Tag Archives: aditya thackeray

राज्य सरकारचा मोठा निर्णयः वढु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांचे होणार भव्य स्मारक स्मारकाच्या कामाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंजूरी

मराठी ई-बातम्या टीम वढु बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक उभारणीच्या कामाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज तत्वत: मंजूरी दिली. छत्रपती संभाजी महाराजांचे साकारण्यात येणारे स्मारक त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारे, त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे, भव्य दिव्य असले पाहिजे. या स्मारकाच्या आराखड्यासाठी स्पर्धेचे आयोजन करुन त्यातून सर्वोत्कृष्ट …

Read More »

मुंबई शहर जिल्ह्याच्या २४० कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक

मराठी ई-बातम्या टीम मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीत मुंबई शहर जिल्ह्याच्या सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी २४० कोटी रूपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली. पालकमंत्री तथा वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली. सन २०२१-२२ साठी मुंबई शहर जिल्हा नियोजन विभागाचा १८० …

Read More »

राज्यात ओमायक्रोन रूग्णांची संख्या १७ वरः मुंबईत आढळले तीन रूग्ण पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी ४ रूग्ण सापडले

मराठी ई-बातम्या टीम कल्याण, पिंपरी चिंचवड नंतर आता ओमायक्रोन विषाणूचा शिरकाव मुंबईतही झाला असून मुंबईत आज एकदम तीन रूग्ण आढळून आल्याची माहिती पुढे आली असून हे तिघेही दक्षिण आफ्रिका खंडातील देशातून प्रवास करून आलेले होते अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या ताज्या अहवालानुसार ,आज राज्यात ओमायक्रॉन …

Read More »

शेलारांचा सवाल, महाराष्‍ट्रातील तरूणांना केवळ वडापाव विकायला सांगणार आहात काय? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीवरून भाजपाची टीका

मुंबई: प्रतिनिधी महाराष्‍ट्र दौ-यावर असणा-या पश्‍चि‍म बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी आणि महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्र्यांच्‍यावतीने त्‍यांची भेट घेणारे मंत्री आदित्‍य ठाकरे यांच्‍यात झालेल्‍या बैठकीची अधिकृत माहिती महाराष्‍ट्र शासनाने जाहीर करावी. हे एक कटकारस्‍थान असून इथले उद्योग पश्चिम बंगालमध्‍ये घेऊन जाण्‍यास सत्‍ताधारी शिवसेना मदत तर करीत नाही ना? असा सवाल भाजपा नेते आमदार …

Read More »

राज्याची जगासमोर प्रतिमा पब, पेग, पार्टी आणि पेंग्विन भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला आज दोन वर्षे झाली. दोन वर्षाच्या सरकारच्या कालावधीचे वर्णन करायचे झाले तर आघाडी सरकार फक्त “पुत्र, पुत्री आणि पुतण्या” याभोवतीच फिरणारं असल्याची टीका भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी आज येथे केली. आघाडी सरकारच्या दोन वर्षा निमित्ताने आज प्रदेश भाजपा कार्यालयात भाजपा नेते …

Read More »

कोणताही त्रास आणि अडथळ्याविना प्रवास करणे मुंबईत शक्य होणार सार्वजनिक वाहतूक नीटनेटकी, दर्जेदार असणे चांगल्या परिवहन व्यवस्थेचा कणा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: प्रतिनिधी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था स्वच्छ, नीटनेटकी व उत्तम दर्जाची असेल तर लोकांचा त्यावरच विश्वास वाढून चांगली परिवहन व्यवस्था आकारास येऊ शकते असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. वाढत्या लोकसंख्येचा अभ्यास करून भविष्यातील मुंबई महानगराचा वाहतूक आराखडा तयार करतांना सार्वजनिक वाहतूकीचे स्थान मोठे आहे असेही ते म्हणाले. एमएमआरडीएच्या सर्वंकष …

Read More »

आणि शिवसेनेची शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याची परंपरा झाली खंडीत प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी दिली माहिती

मुंबई: प्रतिनिधी १९६६ साली शिवसेनेची स्थापना झाल्यापासून जवळपास २५ वर्षाहून अधिक काळ दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर होत आला आहे. मात्र मागील वर्षापासून कोरोनामुळे दसरा मेळावा शिवतीर्थावर झाला नाही. मात्र यावर्षी कोरोना बाधितांच्या संख्येत चांगलीच घट आल्याने यंदाच्यावर्षी तरी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात …

Read More »

जमिनीवरील कायदे आपले पण… नियम न पाळल्यास निसर्ग न्याय ही करतो वन्यजीव सप्ताहाच्या शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी आपण विविध दिनविशेष साजरे करतो त्या विषयाची उत्सुकता आणि आस्था त्या दिवसापूरती नको. वन, वन्यजीव आणि पर्यावरणाप्रती लोकांमध्ये जशी जनजागृती झालीच पाहिजे तशीच ती राजकीय नेत्यांमध्ये ही झाली पाहिजे असे सांगत जमिनीवरील कायदे आपले आहेत. पण निसर्गाचे नियम वेगळे असून ते नियम न पाळल्यास निसर्ग आपल्या पध्दतीने न्याय …

Read More »

अजित पवार म्हणाले, आम्हाला कळायचंच नाही हे काय चाललंय… पर्यटन विभागाच्या बजेटचा सांगितला किस्सा

मुंबईः प्रतिनिधी अनेकजण देश-विदेशात फिरुन आलेले आहेत. परंतु अनेकांनी महाराष्ट्र अजून नीट बघितलेला नाही. जग फिरण्याआधी पहिल्यांदा आपला महाराष्ट्र फिरला पाहीजे. आपली पर्यटन स्थळ बघितली पाहीजे. त्यानंतर जग बघायला बाहेर पडा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पर्यटन दिनाचे औचित्य साधत सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी …

Read More »

वरळीत थ्रीडी मॅपिंगचा ढोल आणि मुंबईच्या रस्त्यांवर खड्ड्यात झोल मुंबईतील ९२७ खड्डे बुजवायला ४८ कोटी?-भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार

मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील सुमारे २ हजार किमी च्या रस्त्यावर केवळ ९२७ खड्डे आहेत असे महापालिका सांगते आहे. मग खड्डे भरण्यासाठी जे ४८ कोटींची तरतूद केली ती याच ९२७ खड्यांसाठी का? असा उपरोधिक सवाल करीत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी वरळीत थ्रीडी मॅपिंगचा ढोल आणि मुंबईच्या रस्त्यावर खड्ड्यात झोल …

Read More »