वास्तविक पाहता दिवाळीचा सण मागील आठवड्यात सुरु झाला. तो या आठवड्याच्या मध्यापर्यंत होता. मात्र आगामी निवडणूकीची धाकधुक हृदयात ठेवत अनेक सत्ताधारी गटातील मंत्र्यांनी मतदारसंघातच ठाण मांडले. त्यातच राज्यात मराठा विरूध्द ओबीसी असा संघर्ष पेटलेला आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या झालेल्या बैठकीला तब्बल १६ मंत्र्यानी दांडी मारल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. …
Read More »राज्याच्या १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेसाठी ३४१ शिफारशी
राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे आज राज्य मंत्रिमंडळात सादरीकरण करण्यात आले. राज्याला १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध ३४१ शिफारशी या परिषदेने केल्या आहेत. हे सादरीकरण मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांनी केले. राज्याच्या जीडीपी (विकास दर) १७ टक्के साध्य करणे, फॅब आणि इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनाला गती …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले “हे” महत्वाचे निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत विदर्भातील सिंचन कामांना मान्यता देत आयुर्वेद-युनानी महाविद्यालयातील अध्यापकांची पदे भरणे, आश्रमशाळांमधील गणित विज्ञान विषयाशी संबधित शिक्षकांच्या जागा भरणे, संत्रा उद्योग उभारणी, बारामती येथे श्वान प्रशिक्षण केंद्र उभारणे, मॉरिशस येथे पर्यटन केंद्र उभारणी, राज्यात गोवंशीय प्रजनन कायदा लागू करण्याचा निर्णय आणि वस्त्रोद्योग उभारणीच्या अनुषंगाने महत्वाचे निर्णय …
Read More »मंत्र्यांच्या मराठा आणि ओबीसी वादावर मुख्यमंत्री शिंदे यांनी केली “ही” सूचना
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे याप्रश्नी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण पुकारले होते. पण ऐन दिवाळीत आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील नागरिकांचे तोंड कडू व्हायला नको म्हणून यावर तोडगा काढत २ जानेवारी २०२४ पर्यंतची मुदत राज्य सरकारला दिली. तसेच मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य सरकारने शासन निर्णयही जारी केला. या आरक्षणाच्या …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले “हे” महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय घेतले
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत करण्याच्या कार्यकक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय राज्यातील चिटफंड न्यायलयीन प्रकरणांचा वेगाने निवाडा यासाठी कायद्यातील जून्या कायद्यातील तरतूदींचा समावेश करण्यात येणार आहेत. याशिवाय चेंबूर येथे नवबौध्द मुलां-मुलींसाठी आयटीआय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे पीएम मित्रा पार्कच्या जमिनीसाठी देण्यात …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले “हे” महत्वाचे निर्णय वीज प्रकल्प, सहआयुक्त पद निर्मिती, महाप्रितकडून घरे, कामगार विभागासाठी घेतले महत्वाचे निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठीकत कोराडी औष्णिक प्रकल्पातून क्रिटीकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्प व तसेच धर्मादाय संस्था कार्यालयात सह आयुक्त पदाची निर्मिती, मागासवर्गीय समाजाला महाप्रितकडून परवडणाऱ्या दारातील घरे, अहमदनगर जिल्ह्यात नवे पशुवैद्यकीय रूग्णालय, बांधकाम कामगारांसाठीच्या नियमात सुधारणा आदी प्रश्नी निर्णय घेण्यात आला आहे. या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, …
Read More »मराठवाड्यातील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे घेण्यात आले महत्वाचे निर्णय छत्रपती संभाजी नगरमध्ये झालेल्या बैठकीत घोषणांचा पाऊस
राज्यातील मराठवाडा मुक्ती संग्रामाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची आज छत्रपती संभाजी नगर येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते. आज झालेल्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ते खालील प्रमाणे ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी १०७६ कोटींची वाढीव तरतूद मराठवाड्यातील १२ लाखांपेक्षा जास्त …
Read More »मराठवाड्यातील शैक्षणिक केंद्र असलेल्या लातूरमध्ये सर्वाधिक वसतिगृहे जळकोट, अहमदपूर येथील शासकीय वसतिगृहे ; लामजना येथील निवासी शाळेच्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
शासन सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असून विद्यार्थ्यांनी शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सामाजिक न्याय विभागाकडून लातूर जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या जळकोट आणि अहमदपूर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या, तसेच लामजना येथील शासकीय निवासी शाळेच्या इमारतीचे लोकार्पण दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले. …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, मंत्रिमंडळ बैठकीवर कोट्यवधींची उधळपट्टी तर मराठवाड्यात दुष्काळ सरकार बोलून रिकामे होणार आणि तोंडाला पाने पुसून जाणार
राज्यातील येड्याच्या सरकारने सर्व लाजलज्जा सोडलेली दिसत आहे. शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करत आहे, मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड वाढलेल्या आहेत, मराठा आंदोलनासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. मराठवाड्यासह राज्यात एवढी गंभीर परिस्थिती असताना संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री, मंत्री व अधिकाऱ्यांची जनतेच्या पैशातून अलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये बडदास्त ठेवली आहे. सर्वसामान्य जनता महागाईत होरपळत …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय गोदावरी नदीतील पाणीसाठी १४ किमी बोगद्याने वळविणार
राज्य सरकारचा नुकताच तिसरा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून तर त्यांच्यासह आलेल्या ८ मंत्र्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर पहिल्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गोदावरी प्रवाह वळण प्रकल्प, नागपूरातील शिवराज फाईन आर्टच्या ३५ कर्मचाऱ्यांच्या अधिसंख्येला मान्यता, उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींना …
Read More »
Marathi e-Batmya