सामान्य जनतेची दिवाळी गोड करण्याच्या गोंडस नावाखाली सरकारने जाहीर केलेल्या दिवाळी पॅकेजमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.मंत्रीमंडळ निर्णयापूर्वीच निविदा काढण्यात आल्याने हा घोटाळा उघडकीस आला असून या दिवाळी फूड किट निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे …
Read More »जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे , निहार ठाकरे यांच्या उपस्थितीने काय साधले ? शिंदे गटातील मेळाव्यातील ठाकरे कुटुंबियांच्या सहभागावरून शिवसैनिकांचा सवाल
लक्झरी बसेस, एसटीच्या बसगाड्या खाना खजाना, आणखीवर बक्षिसी रक्कम, दिवसभर सगळ्या टीव्ही चँनेल्स अन्य समाजमाध्यातून जाहिराती आणि अन्य वृत्तपत्राच्या माध्यमांतून नंबर १ च्या मोठ्ठ्या जाहिराती देऊन मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवर मैदानावर आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याचा सपशेल फ्लॉप शो झाला. तर जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे, निहार ठाकरे …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना सेंद्रिय शेतीला लोकचळवळीचे स्वरूप देणार
महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत असुन शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानाची स्थापना करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राष्ट्रीय नैसर्गिक शेती आणि डिजिटल शेती यावरील कार्यशाळेत दिली. नवी दिल्ली येथे आयोजित या …
Read More »नाना पटोले यांचा टोला, काँग्रेसला दोष देऊन एकनाथ शिंदेंना गद्दारीचे पाप लपवता येणार नाही बीकेसीवरील मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी वाचली भाजपाची स्क्रिप्ट
मुंबईतील बीकेसी मैदानावरील एकनाथ शिंदे गटाच्या मेळाव्याला राज्यातील विविध भागातून सामान्य जनतेला खोटी माहिती देऊन भाडोत्री गर्दी जमवण्यात आली होती परंतु या जनतेने शिंदेंचे भाषण न ऐकताच काढता पाय घेतला. राज्याचा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाच्या हातचे बाहुले असल्याचे राज्यातील जनतेने काल पाहिले. एकनाथ शिंदे यांनी आपल्या गद्दारीचे समर्थन करत …
Read More »बीकेसीत शिंदेंच्या समर्थनार्थ ठाकरे कुटुंबिय, जयदेव ठाकरे म्हणाले, एकटे सोडू नका एकनाथ शिंदे याचे चार-पाच निर्णय आपल्याला आवडले
खरी शिवसेना कोणाची यावरून अस्तित्वाची लढाई सुरु झाली आहे. त्याचा निकाल निवडणूक आयोगाच्या आधी आज ५ सप्टेंबर रोजी शिवसेना विरुद्ध शिंदे गटाने केलेल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जनतेच्या दरबारात लागेल. शिंदे गटाने बीकेसी मैदानावरील मेळाव्यासाठी जोरदार तयारी केली. त्यातच आता या मेळाव्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे थोरले सुपुत्र जयदेव ठाकरे यांनी …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार आयुष्मान भारत हेल्थ कार्डचे वितरण
ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ‘आयुष्मान भारत हेल्थ कार्ड’चे वितरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला आरोग्य मंत्री प्रा. डॉ. …
Read More »निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शिधापत्रिकाधारकांना १०० रू.त दिवाळी भेट राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
मुंबईसह राज्यातील १४ महापालिकांच्या निवडणूका केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेनेत केलेल्या बंडखोरीमुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात अद्यापही रोष आहे. जनतेतील हो रोष कमी कऱण्याच्या उद्देशाने आणि आगामी निवडणूकीत शिंदे गटाला आणि भाजपाला निवडणूका सोप्या जाव्यात या उद्देशाने दसरा आणि दिवाळीचे औचित्य साधत राज्यातील १ कोटी ७० लाख रेशन कार्ड …
Read More »राष्ट्रवादीचा आरोप, शिंदे गटाच्या मेळाव्याकरिता शासकीय यंत्रणांचा नियमबाह्य वापर तात्काळ निलंबन करण्याची केली मागणी- अॅड. अमोल मातेले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा एमएमआरडीएच्या बीकेसी येथील मैदानावर प्रस्तावित असल्याने सदर मेळाव्याकरिता येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था मुंबई विद्यापीठाच्या कलीना संकुलातील भूखंडावर करण्यात आली आहे.येथे पार्किंग व्यवस्था करण्याकरिता महापालिकेच्या एच/पूर्व विभागाचे अधिकारी/कर्मचारी व्यक्तिशः राबत आहेत. सदर ठिकाणी असलेली झाडे तोडून तेथील मातीसकट डंपरने इतरत्र हलविण्यात आली आहेत व त्याकरिता …
Read More »शिवसेना विरूध्द शिवसेनेची पहिली टेस्ट, अंधेरी विधानसभा निवडणूक जाहिर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाकरिता पोटनिवडणूक -२०२२ कार्यक्रम
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी करत वेगळी चुल मांडली. त्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेवरच दावा करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे अंधेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी आज निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यामुळे शिवसेना विरूध्द शिवसेनेची पहिली लिटमस टेस्ट …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार राज्यभर ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार
राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार आहे’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीटिव्ही वृत्तवाहिनीच्या ‘स्वस्थ बनेगा इंडिया’ या कार्यक्रमात दिली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे, राज्यभर सुमारे ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणे, बाल आरोग्यावर विशेष लक्ष …
Read More »
Marathi e-Batmya