समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूरमध्ये झाले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. नागपूर ते शिर्डी असा पहिला टप्पा आता नागरिकांसाठी खुला करण्यात आला. मात्र, या महामार्गासाठी भरावा लागणारा टोल चर्चेचा …
Read More »शिंदे गटाच्या उद्यमशील मंत्र्याचा असाही फंडा, बोलवा बैठक द्या दम, अन् घ्या ‘धनलक्ष्मी’ लॉटरी कंपन्या आणि विभाग प्रशासन वैतागले
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकते शिंदे-फडणवीस सरकार राज्यात स्थानापन्न झाले. त्यानंतर महाराष्ट्रातून चार मोठे उद्योग निघून गेले. त्यावरून राज्यातले राजकिय वातावरणही चांगलेच तापले. मात्र या मागील चार महिन्यात शिंदे गटाच्या एका उद्यमशील उद्योगी मंत्र्याच्या कारभाराने खाजगी उद्योजक आणि त्यांच्या विभागाचे प्रशासन चांगलेच वैतागले असून या मंत्र्यांना कोणी तरी आवरा …
Read More »नाशिक नांदूरनाका दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार
नाशिक- नांदूरनाका येथे खाजगी बसच्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने तातडीचे वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ …
Read More »अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले ‘हे’ आदेश बाधित शेतकऱ्यांसाठी वाढीव दराने ३ हजार ५०१ कोटी रुपयांची मदत
राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे एकूण २३ लाख ८१ हजार ९२० हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून २५ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी ३ हजार ५०१ कोटी रुपयांची मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने वितरीत करण्यात येणार आहे. काही …
Read More »नौदलाच्या नव्या झेंड्यावर छत्रपतींच्या राजमुद्रेची छटाः मुख्यंमत्री, उपमुख्यमंत्री म्हणाले… शिवाजी महाराजांना अभिवादन असल्याचे व्यक्त केले मत
संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे जलावतरण हे भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयएनएस विक्रांतचे जलावतरण आणि नौसेनेला नवीन ध्वज प्रदान सोहळ्याचे स्वागत केले आहे. तर हा क्षण शिवभक्तांसाठी, महाराष्ट्रासाठी अभिमानाचा, गौरवाचा क्षण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. …
Read More »आता काँग्रेसचे राज्य सरकारच्या विरोधात ‘चिपकू’ आंदोलन आरे मेट्रो कारशेडच्या विरोधात आंदोलन करणार
मेट्रो-३ च्या मार्गिकेसाठी उभारण्यात येणाऱ्या मेट्रो कारशेडचा तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा निर्णय सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने रद्दबातल केला. तसेच मेट्रोचे कारशेड कांजूर मार्ग नव्हे तर आरेतच होणार असल्याचे जाहिर केले. या निर्णयाच्या विरोधात आज ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार होते. मात्र …
Read More »महिलेवरील घृणास्पद अत्याचाराची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल महिला आयपीएस अधिकाऱ्याची एसआयटी करणार फास्ट ट्रॅकवर तपास
गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली येथील महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या महिला पोलिस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे असून संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे त्याचप्रमाणे यापुढे अशी घटना करावयास कुणी …
Read More »दहिहंडीसह ‘या’ आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्यास मान्यता
राज्यात विविध सामाजिक आणि राजकिय प्रश्नी विविध राजकिय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून आंदोलने करण्यात येतात. या आंदोलनाच्यावेळी काही गोष्टी या असंवैधआनिक स्वरूपाच्या घडतात. त्यामुळे आंदोलकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येतात. या पार्श्वभूमीवर मार्च २०२२ अखेर पर्यंत सामाजिक, राजकिय आंदोलनासह गणेशोत्सव आणि दहिहंडी उत्सवातील गुन्हेही मागे घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि …
Read More »काँग्रेसची मागणी, अतिवृष्टीमुळे मृत्यू पावलेल्यांना १० लाखाची मदत करा काँग्रेस शिष्टमंडळाची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
राज्यात मागील १५-२० दिवसांत अतिवृष्टी झाली असून या अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत द्यावी व पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिरायती प्रती हेक्टरी ५० हजार रु, व बागायती शेतकऱ्यांना १ लाख रु प्राथमिक मदत तत्काळ द्यावी अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »इंदौर-अमळनेर एसटी बस अपघात: मृतांच्या कुटुंबियांना १० लाखाचे आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत. आज सकाळी इंदोर होऊन अमळनेरकडे निघालेली एसटी …
Read More »
Marathi e-Batmya