Tag Archives: anil parab

संपामुळे झालेले नुकसान एसटी कामगारांकडून वसुल करणार नाही महामंडळाचा कोणताही निर्णय नाही- एसटी महामंडळाची स्पष्टोक्ती

एसटी संपामुळे महामंडळाचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान होत असले तरी हे नुकसान कर्तव्यावर रूजू झालेल्या कामगारांकडून वसुल करण्याचा महामंडळाने कोणताही निर्णय घेतलेला नाही, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी स्पष्टपणे सांगितले. एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या तीन महिन्यांहून …

Read More »

एसटी संप: सरकारच्या उत्तरावर न्यायालय म्हणाले… शुक्रवारी होणार पुढील सुनावणी

मागील तीन महिन्याहून अधिक काळ सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरु आहे. तसेच एसटीच्या विलनीकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुणावनीही सुरु आहे. विलनीकरणाबाबत समिती स्थापन करून तीचा अहवाल सादर करण्यास न्यायालयाने दिलेल्या १२ आठवड्यांची मुदत संपल्यानंतर राज्य सरकारने आणखी सात दिवसांची मुदत न्यायालयाकडे मागितली. त्यानुसार आज सुणावनीवेळी विलनीकरण सोडून जवळपास …

Read More »

राष्ट्रपतींची मंजूरी नाहीच: अखेर महाराष्ट्र परिवहन कायदा दुरूस्तीचे विधेयक मागे एसटीसाठीचे स्वतंत्र वाहतूक धोरण बारगळले- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील वाहतूक व्यवस्थेच्या अनुषंगाने आणि एसटी महामंडळाच्या आर्थिक उन्नतीच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण असलेल्या महाराष्ट्र परिवहन कायद्यातील दुरूस्ती विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही न केल्याने आणि राज्यात केंद्राचा मोटार वाहन कायदा लागू करण्यात आल्याने अखेर राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठविलेले विधेयकच मागे घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. २०१७ साली …

Read More »

एसटीच्या तोट्याला नेमके कोण जबाबदार? समितीच्या अहवात आले हे उत्तर २०१७ पासून राज्याचे परिवहन विधेयक राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी प्रलंबित

मराठी ई-बातम्या टीम जवळपास दिड महिन्याहून अधिक काळ राज्यातील एसटी कर्मचारी संपावर ठाम असून विलिनीकरणाची मुख्य मागणी आहे. परंतु एसटी महामंडळाच्या वाढत्या आर्थिक नुकसानीला स्वत: एसटी महामंडळाचा एकाधिकारशाही कारभार आणि देशाचे राष्ट्रपती जबाबदार असल्याची माहिती सार्वजनिक उपक्रम समितीने विधिमंडळाला सादर केलेल्या अहवालात अप्रत्यक्ष नमूद केले आहे. राज्य सरकारचा अंगीकृत उपक्रम …

Read More »

राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागूः जमावबंदी सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत.  ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील. विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे. जगातील ११० देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध …

Read More »

अजित पवार म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांनो विलिनीकरणाचा मुद्दा डोक्यातून काढून टाका संपामुळे सर्वाचेंच हाल- पहिल्यांदाच केले आवाहन

मराठी ई-बातम्या टीम मागील दिड महिन्याहून अधिक काळ राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यादाच मत मांडत म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांनो विलिनीकरणाचे डोक्यातून काढून टाका असे आवाहन त्यांनी विधानसभेत करत एकप्रकारे विलिनीकरण शक्य नसल्याचे ध्वनित केले. पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना विधानसभेत अजित पवार बोलत होते. …

Read More »

गुजर यांच्या घोषणेनंतर मंत्री परिवहन मंत्री परब म्हणाले… गुन्हे दाखल झालेल्यांवर कारवाई पूर्ण झाल्यानंतरच गुन्हे मागे घेवू

मराठी ई-बातम्या टीम एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे अजय गुजर यांच्याबरोबरील चर्चेनंतर गुजर यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली होती. त्यांच्यावरील कारवाई कामगार कामावर आल्यानंतर मागे घ्यावी. त्यावर कामगार कामावर आले आणि डेपो चालू झाले तर आम्ही कारवाई मागे …

Read More »

एसटी विलिनीकरणाचा निकाल २२ डिसेंबरला, मात्र महामंडळ म्हणते अवघड अंतिम निकाल काय लागणार याबाबत एसटीबाबत काय निकाल लागणार याची उत्सुकता

मराठी ई-बातम्या टीम जवळपास महिन्याहून अधिक काळ एसटीच्या विलिनीकरणाच्या मुख्य प्रश्नावरून पुकारण्यात आलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अद्यापही संपुष्टात आलेले नाही. त्यातच आज झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत पुढील सुणावनी २२ डिसेंबरला घेणार असल्याचे सांगत आज दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतला. यावेळी एसटी महामंडळाने केलेल्या युक्तीवादावेळी राज्य सरकारी वकीलांनी आतापर्यत कर्मचाऱ्यांना …

Read More »

रामदास कदम यांच्या आरोपावर अनिल परबांचे सूचक वक्तव्य… मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही

मराठी ई-बातम्या टीम शिवसेना नेते रामदास कदम यांनी अनिल परब यांना गद्दार म्हणून आरोप करत मला आणि माझ्या मुलाला संपविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, मी एक शिवसैनिक आहे. मी यावर काहीही बोलू इच्छित नाही. नो …

Read More »

पडळकरांचा आरोप, एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळवून जमिनी… अनिल परबांना विश्वास जिंकण्यास अपयश

मराठी ई-बातम्या टीम एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देवूनही अद्यापही कर्मचाऱ्यांचा संप सुरु राहिला असून या संपावर तोडगा काढण्यात परिवहन मंत्री अनिल परब यांना अपयश आले आहे. गिरणी कामगारांच्या संपाप्रमाणे कर्मचाऱ्यांचा संप चिघळवून एसटी महामंडळाच्या शहरातील कोट्यावधींच्या जमिनी हडपण्याचा डाव परब यांचा असल्याचा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. पहिवहन मंत्री …

Read More »