Tag Archives: हमास

इस्त्रायली सैन्याने मध्य गाझातील लक्ष्याधिरीत स्ट्राईक हमासने इस्त्रायल आणि पॅलेस्टीनी गट हमास यांच्यात अमेरिकेच्या मदतीने युद्धबंदी

इस्रायली सैन्याने शनिवारी (२५ ऑक्टोबर २०२५) मध्य गाझामधील एका व्यक्तीवर “लक्ष्यित हल्ला” केला, जो इस्रायली सैन्यावर हल्ला करण्याचा विचार करत होता, असे इस्रायली सैन्याने सांगितले. गाझा पट्टीतील युद्ध सुरू झाल्यापासून दोन वर्षांहून अधिक काळानंतर इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमास यांच्यात अमेरिकेने पाठिंबा दिलेला युद्धबंदी लागू आहे, परंतु दोन्ही बाजूंनी …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला इशारा, गाझा सोडा नाही तर पूर्णपणे नष्ट इस्त्रायसची युद्ध बंदीला पूर्णतः तयारी

रविवारी संध्याकाळी ६ वाजता (वॉशिंग्टन वेळेनुसार) अंतिम मुदत संपण्यापूर्वी हमासने जर गाझामधील सत्ता आणि नियंत्रण सोडले नाही तर त्यांना “पूर्णपणे नष्ट” केले जाईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा नव्याने हा इशारा अंतिम मुदत संपण्याच्या फक्त १२ तास आधी दिला. शनिवारी सीएनएनने इस्रायली …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांची स्पष्टोक्ती, ओलिसांच्या सुटकेसाठी हमासबरोबर करार नाही पॅलेस्टाईनला मान्यता देण्यासंदर्भात फ्रान्सच्या मागणीला धुडकावले

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी सांगितले की हमास गाझामध्ये युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटकेसाठी “करार करू इच्छित नाही”, आणि वाटाघाटींमध्ये झालेल्या अपयशासाठी दहशतवादी गटाला जबाबदार धरले. डोनाल्ड ट्रम्प पुढे बोलताना म्हणाले की, वाटाघाटीच्या बाबतीत त्यांनी माघार घेतली. ते खूप वाईट होते. हमास खरोखर करार करू इच्छित नव्हता. मला वाटते की …

Read More »

शशी थरूर यांनी पहलगाम हल्ल्याची तुलना करत म्हणाले, गुप्तचर यंत्रणा सक्षम नाहीत जगाच्या पाठीवर कोणतीच गुप्तचर यंत्रणा धोक्याची सूचना देऊ शकत नाही

२६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर भारतातील नागरिकांवर झालेला सर्वात घातक हल्ला – पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर – काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी संयमी प्रतिसाद देण्याची मागणी केली आणि चालू संकटाच्या काळात दोष देण्यास घाई करण्याविरुद्ध इशारा दिला. या मुद्द्यावर पत्रकारांशी बोलताना शशी थरूर यांनी सुरक्षेतील त्रुटी मान्य केल्या परंतु व्यापक दृष्टिकोनाचा आग्रह …

Read More »

युद्धबंदीनंतर हमासने इस्त्रायलच्या तीन ओलिसांची केली सुटका रेड क्रॉसकडे केले हस्तांतरण

हमास आणि इस्त्रायल मध्ये युद्धबंदी जाहिर करण्यात आल्यानंतर हमासने अपहरण केलेल्या तीन ओलिसांना रेड क्रॉसकडे सुटका करत त्यांच्याकडील आश्वासनाची पुर्तता केली. गाझामधील १५ महिन्यांहून अधिक काळ चाललेला संघर्ष या युद्धबंदीमुळे थांबला. घटनास्थळावरील छायाचित्रांमध्ये तीन महिला ओलिस – रोमी गोनेन, डोरॉन स्टाइनब्रेचर आणि एमिली दमारी – सशस्त्र हमास सैनिकांनी वेढलेल्या वाहनातून …

