मुंबई : प्रतिनिधी अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे सुरु झालेल्या नमो अँपनंतर आता ‘महामित्र’ सोशल मिडीयीच्या माध्यमातून डेटा प्रायव्हसीचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. तसेच या अँपद्वारे जमा होणारी सर्व माहिती अनुलोम या खाजगी कंपनीकडे जमा होत असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी …
Read More »खेड येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळा विटंबनेची तात्काळ सीआयडी चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलिस प्रशासनाला आदेश
मुंबई : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपालिकेच्या हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याची काल सोमवारी घटना घडली. यासंदर्भात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मुद्दा उपस्थित करत त्याचे पडसाद उमटले. विशेष म्हणजे काल भिमा कोरेगांव येथील दलितांवर झालेल्या हिसांचार प्रकरणी संभाजी भिडे याला अटकेसाठी एल्गार मोर्चा काढण्यात आला होता. विधिमंडळाच्या दोन्ही …
Read More »भिमा कोरेगांव प्रकरणी भिडेंचा सहभाग नसल्याचा मुख्यमंत्र्याचा खुलासा विधानसभेतील चर्चेला उत्तर देताना माहिती
मुंबई : प्रतिनिधी १ जानेवारी २०१८ रोजी भिमा कोरेगांव येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला. मात्र गुन्ह्याच्या अनुषंगाने संभाजी भिडे यांचा सहभाग असल्याबाबतचा तपास केला. तसेच त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले. मात्र त्यांचा कोणताही सहभाग असल्याचे आतापर्यंत आढळून आले नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. …
Read More »दोन दिवस गोंधळ घालून अखेर विरोधकांकडून अविश्वास ठराव मागे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठराव मागे घेतल्याचे केले जाहीर
मुंबई : प्रतिनिधी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या कामकाज पध्दतीवर आक्षेप नोंदवित त्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव विरोधकांनी मांडला. मात्र हा ठराव चर्चेला येण्यापूर्वीच सत्ताधारी पक्षाकडून अध्यक्ष बागडे यांच्यावर विश्वासदर्शक ठराव मांडत विरोधकांच्या ठरावातील हवा काढून घेण्यात आली. त्यावरून विरोधकांनी दोन दिवस सतत गोंधळ घालत राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. मात्र …
Read More »पंतप्रधान मोदी, आमच्या नादीला लागू नका ! एल्गार मोर्चाच्या समारोपाप्रसंगी अँड. प्रकाश आंबेडकर यांचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी देशाचा रखवालदार म्हणवून घेणाऱ्या रखलवादाराकडून आता रखवालदारी काढून घेण्याची वेळ आली असून या रखवालदाराला एकच सांगतो आमच्या नादी लागू नको. आम्ही फकीर आहोत. त्यामुळे आम्ही उद्या जेलमध्ये गेलो, तरी फरक पडणार नाही. मोदींना असे वाटत असेल शिवाजी महाराजांच्या जयंतीला भिडे आणि स्वत:च फोटो टाकले म्हणजे झाले. मोदी, …
Read More »आठ दिवसांत भिडेंवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन अॅड. प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारला अल्टीमेटेम
मुंबई : प्रतिनिधी भिमा कोरेगाव येथील दलितांवर झालेल्या हिंसाचाराप्रकरणातील सुत्रधार संभाजी भिडे याच्यावर पुढील आठ दिवसात कारवाई करण्यात आली नाही. तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा एल्गार मोर्चाचे निमंत्रक तथा भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर यांनी देत राज्य सरकारला आठ दिवसाचा अल्टीमेटम दिल्याचेही त्यांनी सांगितले. संभाजी भिडेला अटक करण्याच्या मागणीवरून एल्गार …
Read More »इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासाठी राज्य सरकारचा शब्दकोश भाषा संचालनालयाचा शासन शब्दकोश ॲप आता मोबाईल उपलब्ध
मुंबई : प्रतिनिधी शासकीय कार्यालयांमध्ये कामकाजात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर केला जावा. रोजच्या व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या इंग्रजी शब्दांचा मराठीत अर्थ आणि मराठी शब्दांचा इंग्रजीत अर्थ सहज उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाअंतर्गत येणाऱ्या भाषा संचालनालयाने शासन शब्दकोश ॲप तयार केले आहे. शासन शब्दकोश भाग – एक असे या मोबाईल अॅपला नाव देण्यात आले असून, यात …
Read More »प्लास्टीक आणि थर्माकोलवर कायदेशीर बंदी राज्यात अधिसूचना लागू करण्यात आल्याची पर्यावरण मंत्री रामदास कदम घोषणा
मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टिक व थर्माकोल बंदी बाबतची अधिसूचना लागू करण्यात आली असून त्याची विक्री व वापर करणाऱ्यांवर कायदेशीर करण्यात येणार असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम मंत्रालयात केली. राज्यातून १८०० टन प्लास्टिक कचरा रोज निर्माण होतो. लाखो टन कचरा रस्त्याच्या आजुबाजूला दिसतो. त्यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होत …
Read More »अध्यक्षांवरील विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्ताने सरकारकडून लोकशाहीचा खून विरोधकांचा राज्य सरकारवर आरोप
मुंबई : प्रतिनिधी विधानसभेत कामकाजाच्यावेळी अनेकदा मंत्री नसतात, प्रश्नांची उत्तरे दिली जात नाहीत. उत्तरे प्राप्त होत नाहीत. मंत्री नसल्याने उत्तरे, प्रश्न, लक्षवेधी पुढे ढकलायची पध्दत सर्रास सुरु होती. एककल्लीपणाने सभागृहाचे कामकाज चालविले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी करत केवळ या कारणामुळे …
Read More »राज्य सरकारने विरोधकांचे तोंड दाबले अध्यक्षांवरील विश्वास दर्शक ठरावावर विरोधकांना बोलण्याची संधी नाकारली
मुंबई: प्रतिनिधी विधानसभेत विरोधकांना गाफील ठेवत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विश्वास दर्शक ठराव संमत केल्यावरून सभागृहात विरोधकांनी राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या आमदारांसह मंत्र्यांनी विरोधकांना बोलूच न देण्याची भूमिका घेतल्याने सभागृहात सत्ताधारी पक्षांकडून विरोधकांचे तोंड दाबल्याचे चित्र पाह्यला मिळाले. सत्ताधारी भाजप-शिवसेनेकडून अध्यक्षांवरील ठराव मंजूर करण्यात …
Read More »
Marathi e-Batmya