प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेसला सवाल, भाजपाच्या दबावामुळे युतीपासून दूर राहतेय का? काँग्रेसकडून युतीचा हात पुढे करण्याकडे वंचित बहुजन आघाडीचे लक्ष

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा आणि त्याचे मित्रपक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षांसोबत युती करण्यास आम्ही तयार असल्याचे मी २१ मे रोजी स्पष्ट केले होते, तसेच माझी पत्नी अंजली आंबेडकर यांनीही १८ जून रोजी त्याच भूमिकेची पुनरावृत्ती केली होती, असे आंबेडकरांनी सांगितले. मात्र, आजतागायत काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाने वंचित बहुजन आघाडीसोबत युतीसाठी कोणताही संपर्क साधलेला नाही, याबद्दल प्रकाश आंबेडकर यांची प्रश्न उपस्थित केला.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजपाने काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीसोबत युती करू नये, असा दबाव आणला आहे का? भाजपाकडे काँग्रेसविषयी असे काय आहे, ज्यामुळे काँग्रेस भाजपाला घाबरत आहे? अशी प्रश्नांची सरबतीही यावेळी केली.

प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात नवे चर्चासत्र रंगले असून, काँग्रेस आगामी निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीसोबत युतीसाठी हात पुढे करणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांना आशा, मुंबईला जागतिक ज्ञान केंद्र बनविण्यात यूडब्ल्यूए महत्वपूर्ण भूमिका बजावेल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इंडिया, मुंबई कॅम्पसचे उद्घाटन

मुंबईला जागतिक दर्जाचे ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचे केंद्र बनविण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *