गर्दीच्यावेळी लोकल रेल्वेमधून पडून मृत्यू झालेल्या मृताच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच रेल्वे प्रशासनाला दिले. पीडित मृत व्यक्ती प्रामाणिक प्रवासी असल्यामुळे रेल्वे कायद्यानुसार, मृताचे पालक भरपाईस पात्र असल्याचे न्यायालयाने रेल्वे प्राधिकरणाचा निर्णय रद्द करताना अधोरेखीत केले. वैद्यकीय आणि पोलीस अहवालांसह घटनेच्या सर्व पुराव्याचे पुनरावलोकन …
Read More »गर्भवती, नवजात बालकाच्या मृत्यु प्रकरण: चौकशी अहवाल अद्याप सादर का केला नाही ? जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांच्या कृतीवर उच्च न्यायालयाची नाराजी
भांडुपमधील महापालिका रुग्णालयात मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात शस्त्रक्रिया करून गर्भवती आणि बाळाच्या मृत्यूचा चौकशी अहवाल जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना वारंवार आदेश देऊनही सादर न केल्याबद्दल तसेच न्यायालयात अनुपस्थित राहिल्याबद्दल रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सपाळे यांच्यावर न्यायालयाने मंगळवारी नाराजी व्यक्त केली. तसेच, दोन आठवड्यांत या मृत्यूचा चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. भांडूप …
Read More »नांदेड बालमृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांचे फक्त दोन ओळीत उत्तर नांदेडप्रकरणी चौकशीअंती दोषींवर कारवाई करणार
नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात झालेल्या घटनेची शासनाने गंभीर दखल घेतली असून या घटनेची चौकशी करुन त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल , असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मंत्रालय येथे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री …
Read More »गेल्या वर्षभरात मुंबईतील १४०२ बालकांनी गमावला प्राण तर राज्यात १३ हजार ७० बालकांचा मृत्यू
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील नवजात बालमृत्यूच्या प्रमाणात घट व्हावी यासाठी सरकार आणि विविध सामाजिक संघटनाकडून प्रयत्न करण्यात येतात. तरीही बालमृत्यूच्या संख्येत वाढच होत असून गेल्यावर्षी तब्बल १३ हजार ७० नवजात बालकांचा मृत्यू झाला तर मुंबईत १ हजार ४०२ बालमृत्यू झाल्याचे एच.एम.आय.एस. च्या अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी विधानसभेत उघडकीस आली. …
Read More »
Marathi e-Batmya