Breaking News

Tag Archives: bmc

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते राज्यस्तरीय शुभारंभ सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करून एक चळवळ उभी केली. त्याचे फलित म्हणजे आज देशभरात हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. स्वच्छता हा आरोग्याचा मंत्र असून मुंबईमध्ये ‘डीप क्लिन ड्राईव्ह’च्या माध्यमातून रस्ते साफ करणे, रस्ते झाडणे, पाण्याने रस्ते धुणे हे काम सुरू आहे. यामुळे …

Read More »

मुंबई महापालिकेला पार्किग कंत्राटात २०० कोटींहून अधिकचे नुकसान माहिती अधिकार मधून माहिती आली बाहेर

मुंबई महापालिकेने एलेव्हेटेड मल्टीलेव्हल इलेक्ट्रोमेकॅनिकल कार पार्किंग सिस्टीम (शटल आणि रोबो पार्कर सिस्टीम) मुंबादेवी येथे सुरु केली तर माटुंगा, फोर्ट आणि वरळी येथे कार्यादेश दिले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत मुंबई पालिकेला पार्किग कंत्राटात २०० कोटींहून अधिकचे नुकसान झाले असल्याची तक्रार करत चौकशी करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली …

Read More »

गणेशोत्सवात मुंबईतील या १२ पुलांवर अती गर्दीस मुंबई पालिकेचा मज्जाव मंडळांना मिरवणूकीसह गणेशविसर्जनासाठी रहदारीस बॅन

गणेशोत्सवास आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला असतानाच मुंबई महापालिकेने गणेशोत्सव मंडळासाठी शहरातील १२ पुलांवरून गर्दी करण्यास आणि मिरवणूका, गणेश विसर्जनासाठी वापरू नये असे आवाहन केले आहे. तसेच आगामी गणेशोत्सवाच्या तयारीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) भाविकांना मिरवणुका काढताना मुंबईतील १२ पुलांवर जमू नये, असेही जाहिर केले आहे. दक्षिण मुंबईतील दादर आणि …

Read More »

विधानसभाध्यक्षांनी निर्देश देऊन जयभिम नगरचे रहिवाशी छपराच्या प्रतिक्षेत काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम पक्षाने मुद्दा उपस्थित करूनही अद्याप सरकारकडून निर्णयाची अंमलबजावणी नाहीच

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पावसाळ्याच्या दिवसात कोणत्याही इमारतीवर किंवा वस्तींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा आसरा अर्थात निवासी घरावर कारवाई करता येत नाही. याशिवाय मुंबई महापालिकेच्या अधिनियमात तशी तरतूदही आहे. तरीही मुंबई महापालिकेकडून पवई येथील जयभिम नगरातील रहिवाशांना सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या सांगण्यावरून मुंबई महापालिकेने कारवाई करत रस्त्यावर आणले. या कारवाईवरून राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात …

Read More »

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी मंडप परवानगी द्या पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे महापालिका अधिकाऱ्यांना आदेश

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गत १० वर्षात नियमांचे उल्लंघन केले नसल्यास अशा मंडळांना महानगरपालिकेने पाच वर्षाचे मंडप परवाने अटी शर्तींविना देण्यात यावे, असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मंत्रालयात सन २०२४ च्या बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीची बैठक आज पार पडली. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक …

Read More »

हवामान खात्याने रेड अलर्ट दिल्याने पुणेनंतर आता मुंबईतही सुट्टी जाहिर मुंबई महापालिकेकडून सुट्टी जाहिर

राज्यातील पुणे, ठाणे आणि मुंबई व उपनगराला हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जाहिर केला आहे. यापार्श्वभूमीवर पुणे प्रशासनाने यापूर्वीच तेथील शाळा, कॉलेजला सुट्टी झाली केली होती. त्यापाठोपाठ मुंबईतही या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर आज सुट्टी जाहिर केली आहे. तर उद्या पावसाची परिस्थितीपाहून सुट्टी जाहिर करणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने …

Read More »

विद्यार्थ्यांच्या शालेय वस्तू पुरवठा कंत्राटात ३३० कोटींचा घोटाळा घोटाळ्याची चौकशी करा अन्यथा आंदोलन - मुंबई काँग्रेसचा इशारा !

महापालिका शाळांतील लाखों विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय वस्तूंच्या पुरवठ्यात मोठा घोटाळा झाला आहे. साधारण ३३० कोटी रूपयांचा हा घोटाळा असल्याचा आरोप माजी उपमहापौर अश्रफ आझमी, माजी नगरसेवक मोहसिन हैदर, सुफियॉं वणू यांनी केला आहे. अद्यापही मुलांना शालेय साहित्य मिळालेलं नाही. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणीही मुंबई काँग्रेसमधील पत्रकार परिषदेत …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, …सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर होल्डिंग पाँडस्, मायक्रो टनेलमुळे पाणी निचरा होण्यास मदत

हवामान खात्याने मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला असून राज्य आपत्ती नियंत्रण विभाग, मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासन एकत्रितपणे काम करून मुंबईकरांना दिलासा देण्याचं काम करीत आहेत. मुंबईत काल रात्रीपासून २६७ ते ३०० मिलीमीटर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. नागरिकांना मदतीसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर …

Read More »

नाना पटोले यांच्या जय भिम नगरबाबतच्या प्रश्नी विधानसभाध्यंक्षांचे आदेश जयभीम नगरमधील ६५० बेघर कुटुंबांच्या निवाऱ्याची व्यवस्था करा

पवई भागातील जय भीम नगरमधील झोपड्या तोडल्याचा प्रश्न उपस्थित करुन नाना पटोले म्हणाले की, जयभीम नगरमधील ६५० गरिब, मागासवर्गिय कुटुंबांवर ६ जूनच्या रात्री पोलीस बंदोबस्तात कारवाई करून या कुटुंबांना बेघर करण्यात आले आहे, आज ही सर्व कुटुंबं रस्त्यावर आहेत. पोलीस व मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून चुकीची कारवाई करून या मागासवर्गीय …

Read More »

मुंबई महापालिकेचा अजब कारभार, एका निविदेत कंपनी अपात्र तर दुसऱ्यात पात्र एकीकडे अपात्र असलेल्या कंपन्या दुसऱ्या निविदेत पात्र कशा

मुंबई महानगरपालिकेतील परिमंडळ ६ आणि ५ अंतर्गत २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षासाठी खराब झालेले/कोसळलेले, मोठे आणि रस्त्याच्या कडेचे नाले/नाल्याच्या भिंर्तीच्या दुरुस्ती/पुनर्बाधणीच्या अप्रत्याशित कामांसाठी कंत्राटी एजन्सीच्या निविदेत एकप्रकारचा चमत्कार झाला आहे. एका निविदेत अपात्र असलेल्या कंपन्या दुसऱ्या निविदेत पात्र झाली असून याबाबत चौकशी करत पुन्हा योग्य निविदा जारी करण्याची मागणी आरटीआय …

Read More »