राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना सरन्याधीशांनी जी निरिक्षणे नोंदवली, ताशेरे ओढले यातून निर्णय आपल्याविरोधात जातो की काय या भीतीने सरन्यायाधीशांनाच काही लोकांनी ट्रोल केले हे लांछनास्पद आहे. ट्रोल करण्याची भाडोत्री व्यवस्था कोणाकडे आहे हे सर्वांना माहित असून सरन्याधीशांना ट्रोल करण्याची हिम्मत करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, म्हणूनच काँग्रेसचे खासदार …
Read More »सरन्यायाधीशांच्या त्या मुद्यावर ठाकरे गटाचा युक्तीवाद, म्हणून राज्यपालांची बेकायदेशीर कृती… राजीनामा देणं बेकायदेशीर कृत्याचा परिणाम होता
सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष आणि शिवसेनेतील अपात्र आमदारांच्या याचिकेवर आज सकाळी ठाकरे गटाच्यावतीने कपिल सिबल यांनी युक्तीवाद केल्यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डि.वाय.चंद्रचूड यांनी तुम्ही म्हणता राज्यपालांचा निर्णय रद्द ठरवा आणि पूर्वीचे सरकार पुर्नःस्थापित करा. पण तुम्ही तर बहुमत चाचणीला सामोरे न जाता राजीनामाच …
Read More »शिंदे गटाचा न्यायालयात युक्तीवाद,…तरी ठाकरे सरकारला बहुमत नव्हते त्यावर सरन्यायाधीश म्हणाले जर अपात्रतेचा निर्णय झाला असता तर चित्र वेगळे
एकीकडे राज्यात अधिवेशनामुळे वातावरण तापलेलं असतानाच दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीमुळेही राजकीय वर्तुळात मोठी चर्चा चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. पक्षाचे प्रतोद, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र अशा अनेक मुद्द्यांवर नीरज कौल शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद करत होते. यावेळी शिंदे गटाचे वकील नीरज कौल म्हणाले, अपात्रतेची याचिका प्रलंबित असलेल्या ४२ आमदारांना …
Read More »शिंदे गटाच्या दाव्यावर सरन्यायाधीशांचे मोठे विधान, १० व्या परिशिष्टानुसार त्याला काही महत्व नाही.. दिलेल्या तारखानुसार पक्षात २१ जूनपासूनच फूट दिसतेय
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुरू असलेल्या सुनावणीत शिंदे गटाकडून आक्रमक युक्तिवाद करत ठाकरे गटाचे मुद्दे खोडले जात आहेत. अशातच आज बुधवारी सुनावणीत शिंदे गटाच्या वकिलांनी मांडलेला एक मुद्दा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नाकारला आहे. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी १० व्या परिशिष्टाचा संदर्भ देत आपले मत व्यक्त केले. सर्वोच्च …
Read More »सरन्यायाधीश चंद्रचूड यांची स्पष्टोक्ती, भेदभाव वाढल्याने दलित-आदिवासी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ७५ वर्षा प्रतिष्ठित संस्थांबरोबर सहानुभूतीच्या संस्था निर्माणाची गरज
भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांबाबत मोठं विधान केलं आहे. उपेक्षित वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढत आहेत. यामध्ये बहुतांश विद्यार्थी हे दलित आणि आदिवासी समाजातील आहेत, हे संशोधनातून समोर आलं आहे. समाजातील एखाद्या उपेक्षित घटकाबद्दल सहानुभूती नसल्यामुळे जो भेदभाव वाढला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, अशी …
Read More »सर्वोच्च न्यायालयः ठाकरे गट विरूध्द शिंदे प्रकरणी नबाम रेबियाचा निर्णय नेमका कसा लागू होतो ? गुरूवारी सकाळपासून पुन्हा सुनावणी
काल मंगळवारी ठाकरे गट विरूध्द शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत नबाम रेबिया प्रकरणाचे मापदंड लागू होऊ शकत नसल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डि.वाय. चंद्रचूड यांनी व्यक्त केले. तसेच नबाम रेबिया प्रकरण या महाराष्ट्रातील राजकिय घडामोडींशी लागू होते अशी विचारणा करत त्याचे स्पष्टीकरण देण्यास शिंदे गटाच्या वकीलांना सूचना केली. त्यानुसार …
Read More »सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड म्हणाले, मला कामकाजाबाबत सांगू नका, हे मी ठरवेन संतापून वकील विकास सिंह यांना झापलं
मागील काही वर्षात न्यायालयातील अपूऱ्या न्यायाधीशांची संख्या असतानाही तत्कालीन सरन्यायाधीश यु यु लळीत आणि विद्यमान सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड हे प्रलंबित असलेल्या खटले निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात आज वरिष्ठ वकील विकास सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात खटला सूचिबद्ध करण्यावरून सरन्यायाधीशांकडे आग्रह धरला. यावेळी संतापलेल्या सरन्यायाधीश चंद्रचूड …
Read More »सरन्यायाधीश लळीत म्हणाले, राज्याच्या वतीने झालेला सन्मान हा विठ्ठलाच्या पूजेसारखा
आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या वतीने विठ्ठलाची पूजा होते, तोच सन्मान आज मानपत्राच्या रूपाने मला मिळाल्याची भावना सरन्यायाधीश उदय लळीत यांनी व्यक्त केली. निवृत्तीनंतरही न्याय प्रक्रियेत आवश्यकता असेल तेथे नक्की सहभाग घेऊ असे त्यांनी सांगितले. उदय उमेश लळीत यांची भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा आणखी एक मोठा निर्णयः गुजरात दंगलीचे १० खटले बंद नवे सरन्यायाधीश यु.यु.लळीत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाचा निर्णय
तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात २००२ साली झालेल्या गुजरात दंगलीशी संबधित राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दाखल केलेल्या याचिकेसह सर्व याचिकांवरील सुनावणी बंद करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे नवनिर्वाचित सरन्यायाधीश यु यु लळीत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने आज दिला. गुजरात दंगलीप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासह जवळपास दहा याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. तसेच त्यापूर्वी …
Read More »सोलापूरचे सुपुत्र न्यायमुर्ती उदय लळीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्या.उदय लळीत यांनी घेतली शपथ
भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या दरबारहॉल मध्ये आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी न्या.लळीत यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. या शपथग्रहण समारंभास उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती एम.व्यंकैया नायडू, माजी सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा, केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरेण रिजेजू यांच्यासह केंद्रीय मंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि …
Read More »
Marathi e-Batmya