मुंबई: प्रतिनिधी मागील दिड वर्षापासून राज्याच्या ग्रामीण भागातील आठवडी बाजार, कला केंद्रे, यात्रा आदी गोष्टी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेले आहेत. मात्र शहरी भागात सध्या काही निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. त्या धर्तीवर या बंद करण्यात आलेल्या गोष्टी पुन्हा सुरु करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून यासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता …
Read More »कोरोना: २ री लाट आटोक्यात तर १८ ते ४४ वयोगटातील फक्त २५ टक्क्यांचे लसीकरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना परिस्थितीवर झाली चर्चा
मुंबई: प्रतिनिधी सततच्या निर्बंधामुळे आणि नागरीकांच्या सजगतेमुळे राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असून नंदूरबारमध्ये आज चक्क एकही बाधित रूग्ण आढळून आला नाही. तर विदर्भातील वाशिम, यवतमाळ, भंडारा, वर्धा, गोंदिया उत्तर महाराष्ट्रातील धुळे या सहा जिल्ह्यात १० पेक्षा रूग्ण कमी आढळून आले. तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा तर विदर्भातील …
Read More »खुषखबर : वैद्यकीय शिक्षण विभागातील भरतीची जाहिरात लवकरच प्रसिध्द प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण विभागासाठी आवश्यक असणाऱ्या वर्ग १ आणि वर्ग २ ची पदभरती करण्यात येत असून ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. तर वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत वर्ग ३ पदभरतीबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे. तर वर्ग ४ ची पदभरती अधिष्ठाता स्तरावरुन करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण …
Read More »अनाथांना आरक्षणासह या महत्वाच्या प्रश्नी राज्य मत्रिमंडळाने घेतले हे निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली बैठक
मुंबई: प्रतिनिधी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनाथ मुलांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देताना याची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृह उलपब्ध करण्याच्या धोरणातही बदल करत दुय्यम आणि मुद्रांक निरिक्षक पदे लोकसेवा आयोगा मार्फत भरण्याच्या निर्णयासह काही महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले. ते निर्णय …
Read More »कोविड काळात सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांना शुल्क माफी आणि प्रोत्साहन भत्ता शासन सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी म्हणजेच निवासी डॉक्टर कोविड काळात अहोरात्र काम करीत आहे. या निवासी डॉक्टरांना वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क माफी आणि प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. मंत्रालयात महाराष्ट्र निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी …
Read More »राज्यातील या कलाकार, कलापथकांना मिळणार आर्थिक मदत आणि अनुदान पॅकेज राज्यातील शेकडो लोककलावंतांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील शेकडो लोककलावंत, लोक कलाकार, लोककला पथकांचे चालक, मालक, निर्माते यांना कोवीड आर्थिक संकटाला मोठे तोंड द्यावे लागले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली यात मुख्यमंत्र्यांनी कलाकारांसाठी एक रकमी कोविड दिलासा पॅकेज देण्यास मान्यता दिली असून यासंदर्भात विस्तृत …
Read More »आशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा राज्य शासनाचा बहुमानच- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
मुंबई : प्रतिनिधी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची एकमताने निवड करणे हा राज्य सरकारचा बहुमानच असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. तर ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक आहे, या शब्दांत आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राज्य शासनाचा २०२१ चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. …
Read More »५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी गेल्या दीड वर्षांपासून आपण कोविडशी मुकाबला करीत आहोत. अजूनही कोविडची तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजनची आवश्यकता मोठया प्रमाणावर निर्माण होत आहे. हे लक्षात घेता येणाऱ्या काळात ५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे बंधनकारक करण्यात आल्याचे वैद्यकीय …
Read More »कोरोना लस निर्मितीसाठी हाफकिनला प्रतिक्षा केंद्राच्या निधीची राज्य सरकारकडून निधीची तरतूद मात्र केंद्राचे निधीबाबत कोणतेच उत्तर नाही
मुंबईः विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांवरील लस निर्मितीचा येणारा ताण कमी करण्यासाठी भारत बायोटेकने तयार केलेली कोव्हॅक्सीन (Covaxin) लस हाफकिन इन्स्टीट्युटमध्ये निर्मिती करण्यास उशीरा का होईना कोविड सुरक्षा योजनेतंर्गत परवानगी दिली. त्यासाठी केंद्र- राज्याच्या हिश्शाने १५४ कोटी रूपयांचा प्रकल्प खर्च तयार करण्यात आला. परंतु …
Read More »मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत २० हजार जणांना प्रशिक्षण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : प्रतिनिधी कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध ३६ अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यात २० हजार इतके प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्राचे महत्व …
Read More »
Marathi e-Batmya