राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जलसंपदा विभाग मोहित कंबोज हा चालवत असल्याचा गंभीर आरोप करत हा कोण आहे मोहित कंबोज त्याला विचारल्याशिवाय विभागाचे आयएएस अधिकारी दिपक कपूर हे पाणीही पीत नाहीत असा गंभीर आरोप आज विधान परिषदेत केला. त्यामुळे विधान परिषदेत सरकारबाहेरील मात्र …
Read More »उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सदस्यांच्या ठरावावर सह्या
निष्ठावान म्हणून शिवसेना उबाठा पक्षात ओळखल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मागील काही काळात वादग्रस्त विधाने केली आहेत. तसेच उपसभापती पदावर कायम राहता यावे यासाठी शिवसेना उबाठा पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांची आमदारकी धोक्यात आली. मात्र त्यांच्या अपात्रतेसंदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास …
Read More »विधान परिषदेत अबु आझमी, कोरटकर, सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित सत्ताधाऱ्यांकडून माईक बंद करण्याचा प्रयत्न- अंबादालन दानवे यांचा आरोप
विधान परिषदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर भाजपाच्या प्रविण दरेकर यांनी अबु आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य केल्याचा मुद्दा उपस्थित करत अबु आझमी यांच्यावर राज्य सरकारच्यावतीने कारवाई करावी अशी मागणी केली. त्यानंतर शिवसेना उबाठाचे तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अबु आझमी यांच्या वक्तव्यासह शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी …
Read More »माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले… अंबादास दानवे यांनी मुद्दा उपस्थित करत कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली
अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा आजचा पहिलाच दिवस मागील राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतरही राज्य सरकारने अद्याप माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द केली नाही की मंत्री पदाचा राजीनामा घेतला नाही यावरून दोषी ठरलेल्या माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा कधी घेणार असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान …
Read More »अंबादास दानवे यांचा आरोप, शेतकरी विरोधी, विसंवादी सरकार म्हणून चहापानावर बहिष्कार मंत्र्यांना पाठीशी घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधक आक्रमक
सरकार हे शेतकरी विरोधी असून तीन बाजूला तीन तोंड असणारे हे विसंवादी सरकार असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत जनतेला न्याय देण्याची भूमिका बजावत नसल्यामुळे आणि सत्ताधारी पक्ष सातत्याने विरोधी पक्षाला सापत्निकतेची वागणूक देत असल्यामुळे सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतल्याचे विरोधी …
Read More »अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांचे सरकारला पत्र, केवळ चहापानाचा फार्स अंबादास दानवे यांचा खडा सवाल, विसंवाद आहे म्हणायचे आणि संवादही साधायचा नाही
अर्थसंकल्पिय अधिवेशनाला उद्या सोमवारपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांच्यावतीने विरोधी पक्षातील सर्वपक्षिय नेत्यांची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीनंतर विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत प्रथेप्रमाणे दरवेळी प्रमाणे राज्य सरकारने यावेळी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला. मात्र एकाबाजूला कायदेशीर तरतूदींचे पालन करायचे नाही दुसऱ्याबाजूला विरोधकांच्या सूचनांचा आदरही करायचा नाही मग …
Read More »नीलम गोऱ्हे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप, मात्र संजय राऊत यांच्या प्रत्युत्तरावर सावध दिल्लीतील साहित्य संमेलनात आम्ही कसे घडलो कार्यक्रमात बोलताना गोऱ्हे यांचा आरोप
९८ व्या अखिल भारतीय साहित्य समंलेनाच्या निमित्ताने दिल्लीत सध्या राज्यातील साहित्यिक, प्रेक्षक-वाचक यांच्याबरोबरच राजकिय नेत्यांची वर्दळही सुरु आहे. आज साहित्य संमेलनस्थळी मी कसा घडलो या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना बोलविण्यात आले. यावेळी नीलम गोऱ्हे यांच्या मुलाखत वजा कार्यक्रम पार पडली. यावेळी …
Read More »आदित्य ठाकरे यांचा सवाल, दावोस दौऱ्यातल्या कंपन्या भारतातल्या तर मग मॅग्नेटिक महाराष्ट्र का नाही ? मंत्री रुसून गावी! आणि त्याच गॅंगमधले दुसरे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दावोसला
आपल्या राज्यात आणि देशात होणाऱ्या कोणत्याही गुंतवणुकीचे स्वागत आहेच. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ह्यांच्या दावोस दौऱ्याचे प्लॅनिंग त्यांच्या कार्यालयाकडून योग्य प्रकारे झाले नसल्याचे दिसते अशी टीका शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केले. पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्या दरम्यान २९ कंपन्यांशी सामंजस्य करार (MoUs) झाले आहेत. …
Read More »मुंबई विद्यापीठाच्या समस्यांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे आश्वासन
मुंबई विद्यापीठातील शिक्षकांची रिक्त पद, महाविद्यालयांचा नामांकनाचा विषय, एमएमआरडीएकडून विद्यापीठ परिसरात रखडलेली विकासकामे आदी मुंबई विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत शासन दरबारी मांडून त्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले. आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना कँम्पस येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सिनेट सदस्यांसोबत भेट देऊन विद्यार्थ्यांच्या …
Read More »अंबादास दानवे यांची मागणी, खासगी बसेस खरेदी स्थगितीची अधिकृत सूचना काढा भाडेतत्वावरील बस खरेदीच्या नावाखाली सरकारला लुटण्याचा प्रयत्न
राज्य परिवहन अर्थात एसटी महामंडळाकडून १३१० खासगी बसेस भाडेतत्त्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री यांनी स्थगिती देऊन चौकशी करण्याचे वृत्त प्रकाशित झाले असले तरी याबाबत सरकारने कोणतीही अधिकृत सूचना काढली नाही. त्यामुळे सरकारने या बसेसच्या स्थगिती व चौकशीबाबत अधिकृत सूचना काढावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. पुढे बोलताना अंबादास …
Read More »
Marathi e-Batmya