Tag Archives: accused

योगेश कदम यांची माहिती, पोलीस कोठडीतील आरोपी पळून जाऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाय ससून रूग्णालयात पोलिस चौकीची स्थापना

पाचगणी पोलीस स्टेशन येथे पोक्सो अन्वये दाखल गुन्ह्यातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीच्या पलायनास जबाबदार असलेल्या पोलीस अंमलदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच कर्तव्यात केलेल्या कसुरीबाबत त्यांच्यावर खातेनिहाय विभागीय चौकशीची कारवाई करण्यात आलेली आहे. अशा घटना टाळण्यासाठी बंडगार्डन पोलीस स्टेशन अंतर्गत ससून रुग्णालय पोलीस चौकीची स्थापना करण्यात आली असल्याचे गृह …

Read More »

उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन ‘बेटी बचाओ’ ही भाजपाची पोकळ घोषणा, बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी भाजपा उभा

उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी, भाजप आमदार कुलदीप सेंगरची शिक्षा न्यायालयाने निलंबित केल्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. उन्नावसारख्या प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपीला दिलासा देणारी व्यवस्था भाजपच्या मानसिकतेचे प्रतीक आहे. ‘बेटी बचाओ’ ही केवळ घोषणा असून प्रत्यक्षात भाजप बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. अशा सरकारविरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर …

Read More »

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीचा भारत सरकारवरच आरोप भारतातील केंद्र सरकारकडून अपहरणाचा प्रयत्न केल्याचा दावा

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) फसवणूक प्रकरणात आरोपांना सामोरे जावे लागणारा उद्योगपती मेहुल चोक्सी, त्याच्या कथित “अपहरण, छळ आणि हत्येचा प्रयत्न” साठी भारत सरकार आणि पाच व्यक्तींवर लंडनमधील उच्च न्यायालयात कट रचल्याबद्दल खटला दाखल करत आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी आरोप फेटाळले आहेत आणि “राज्य प्रतिकारशक्ती” वर आधारित यूके अधिकारक्षेत्राला आक्षेप घेतला आहे …

Read More »

सैफ अली खान प्रकरणी पोलिसांचा आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध घटनास्थळी सापडलेल्या तुकड्य़ासह अन्य चाकुच्या तुकड्यात साम्य

अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे येथील घरी झालेल्या हल्ल्यामध्ये त्याच्या मणक्यात अडकलेला चाकूचा तुकडा, घटनास्थळी सापडलेला एक तुकडा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामकडून हस्तगत केलेल्या शस्त्राशी जुळत आहेत. हे तीन तुकडे अभिनेत्यावर हल्ला करण्यासाठी वापरलेल्या शस्त्राचा भाग होते, असे पोलिसांनी शुक्रवारी सत्र न्यायालयात सांगितले. तसेच पोलिसांनी जामीन अर्जाला विरोध केला. तिन्ही तुकडे मुंबईतील कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये सीए (रासायनिक विश्लेषण) तपासणीसाठी पाठवण्यात आले. एफएसएल …

Read More »

आरोपीला ताब्यात घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द साक्षीदारांचे जबाब आरोपीला उर्दू भाषेतून उपलब्ध केले नाहीत

अटकेत असलेल्या व्यक्तीला साक्षीदारांचे जबाब त्याला माहीत असलेल्या भाषेत म्हणजेच भाषांतरित न केल्यामुळे त्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्याचे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने नुकतेच नाशिकमधील अर्जदाराविरुद्धचे अटकेचे आदेश रद्द केले. अटकेतील व्यक्तीला माहीत असलेल्या भाषेत साक्षीदारांचे जबाब देण्यात आले नाहीत, अर्जदाराला मराठी भाषा समजत नाही, त्याला उर्दू भाषेत साक्षीदारांचे जबाब देणे, आवश्यक होते, तसे न केल्यामुळे तो अटकेच्या आदेशाला तातडीने आव्हान देऊ शकणार नाही, असे निरीक्षणही न्या. सारंग कोतवाल …

Read More »

१३,८६४ किलो हेरॉइन तस्करीचे प्रकरणी उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर एक लाख रूपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन

नवी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरात या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या भावाची १३,८६४ किलो हेरॉइन या अमली पदार्थाची तस्करी सुरळीत होण्यासाठी १.५ लाख रुपये हस्तांतरित केल्याचा आरोप असलेल्या पंजाब लुधियाना येथील एका व्यक्तीला उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयाने आरोपी गुर्जुगदीप सिंग स्मघचा दीर्घकाळ तुरुंगवास आणि अधिकृत आरोपांची कमतरता जामीन …

Read More »

अबू सालेमच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस भूमिका स्पष्ट करा करण्याचे राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबईत मार्च १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कुख्यात गुंड अबू सालेमने शिक्षा माफ करण्याच्या आणि तुरुंगातून सुटका करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. भारत आणि पोर्तुगाल यांच्यातील प्रत्यार्पण करारानुसार सालेमने २५ वर्षे तुरुंगवास पूर्ण केल्यामुळे त्याची तुरुंगातून सुटका करण्यात यावी, अशी मागणी सालेमने याचिकेत केली आहे. त्या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने केंद्र सरकारला प्रतिवादी करण्यासाठी नोटीस बजावली आणि तर राज्य सरकारला याचिकेवर भूमिका …

Read More »

डॉ पायल तडवी आत्महत्या प्रकरण : नायर रुग्णालयाच्या डॉ. चिंग लिंग चुंग चियांगही आरोपी करा विशेष न्यायालयाकडून सरकारी पक्षाची मागणी मान्य

डॉ पायल तडवी आत्महत्याप्रकरणी नायर रुग्णालयाच्या संबंधित विभागाच्या तत्कालीन प्रमुख आणि प्राध्यापक डॉ चिंग लिंग चुंग चियांगही आता आरोपी असणार आहेत. त्यांना आरोपी करण्याची सरकारी पक्षाची मागणी विशेष न्यायालयात मान्य केली आहे. डॉ पायल तडवी यांनी वारंवार तक्रारी करूनही डॉक्टर चिंग यांनी तिन्ही आरोपी डॉक्टरांविरुद्ध कोणतीही कारवाई न केल्यामुळे, आरोपींनी …

Read More »

स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातील आरोपीची माहिती देणाऱ्यास १ लाखाचे बक्षिस आरोपीच्या शोधासाठी पुणे पोलिसांकडून ड्रोन, डॉग स्कॉडचा उपयोग

पुणे शहर पोलिसांनी मंगळवारी स्वारगेट डेपो येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या ३७ वर्षीय आरोपी दत्तात्रय रामदास गाडे यांची माहिती देणाऱ्याला १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. पोलिसांनी बुधवारी शिरूर तालुक्यातील गुणट गावातील रहिवासी गाडे यांचे छायाचित्र देखील जारी केले, ज्यांच्यावर …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका, विमान शोधणारे पोलिस बलात्काऱ्याला अद्याप जेरबंद…लाजीरवाणी गोष्ट प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा कळस

पुणे येथील स्वारगेट एसटी बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये पहाटेच्यावेळी एका २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुणेसह महाराष्ट्र हादरले. या घटनेचे पडसाद संपूर्ण राजकिय वर्तुळातून उमटत असून पुणे पोलिस, पालकमंत्री अजित पवार यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांच्या कार्यक्षमतेवर आणि सरकारच्या काम करण्याच्या पद्धतीवर प्रश्न …

Read More »