केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशांतर्गत वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर चवथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्थेचा नंबर मिळविल्याचा डोगोंरा पिटला. मात्र तो नंबर चारच महिन्यात गेला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनकडून भारतात येणाऱ्या आयात मालात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. त्या तुलनेत चीम मध्ये होणारी भारताची निर्यात अत्यंत कमी आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे परंपरागत मित्र असलेले राष्ट्रे म्हणजे ऱशिया आणि इराण सारखी जुने देश असताना कारण नसताना भारताने अमेरिकेशी सलगी वाढवून हे दोन्ही मित्र तसे पाह्यला गेले तर गमावले आहेत.
ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानला इतर देशांचा मोठा पाठिंबा मिळाला, त्या तुलनेत भारताला पुरेसा पाठिंबा मिळाला नसल्याचे अनेकदा दिसून आले. तर भारत-पाकिस्तान दरम्यानचे युद्ध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यावरून थांबविण्यात आल्याचा दावा ट्रम्प यांनीच अनेकवेळा बोलून दाखवला. पण त्यावर भारताकडून अधिकृत कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आली नाही. इतकेच नव्हे तर नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पान उतारा डोनाल्ड ट्रम्प यांनी सगळ्या देखत केला परंतु पंतप्रधान मोदी यांनी शांतपणे ते ऐकून घेत हसत त्या बोलण्याचे स्वागत केले.
त्या तुलनेत नुकत्यास संपलेल्या अमेरिका-इस्त्रायल आणि इराण दरम्यानच्या युद्धात इराणने अमेरिकेच्या बाष्कळ बडबडीला आणि दबावाला बळी न पडता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गुडघ्यावर आणत अमेरिकेकडून युद्धाची भरपाई अमेरिकेकडून वसूल केलीच मात्र या युद्धबंदी करारातून इस्रायलला एक शब्दही न काढता बाहेरच काढून टाकले. भारताच्या तुलनेत इराण राष्ट्र तसे आकाराने लहान आहे. मात्र भारतापेक्षा तोडीस तोड आंतरराष्ट्रीय स्तरावर आन-बान राखत आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवून दिले.
मात्र या सर्व गोष्टीच्या प्रभावात भारताचे स्थान आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारताची स्थिती सर्वात खाली घसरली असल्याचे दिसून येत आहे. मात्र या १२ वर्षातील गेलेली रया सावरण्यासाठी भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारतीयांचे सामर्थ्य, समृद्धी, स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढवत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारा वर्षांच्या कार्यकाळात भारत आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरित केले.१४० कोटी जनतेने घेतलेला विकसित भारत २०४७ चा दृढसंकल्प हा आमचा मूलमंत्र आणि ध्येय आहे. जनतेच्या विश्वासासोबत देशाचा विकास, वारसा आणि जनकल्याणाचे काम पुढे जाईल, असा दावा केला.
तसेच पियुष गोयल म्हणाले की, गेल्या बारा वर्षांच्या कालावधीत कोविड महामारी, युक्रेन युद्ध अशा अनेक आंतरराष्ट्रीय समस्या उद्भवल्या. मात्र नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक संकटाला संधीत बदलण्याचे काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेले ९ मुक्त व्यापार करार ३८ विकसित देशांची बाजारपेठ भारतातील उद्योजक, शेतकरी, मच्छीमार, महिला उद्योजिकांना खुली करत त्यांना नव्या संधी, रोजगार आणि व्यापार उपलब्ध करून देत भारताला वेगाने पुढे नेण्याचे काम करत मोदी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर नेण्याचे काम केल्याचा दावाही यावेळी केला.
दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत केलेल्या परदेशी दौरे हे त्यांचे मित्र उद्योगपती गौतम अदानी यांच्या उद्योगवाढीसाठीच केल्याची चर्चा सुरु असून त्या अनुषंगाने काही आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रातून यांसंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. तर देशातील विरोधकांनी संशयही व्यक्त केला आहे. यात विकसित देशांसोबतच असे अनेक देश आहेत जे भारताच्या फारसे जवळ नाहीत आणि त्यांच्यासोबत जुने नाते नाही. अलीकडेच युके आणि युरोपियन युनियन मधील काही देशांशी मुक्त व्यापार करार करण्यात आले. मात्र त्याचे श्रेय भारतीय बाजारपेठेला द्यावे लागणार आहे.
पियुष गोयल पुढे बोलताना म्हणाले की, कोणत्याही भेदभावाशिवाय समाजातील अखेरच्या व्यक्तीपर्यंत सरकारी योजना पोहोचाव्यात आणि त्याचा त्यांना लाभ मिळावा, याकडे मोदी सरकारचा कटाक्ष राहिला आहे. तंत्रज्ञाची मदत घेत प्रामाणिक सरकारची प्रतिमा हे जगासमोरचे उदाहरण आहे. जन धन योजनेअंतर्गत ५५ कोटींहून अधिक बँक खाती उघडली, ज्यापैकी ३२ कोटींहून अधिक महिला आहेत. कोविड-19 महामारीच्या कठीण काळापासून ८१ कोटींहून अधिक नागरिकांना मोफत रेशन पुरवण्यात आले आहे. गरिबांना वैद्यकीय खर्चापासून वाचवण्यासाठी, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ६० कोटींहून अधिक आरोग्यकार्ड जारी करण्यात आले आहेत, ज्यामुळे मोफत उपचारांची हमी मिळते. याशिवाय, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेने ५८ कोटींहून अधिक लोकांना भक्कम सुरक्षाकवच प्रदान केल्याचा दावा केला. पण देशाच्या आर्थिक पातळीवर मात्र फारशी चांगली परिस्थिती नसल्याचे दिसून येत असल्याची परिस्थिती देशाच्या विरोधकांकडून सातत्याने सांगण्यात येत आहे. तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तर अनेकवेळा यासंदर्भात इशारे दिले आहेत.
Marathi e-Batmya