Read More »

हमासकडून तेलअविववर रॉकेट बँरेजने हल्ले इशारा सायरन वाजले, पण जीवीतहानी कोणतीही नसल्याचा इस्त्रायलचा दावा

जवळपास पाच महिन्याहून अधिक काळ झाला हमास आणि इस्त्रायलमधील संघर्ष काही केल्या थांबायला तयार नाही. त्यातच इराणचे पंतप्रधान रईम यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी या हेलिकॉप्टरला अपघात घडवून आणण्यामागे इस्त्रायलचा हात असल्याचे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर हमासने गाझा पट्टीतून तेल अवीववर रॉकेट बॅरेज लाँच क्षेपणास्त्रांचा …

Read More »

अखेर भारताने युनोत केले इस्त्रायलच्या विरोधात मतदान

इस्त्रायलकडून सातत्याने गाझा पट्टीत हमासला नेस्तानाभूत करायचे म्हणून पॅलिस्टीनी नागरिकांवर हल्ले करत त्यांना हुसकावून लावत आहे. तसेच गाझा पट्टीत अडकलेल्या आणि इस्त्रायली हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना पुरेसे उपचारही मिळू नये यासाठी गाझातील हॉस्पीटल आणि युनोच्या छावणीत राहणाऱ्या लोकांवरही इस्त्रायलकडून सातत्याने हल्ले करण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर भारताने इस्त्रायलच्या विरोधात युनोने ठेवलेल्या …

Read More »

२९ व्या दिवशीही इस्त्रायलचे हल्ले सुरुचः तुर्कीने राजदूत परत बोलावला ओलिस नागरिकांना सोडत नाही तोपर्यंत हल्ले सुरुच ठेवण्याचा इस्त्रायचा निर्धार

हमासच्या हल्ल्याला प्रतित्युर म्हणून इस्त्रायलने सुरु केलेल्या गाझा पट्टीवरील हल्ले काही केल्या थांबवायला तयार नाही. इस्त्रायलने हमासच्या नायनाटासाठी गाझापट्टीवर हल्ले आज २९ दिवशीही कायम ठेवले आहेत. विशेष म्हणजे अमेरिका, युरोपमधील अनेक देशांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहु यांना मानवी वस्त्यांवर हल्ले करू नका असे आवाहन केलेले असतानाही हे हल्ले सुरुच ठेवले. …

Read More »

अखेर बेंजामिन नेत्यानाहु यांनी मागितली माफी पत्रकार परिषद घेत मागितली माफी

इस्त्रायलवर हमासने हल्ला केल्यानंतर जगभरातून आणि इस्त्रायलमधूनही त्यावेळी इस्त्रायलची सेना आणि गुप्तचर संस्था काय करत होती असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहु यांनी आपल्याच देशाच्या गुप्तचर यंत्रणा आणि सेना अधिकाऱ्यांवर टीकेची तोफ डागली होती. मात्र आज बेंजामिन नेत्यानाहु यांनी पत्रकार परिषद घेत अखेर आपल्याच देशाच्या सैन्याची आणि …

Read More »

गाझातील मानवी मुल्यांच्या प्रस्तावावरील मतदानावेळी भारत युनोत गैरहजर हमास हल्ल्याचा उल्लेख न केल्याने आमसभेत गैरहजर राहिल्याचा दावा

सध्या मध्य पूर्वेत हमास आणि इस्त्रायल दरम्यान उडालेल्या युध्दाच्या भडक्याने आंतराराष्ट्रीयस्तरावर सरळ सरळ दोन तट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच या युध्दाच्या मुद्यावरून युनोच्या आमसभेच्या मतदानावेळी भारत सरकार गैरहजर राहिला. भारत सरकारने गैरहजर राहण्याचे समर्थन करताना मानवीदृष्टीकोनातून युध्दबंदीचा प्रस्ताव या सभेत आणण्यात आला नाही. उलट ७ ऑक्टोंबर रोजी हमास …

Read More »