Tag Archives: amit shah

चुनाव जितने का हम पे छोडो, बाकी हम जो बोलते है उतनाही करो भाजप खासदाराची माहीती

मुंबईः प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आणि त्यांच्या खासदारांकडून जय्यत तयारी करण्यात येत असतानाच भाजपचे बरेच खासदार सध्या संभ्रमावस्थेत आणि भेदरलेल्या अवस्थेत आहेत. पुलवामा येथील दहशतवादी हल्ला, पाकिस्तानातील सर्जिकल स्ट्राईक यावरून भाजपच्या खासदारांमध्ये चलबिचल असतानाच भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शाह हे चुनाव जितने का हम पे छोडो, बाकी हम …

Read More »

दिल्लीतून होणार भाजपच्या खासदारांचा प्रचार प्रत्येक राज्यातील राजकिय, जातनिहाय आणि प्रश्नांची माहिती मुख्यालयात जमा

मुंबई: प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकिय पक्षांनी तयारी सुरु केलेली आहे. मात्र सत्ताधारी भाजपने मोठ्या प्रमाणावर तयारी सुरु केल्याचे दिसून येत असून यंदाच्या निवडणूकीत संख्याबळ वाढविण्यासाठी प्रत्येक राज्यातील स्थानिक पातळीवरील खासदाराच्या प्रचारासाठी दिल्लीतून यंत्रणा हालविण्यात येणार असल्याची माहिती भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली. सद्यपरिस्थितीत प्रत्येक राज्यातील भाजपची मूळ असलेली …

Read More »

चला, आता निवडणूकीतील विजयाचा मार्ग मोकळा

शिवसेना-भाजपचे खासदार, मंत्री, आमदार झाले निर्धास्त मुंबईः प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकीत विजय मिळेल का ?, युती होईल का ?, युती न झाल्यास काय करायचे ? असे एक ना अनेक प्रश्नांच्या भीतीने सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या खासदार, मंत्री आणि आमदारांना पिच्छा पुरविला. मात्र काही दिवसांपूर्वी युतीची भाजपाध्यक्ष अमित शाह, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे …

Read More »

भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे १९-२० रोजी नागपूरात राष्ट्रीय महाअधिवेशन

अधिवेशनाला भाजपाध्यक्ष अमित शाह, गडकरी उपस्थित राहणार मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती मोर्चातर्फे १९ व २० जानेवारी रोजी नागपूर येथे राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले असून या महाअधिवेशनाला १२०८ अनुसूचित जातीतील जाती सहभागी होणार आहेत. तसेच भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे देशभरातील सहा हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील तर २० जानेवारी …

Read More »

विधानसभा-लोकसभेच्या निवडणूका एकत्रित घेणार ? जनतेचे जनमानस जाणून घेण्यासाठी कंत्राटी नोकर भरतीची सरकारची जाहीरात

मुंबईः प्रतिनिधी संसदेच्या लोकसभा सभागृहाची मुदत येत्या मे २०१९ रोजी संपत आलेली आहे. त्यामुळे देशभरातील सर्वच राजकिय पक्षांकडून लोकसभेच्या निवडणूकीची पूर्व तयारी सुरु केलेली असताना केंद्रातील भाजप सरकारसोबतच राज्यातील विधानसभेची निवडणूक घेण्याच्या हालचाली पक्षीय पातळीवर सुरु आहे. मात्र महाराष्ट्रात लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणूकांना सामोरे जाण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. …

Read More »

राज्यात भाजपला एकहाती विजय मिळणे अवघड रा.स्व.संघाच्या सर्वेक्षणात माहिती पुढे

मुंबईः प्रतिनिधी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीला काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहीलेला आहे. या निवडणूकीत २०१४ ची पुनरावृत्ती होणार की विरोधी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेचा सोपान मिळणार याची चाचपणी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला लागली आहे. त्यादृष्टीने संघाने सुरु केलेल्या सर्वेक्षणात विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा उधळलेला वारू रोखला जाणार असल्याची …

Read More »

पंतप्रधान मोदींकडून ४६ महिन्यात जाहीरातबाजीवर ४ हजार कोटींची उधळपट्टी चोहोबाजूंच्या टिकेनंतर चालू वर्षाच्या खर्चात २५ टक्यांची कपात

मुंबई : प्रतिनिधी देशाच्या सर्वोच्च पदी अर्थात पंतप्रधान पदी विराजमान होण्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारकडून जाहीरातबाजीवर करण्यात येत असलेल्या खर्चावर प्रश्न विचारले जात होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ४६ महिन्याच्या कारकिर्दीत सरकार आणि स्वत:ची प्रतिमा उंचावण्यासाठी एक नव्हे, दोन नव्हे तर ४ …

Read More »

राज्याच्या राजकारणात भाजपचे गरज सरो वैद्य मरो निस्पृह आणि स्वच्छ चारित्र्याच्या चिंतामण वनगांचा वारसदार पैसेवाला ठरणार

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात आतापर्यंत विद्यमान आमदार, खासदार किंवा कोणताही लोकप्रतिनिधीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्या लोकप्रतिनिधीने केलेल्या कामाची पावती अथवा त्याने केलेल्या कष्टाला पोहोच म्हणून त्या व्यक्तीच्या घरातील कोणाही एकाला राजकिय वारसदार म्हणून त्या राजकिय पक्षाकडून जाहीर केले जाते. परंतु भाजपने त्यांच्या पक्षाचे निष्पृह आणि स्वच्छ चारित्र्याच्या व …

Read More »

भविष्यकाळातील कोणत्याही निवडणूकीत भाजपा-शिवसेना युती नाहीच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत शिवसेनेबरोबरील युती कायम रहावी यासाठी भाजपकडून शिवसेनेला चुचकारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र शिवसेनेकडून स्वबळावर निवडणूका लढविण्याचा निर्धार कायम असतानाच यापुढे भविष्यातील कोणत्याही निवडणूकीत युती करणार नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले. त्यामुळे भाजप आणि शिवसेने दरम्यान युती होणार नसल्याचे यानिमित्ताने …

Read More »

न्या. लोयांच्या निधनावरून राजकारण करणाऱ्या राहुल गांधींनी देशाची माफी मागावी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी न्या. लोया यांच्या निधनावरून राजकीय कारस्थान करण्याचा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा डाव सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे उघड झाला असून राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये गुरुवारी केली. रावसाहेब पाटील- दानवे पुढे म्हणाले की, या विषयावरून …

Read More »