Tag Archives: cm uddhav thackeray

सोलापूरातील या गावात सापडला कोरोना रूग्ण ग्रामीण भागातही लोण पसरण्याची भीती

सोलापूर: प्रतिनिधी आतापर्यत फक्त शहरीभागात असणारा कोरोना विषाणू आता ग्रामीण भागातही पसरत असल्याचे दिसून येत आहे. या विषाणूचा रूग्ण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात घेरडी गावात पहिला आढळून आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सोलापूर शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या ५० वर पोहोचली असून सर्वाधिक रूग्ण पाच्छा पेठ (१९ रूग्ण) येथील आहेत. …

Read More »

फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांच्या हाती पैसा देण्यासाठी या गोष्टी करा कापूस, तूर, चणा खरेदी केंद्रे सर्वत्र सुरू करण्याची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असले तरी शेतमाल खरेदीला केंद्र सरकारने सूट दिलेली आहे. त्यानंतर राज्य सरकारने सुद्धा खरेदीची घोषणा केली असली तरी अतिशय तुरळक ठिकाणी खरेदी केंद्र सुरू असल्याने शेतकरी त्रस्त आहे. त्यामुळे कापूस, तूर, चणा खरेदीकेंद्र मोठ्या प्रमाणात सुरू करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करणारे पत्र आज …

Read More »

कोणत्याही विभागातला कर्मचारी मृत पावल्यास ५० लाख लवकरच योग्य तो निर्णय होण्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

पुणे: प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात विविध विभाग चांगले काम करत असून याकामी कार्यरत शासनाच्या कोणत्याही विभागातील कर्मचाऱ्याचा कोरोना प्रादूर्भावामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची मदत देण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देत याबाबत योग्य तो निर्णय होईल असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. कोरोना लॉकडाऊनकाळात रोगजाराच्या …

Read More »

राजस्थानातील ते १८०० विद्यार्थी महाराष्ट्रात परतणार मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

मुंबई-चंद्रपूर : प्रतिनिधी उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राजस्थानमध्ये स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी राज्य सरकारने बोलणी सुरु केली असून हे विद्यार्थी लवकरच राज्यात परतणार असल्याची माहिती दिली. राजस्थानमधील कोटा येथे शिक्षणासाठी गेलेले १८०० विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी मदत व पुनर्वसन विभाग पूर्ण प्रयत्न …

Read More »

राज्यात एक लाख चाचण्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६ हजार ८०० वर आज ३९४ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात आतापर्यंत १ लाख २ हजार १८९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यापैकी ९४ हजार ४८५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर फक्त ६ हजार ८१७ कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. मागील २४ तासात ३९४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ११७ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आजस्थितीला एकूण …

Read More »

खुषखबर, आता कोविडच्या सर्व चाचण्या आणि उपचार मोफत होणार वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचा निर्णय

लातूर-मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता या आजारावरील सर्व चाचण्या मोफत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या आणि दंत महाविद्यालांमध्ये व रूग्णालयात या सर्व चाचण्या मोफत निशुल्क करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. या आजाराची …

Read More »

माजी म्हणाले विद्यमान मुख्यमंत्र्यांना, कर्ज वसूली ६ महिने थांबवा मुख्यमंत्री ठाकरेंकडे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली पत्राद्वारे मागण्यांची यादी

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच व्यवहार बंद आहेत यापार्श्वभूमीवर केंद्राच्या आदेशानुसार नागरिकांकडून करण्यात येणाऱ्या कर्जवसूलीवर तीन महिन्यासाठी कोणताही हप्ता भरू नये यासाठी सुट देण्यात आली. मात्र ही तीन महिन्याची सूट पुरेशी नसून ही मुदत सहा महिन्यापर्यत वाढविण्यात यावी आणि …

Read More »

राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ ७७८ नवीन रुग्णांचे निदान एकूण ६४२७ वर पोहोचली

मुंबई : प्रतिनिधी आज राज्यात कोरोनाबाधीत ७७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ६४२७ झाली आहे. आज ५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ८४० रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५३०४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९६ …

Read More »

राज म्हणाले मुख्यमंत्री ठाकरेंना, महसूलासाठी तरी हॉटेल, वाईन शॉप उघडा महिन्याकाठी १२५० कोटी रूपयांचा महसूल न गमाविण्याची पत्राद्वारे विनंती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोना लॉकडाऊनमुळे सर्व अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. हॉटेल ही मुंबईकरांसाठी चैनीची गोष्ट नव्हे तर गरज आहे. त्यातच माफक आणि स्वस्त दरात जेवण मिळणारी हॉटेल्स बंद असल्याने नागरिकांचीही गैरसोय होत आहे. यापार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेत धुगधुगी निर्माण करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरात जेवण मिळण्यासाठी हॉटेल्स आणि वाईन शॉप्स सुरु …

Read More »

एप्रिलचा पूर्ण पगार मिळणार, मार्चचा अर्धा पगार गणपतीत राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी कोव्हीड- 19 च्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक आपत्तीच्या अनुषंगाने राज्याच्या महसुली जमेवर प्रतिकूल परिणाम झाला असला तरी, शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. महसुली उत्पन्नात झालेली घट लक्षात घेता खर्चात काटकसर करण्याच्या उद्देशाने सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन माहे …

Read More »