पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत मागील काही महिन्यापासून न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर न्यायालयाने पुन्हा राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली. दरम्यान, ईडी अर्थातच सक्तवसुली संचालनालयाने विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून या आरोपपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचंही नाव …
Read More »काँग्रेस म्हणते, शिंदे-फडणवीसांना मोदींचा वाढदिवस लक्षात पण स्वातंत्र्यसैनिकांचा विसर मराठवाड्यासह कुठेच दिसली नसल्याचे सचिन सावंत यांचे ट्विट
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाला आजच ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. प्रथेप्रमाणे या दिवशी मुख्यमंत्री पदावर असलेल्या नेत्याकडून औरंगबाद किंवा मराठवाड्यात दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर जायचे असल्याने त्यांनी अवघे १५ मिनिटे औरंगाबादेत हजेरी लावत तेलंगणा राज्यात निघून गेले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, होय मी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा हस्तक पैठण येथील सभेत विरोधकांबरोबर शिवसेनेवरही सोडले टीकास्त्र
औरंगाबादेतील पैठण येथील जाहिर सभेला गर्दी व्हावी म्हणून महिला व बाल विभाग विभागाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकावरून आणि त्यातच सभेला येणाऱ्यांना प्रति माणशी २५० रूपये देण्याच्या एक ऑडिओ क्लिपमुळे वादात सापडलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आज झाली. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रिया सुळे, शिवसेना आदी विरोधकांवर निशाणा …
Read More »अमित शाह यांच्या आरोपाला अरविंद सावंतांचे प्रत्युत्तर, उपकाराची जाणीव ठेवा उध्दव ठाकरे आणि शिवसेनेवरील टीकेला दिले उत्तर
सध्या मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उध्दव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिल्याचा आरोप करत निवडणूकी आधी मोदी आणि फडणवीस यांच्या नावावर मते मागितली. निकाल हाती आल्यानंतर मात्र त्यांनी विश्वासघात केल्याचाही आरोप केला. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचं लक्ष्य १५० जागा जिंकण्याचं असेल, अशी घोषणा केली. तसेच …
Read More »गेले अशोक चव्हाण कुणीकडे? जाहीर केलेल्या अधिकृत पत्रकार परिषदेला गायब आज सोमवारच्या पत्रकार परिषदेला अशोक चव्हाणांची दांडी
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा मुंबईत येताच काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आजच्या काँग्रेसच्या पत्रकार परिषदेस उपस्थित राहू शकते नाहीत. आयोजित केलेल्या महत्वाच्या पत्रकार परिषदेस चव्हाण यांनी दांडी मारल्यामुळे काँग्रेसच्या गोटात अधिक खळबळ माजली आहे. आता हाही योगायोग असावा का असे बोलले जाते. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे …
Read More »अमित शाह यांचा लालबाग आणि वांद्रे गणपती दर्शन दौरा सरकारी का खाजगी? लालबाग राजाच्या दर्शन आणि आशिष शेलार यांच्या मंडळाच्या गणरायाच्या दर्शनाची माहिती व जनसंपर्क विभागाकडून बातमी
देशाचे केंद्रीय मंत्री अमित शाह हे गणेशोत्सवानिमित्त मुंबई दौऱ्यावर आले. मात्र शासकिय प्रोटोकॉलप्रमाणे खाजगी दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय नेते किंवा राज्यातील मंत्र्याच्या दौऱ्याचे कोणतेही वृत्त अर्थात बातमी शासकिय विभागाकडून जारी करायचे नाही असे संकेत आहेत. मात्र राज्यात शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांचे भाजपाच्या पाठिब्यांवर असलेले सरकार अस्तित्वात आहे. मात्र या शासकिय …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार, जीवनातील शेवटची निवडणूक समजून लढा.. अभी नही तो कभी नही अशा आवेशात लढा
मुंबई दौऱ्यावर आलेले भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपाच्या पदाधिकारी आणि आमदारांसमोर बोलताना उध्दव ठाकरे यांनी धोका दिल्याचा आरोप करत त्यांना जमिन दाखविण्याची वेळ आल्याचा इशारा दिला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकत म्हणाले, ‘अभी नही तो कभी नही, अशा आवेशात लढा. आता …
Read More »नाना पटोले म्हणाले, अमित शहा यांना गणराया देश हिताचे काम करण्याची सदबुद्धी देवो देशाची एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी ७ सप्टेंबरपासून भारत जोडो यात्रा!: जितु पटवारी
सध्या देशातील परिस्थिती चिंतेची असून विविधेत एकता असलेल्या देशात आज द्वेषाचे, विषमतेचे बिज पेरले जात आहे. देशाची अखंडता धोक्यात आली आहे. महागाई, बेरोजगारीसारखे प्रश्न बिकट झाले आहेत परंतु केंद्रातील मोदी सरकार या ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून इतर मुद्दे पुढे केले जात आहेत. देशाची अखंडता अबाधित रहावी यासाठी काँग्रेस पक्ष राहुलजी …
Read More »अमित शाह यांचा आरोप, उध्दव ठाकरेंनी धोका दिला… जमिन दाखविण्याची वेळ आलीय भाजपा आमदारांच्या बैठकीत अमित शाह यांचा शिवसेनेवर हल्लाबोल
राज्यात शिवसेनेतील बंडखोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थानापन्न झाले. त्यानंतर गणेशोस्तवाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज भाजपा आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे नाव अमित शाह यांनी घेत उध्दव ठाकरे यांनी धोका दिला …
Read More »राज ठाकरे-अमित शाह भेट होणार का? फडणवीस यांनी दिले ‘हे’ संकेत आयत्या वेळी होवू शकते भेट
राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या मदतीने उलथवून टाकल्यानंतर भाजपा नेत्यांकडून सातत्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेण्याचा सपाटा सुरु आहे. त्यातच गणेशोत्सवानिमित्त तर २४ तासाच भाजपाच्या तीन नेत्यांनी राज ठाकरे यांच्या घरी भेटी दिल्या. त्यानंतर मुख्यमंत्री …
Read More »
Marathi e-Batmya