Breaking News

Tag Archives: Ashwini vaishnaw

वन नेशन, वन इलेक्शन प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी देशात संसद आणि विधानसभा निवडणूका होणार

काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीपूर्वी देशात वन नेशन, वन इलेक्शन पद्धत लागू करण्याची चर्चा भाजपाकडून सुरु करण्यात आली होती. त्यातच देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीनेही यासंदर्भातील अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना सादर केला होता. त्यानंतर आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वन नेशन, वन इलेक्शन प्रस्तावाला आज मंजूरी …

Read More »

देशातील २० शहरांना स्मार्ट औद्योगिक शहरे म्हणून केंद्राची मान्यता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

केंद्रीय मंत्रिमंडळाने २८,६०२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह विविध राज्यांमध्ये १२ नवीन औद्योगिक स्मार्ट शहरांच्या स्थापनेला हिरवी झेंडी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी एका मीडिया ब्रीफिंग दरम्यान तपशीलांची रूपरेषा सांगून भारताच्या देशांतर्गत उत्पादन क्षमतांना बळकट करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. १२ नियोजित शहरांपैकी, आंध्र प्रदेश दोन, तर बिहार …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळाने विज्ञान धारा योजनेला दिली मंजूरी १० हजार ५७९ कोटी रूपयांचा निधीही मंजूर

केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘विज्ञान धारा’ योजना सुरू करून विज्ञान आणि तंत्रज्ञान निधीमध्ये मोठ्या फेरबदलाला मंजुरी दिली. हा नवीन उपक्रम विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षमता, संशोधन आणि नवकल्पना वाढविण्याच्या उद्देशाने तीन विद्यमान छत्री योजनांचे एका एकीकृत केंद्रीय क्षेत्रातील कार्यक्रमातंर्गत विलीनीकरण करण्यात येणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या योजनांचे एकाच योजनेत विलीनीकरण …

Read More »

मोठी बातमीः केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवी युनिफाईड पेन्शन योजना २३ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार लाभः केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

केंद्राने शनिवारी युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) नावाची नवीन पेन्शन योजना जाहीर केली असून या योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना खात्रीशीर पेन्शन, कौटुंबिक निवृत्ती वेतन आणि खात्रीशीर किमान पेन्शन मिळणार आहे. ही नवीन पेन्शन योजना १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

रेल्वेच्या ९ हजार ७८४ पुलांची दुरूस्ती, पुर्नबांधणी करण्यात आली रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे लोकसभेत उत्तर

भारतीय रेल्वेने एकूण ९,७८४ रेल्वे पुलांच्या दुरुस्ती, मजबुतीकरण, पुनर्वसन किंवा पुनर्बांधणीला मंजुरी दिल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी (३१ जुलै) लोकसभेत लेखी उत्तरात माहिती दिली. महाराष्ट्रातील जुन्या रेल्वे पुलांची दुरवस्था आणि गेल्या तीन वर्षात झालेल्या दुरुस्तीच्या कामांच्या तपशीलाबाबत नऊ खासदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ही घोषणा करण्यात आली. खासदारांनी अलीकडच्या …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, मोदींनी भारताला रेल्वे अपघाताची राजधानी बनविली रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

रेल्वे अपघातात मौल्यवान जीव गेले आणि कितीतरी जखमी झाले. गेल्या काही वर्षांत जवळजवळ प्रत्येक महिन्यात रेल्वे अपघाताच्या घटना होत आहेत. पंतप्रधान मोदींनी भारताला जगातील रेल्वे अपघाताची राजधानी बनविल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. पुढे बोलताना ॲड प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मोदी सरकारकडून …

Read More »

केंद्र सरकारकडून १४ पिकांना एमएसपी जाहिर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी धान, नाचणी, बाजरी, ज्वारी, मका आणि कापूस या १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतींना मंजुरी दिली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नमूद केले की मंत्रिमंडळाने १४ पिकांच्या खर्चाच्या तुलनेत किमान ५०% अधिक एमएसपी MSP मंजूर केला आहे. “आजच्या मंत्रिमंडळात काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या …

Read More »

रेल्वे रुळालगतच्या झोपडपट्ट्यांच्या प्रश्नी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मोठे आश्वासन

महाराष्ट्रातील रेल्वेस्थानके आणि रेल्वेरुळालगत रेल्वेच्या जमिनीवर असणाऱ्या झोपडपट्ट्यांच्या प्रश्नांवर आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी रेल्वे रुळालगत असणाऱ्या झोपड्यांवर निष्कासन कार्यवाही तातडीने थांबवण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली. तसेच रेल्वेरुळालगत ज्या झोपडपट्ट्या आहेत सर्व …

Read More »

कॅगचा दाखला देत सुप्रिया सुळे यांनी केला भंडाफोड, सुरक्षेची रक्कम मसाज मशीन…

ओडिशात २ जून रोजी मोठा रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात २८८ प्रवशांचा मृत्यू आणि ११०० जणांच्यावर गंभीर जखमी झाले होते. या अपघातानंतर केंद्र सरकार आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर चहूबाजूंनी टीकास्र सोडलं जात होतं. पण, ही राजकारण करण्याची वेळ नसल्याचं प्रत्युत्तर अश्विनी वैष्णव यांनी दिलं. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार …

Read More »

ओडिशातील रेल्वे अपघाताच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले जखमींची रूग्णालयात जाऊन केली विचारपूस

ओडिशातील बालासोरा येथे शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत २६१ जणांचे प्राण गेले असून ९०० हून अधिक जण जखमी आहेत. गेल्या दोन दशकातील ही सर्वांत भीषण घटना असल्याचंही म्हटलं जातंय. दरम्यान, याप्रकरणाची पाहणी करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीची माहिती घेतली. शुक्रवारी सायंकाळी ही …

Read More »