भान राखून मदतीचा निर्णय …

Read More »

छगन भुजबळ यांचे आवाहन, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागा तुफानातले दिवे होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पुढे न्या

लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे आहे. त्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तयार असायला हवे. या काळात आपल्यावर अनेक हल्ले होतील मात्र न घाबरता न डगमगता आपल्याला त्यावर प्रतिहल्ला करावा लागणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी हा फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे तुफानातले दिवे होऊन राष्ट्रवादी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला तंबी, ३१ जानेवारी निवडणूका घ्या राज्य सरकारने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काढला गळा

सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणी दरम्यान ४ महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा राज्य सरकार अर्थात राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज करत ४ महिन्यात निवडणूका घेण्याऐवजी जानेवारी २०२६ पर्यंत निवडणूका घेण्याची परवानगी द्यावी यासाठी अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य …

Read More »

जयंत पाटील यांचा टोला, पक्ष फोडले, पक्ष चोरले, त्यावर समाधान नाही झाले तर मत चोरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्ता शिबिरात जयंत पाटील यांचे मार्गदर्शन यांचे

लोकसभेत आपल्या पक्षाने दहा पैकी आठ जागा जिंकत उत्तम कामगिरी केली. व्होट चोरीचे प्रकरण झाले नसते तर शशिकांत शिंदे यांची जागा देखील आपण जिंकलीच होती. विधानसभेत दुर्दैवाने अनपेक्षित निकाल लागला. असा निकाल का लागला याची कारणे आता पुढे येऊ लागली आहेत. पक्ष फोडले, पक्ष चोरले, त्यावर समाधान नाही झाले तर …

Read More »

स्मार्ट सिटीचे काय ? पण मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुन्हा स्मार्ट गावांची घोषणा राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील १० गावे ‘स्मार्ट’ व ‘इंटेलिजेंट’ करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात आणि देशात २०१४ साली भाजपाचे सरकार स्थानापन्न झाले. त्यावेळी मोठा वाजत गाजत जवळपास राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील शहरांमध्ये स्मार्ट सिटी योजनेची घोषणा करण्यात आली. तसेच स्मार्ट शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर फंडही जाहिर करण्यात आला. परंतु तेव्हापासून राज्यातील स्मार्ट सिटीचे काय झाले याचा पत्ता शासनस्तराशिवाय आतापर्यंत कोणालाच माहित झाला नाही. तसेच …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट VVPAT वापरा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन केली मागणी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT वापरण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडधे पाटील, प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष अभय छाजेड, डॉ. झिशान हुसेन, इरफान पठाण ,नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश …

Read More »

भाजपाचा अजेंडा गणेशोस्तवात राबविण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे मंडळांना आवाहन ऑपरेशन सिंदूर चे देखावे सादर करण्याचे केले आवाहन

जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरीक ठार झाले. या अतिरेकी हल्ल्याला प्रतित्युर म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरतंर्गत कारवाई करत पाकिस्तानातील दहशतवादी स्थळांना उद्धवस्तही केले. मात्र भारतीय सैन्याकडून कारवाई सुरु असतानाच अचानक भारताने पाकिस्तानबरोबर युद्धबंदी केली. परंतु या युद्धबंदीची घोषणा सर्वात आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड …

Read More »

सतेज पाटील यांचे आवाहन, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करा जातनिहाय जनगणनेसाठी राहुल गांधींनी घेतलेल्या भूमिकावर जनजागृती करा: सचिन राव

राज्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका होत आहेत. या निवडणुका अत्यंत महत्वाच्या असून काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी विषयवार कामाची जबाबदारी घेतली पाहिजे. प्रभाग रचना, गट व गण तसेच मतदार याद्यांचा अभ्यास करा व काही हरकती असतील तर त्या नोंदवल्या पाहिजेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहण्याचा प्रयत्न करा त्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी अस्त्र आहे. ७१ …

Read More »

एकनाथ शिंदे यांची माहिती, महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार दीर्घकाळ गृहमंत्रीपदाचा विक्रम करणाऱ्या अमित शाह यांचे केलं अभिनंदन

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) भक्कम पाठिंबा आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांसह बुधवारी दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री एकनाथ …

Read More »