Tag Archives: atul londhe

हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, शेतकऱ्यांच्या प्रश्नी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेसचे आंदोलन महानगरपालिका क्षेत्रातील प्रश्नांवर ४ मार्चला महानगरपालिका क्षेत्रात काँग्रेसचे आंदोलन.

भाजपाच्या राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून शेतमालाला हमीभाव मिळत नाही. निवडणुकीच्या काळात भाजपा युतीने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली परंतु अद्याप त्यावर निर्णय घेतला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ३ मार्च रोजी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील विकास कामे व जनतेची …

Read More »

अतुल लोंढे यांचा पलटवार,… आधी भाजपाच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींचे ट्विट नीट पहावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल माफी तर भाजपानेच मागावी

शिवजयंतीच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटवरून भाजपाचे नेते जो आकांडतांडव करत आहेत त्याआधी त्यांनी त्यांचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट नीट पहावे आणि नंतर बोलावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जर कोणी केला असेल तर भाजपानेच वारंवार केला असून त्यांनीच माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …

Read More »

अतुल लोंढे यांची मागणी, शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या अन्नदाता शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्याची हिम्मत होतेच कशी? काही संवेदना आहेत की नाही?

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका कार्यक्रमात बोलताना एक रूपयाची भीक आता भिकारीही घेत पण आम्ही शेतकऱ्यांना एक रूपयात पीक विमा दिल्याचे आक्षेपार्ह वक्यव्य केले. त्यावरून काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पुढे बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, भाजपा युती …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, शाळकरी मुलांना अंडी व फळे देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत का? मध्यान्न भोजन योजनेतील अंडी व फळांसाठी सरकारनेच निधी द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरू

भाजपा युती सरकारने आता शाळकरी मुलांच्या आहारावरच गदा आणली आहे. मध्यान्न भोजन योजनेतून शाळकरी मुलांना आहारातून प्रोटीन मिळावे यासाठी अंडी व फळे दिली जात होती. परंतु भाजपा युती सरकारने आता अंडी व फळांना निधी देण्यास नकार देत शाळा व्यवस्थापनांनी स्वतः खाजगी देणगीदारांकडून पैसे उपलब्ध करावेत असा जीआर काढला आहे. सरकारचा …

Read More »

अतुल लोंढे यांचा आरोप, वाल्मिक कराडला अटक करता न येणे भाजपा सरकारचे अपयश… फडणवीसांच्या नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट, कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

महाराष्ट्र पोलीसांचा मोठा दबदबा व नावलौकिक आहे, मुंबई पोलिसांची तुलना तर स्कॉटलंड यार्डशी केली जायची. अशा सक्षम पोलीस दलाची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी २० दिवस पोलीस व सीआयडीला सापडला नाही, तो शरण आला हे पोलीस दलाचे अपयशच आहे. बीडमधील संघटीत गुन्हेगारीचा गंभीर प्रकार …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, नितेश राणेसारख्या व्यक्तीला मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार आहे का?… धर्मांधता व द्वेषाच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची देशात पिछेहाट

देशाची एकता व अखंडता राखण्याची शपथ घेऊन मंत्री झालेले नितेश राणे केरळला भारताचा पाकिस्तान म्हणतात आणि भारतीय जनता पक्षाला मतदान न करता काँग्रेस व इतर विरोधी पक्षांना मतदान करणाऱ्यांना दहशतवादी म्हणतात, अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का? अशी मागणी करत हे राष्ट्र प्रथम म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे स्पष्ट करावे, …

Read More »

अतुल लोंढे म्हणाले, ईव्हीएम विरोधातील लढाईची दिशा मारकडवाडीने देशाला दिली मारकडवाडीतून सुरु झालेली लोकशाही वाचवण्याची लढाई देशभर जाईल

लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवत देशात अराजक पद्धतीने राजकारण सुरु आहे त्याला विरोध करण्याचा मार्ग मारकडवाडीने देशाला दाखवून दिला आहे. ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी मारकडवाडीने सुरु केलेल्या आंदोलनाची देशाने दखल घेतली असून आता हे आंदोलन राष्ट्रीय पातळीवर जाईल व जोपर्यंत बॅलेट पेपरवर मतदान होत नाही तोपर्यंत हे आंदोलन …

Read More »

उच्च न्यायालयाचे मत, पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीला राजकीय रूप देऊ नका रश्मी शुक्लांविरोधातील याचिकेवर तातडीच्या सुनावणीस न्यायालयाचा नकार

पोलीस महासंचालकपदावरून रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या जागी संजय कुमार यांची नियुक्ती करताना ती केवळ निवडणूक कालावधीपुरती मर्यादित ठेवण्याचे स्पष्ट केल्याने या निर्णयाला काँग्रेसने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र, न्यायालयाने सोमवारी संबंधित याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. तसेच, याचिका करण्याच्या याचिककर्त्याच्या हेतुवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारने …

Read More »

पवन खेरा यांचा आरोप, भाजपामुळे प्रत्येक मराठी कुटुंबाच्या खिशातून वर्षाला ९० हजारांची लूट ‘बटेंगे तो पॉकेट कटेंगे’ और ‘भाजपावाले हटेंगे तो दाम घटेंगे’!

भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे महागाईचा आगडोंब उसळला असून खाद्यतेलासह, किराणा मालाचे भाव प्रचंड वाढले आहेत. लसून ५०० रुपये किलो तर कांदा १०० रुपया किलो झाला आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीय कुटुंबाचे किचनचे बजेट कोलमडले आहे. या महागाईतून मोदी सरकार प्रत्येक मराठी कुटुंबाच्या खिशातून वर्षाला ९० हजार रुपये …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, पोलीस महासंचालक संजय वर्मांची नियुक्ती ‘तात्पुरती नियुक्ती’ कशी? २४ तासाच्या आत संजय वर्मांच्या परमनंट नियुक्तीचा आदेश काढा, अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करु

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवून निवडणूक आयागाने संजय वर्मा यांना पोलीस संचालकपदी नियुक्त करताना काढलेल्या आदेशात तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख केलेला नाही, तरीही राज्य सरकारच्या आदेशात मात्र तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख का करण्यात आला? या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुख्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. …

Read More »