मुंबई: प्रतिनिधी कोरोनाला रोखण्यासाठी देशात आणि महाराष्ट्रात अनेक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्याचे पालनही सर्वजण करत आहेत. मात्र हे निर्बंध कोणासाठी लागू आहेत? असा प्रश्न सध्या पडत असल्याचा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला करत टाळेबंदी आणि निर्बंधाच्या पलीकडे काही सूचत नाही असे दिसतय. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची …
Read More »पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे, देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे
पंढरपूर : प्रतिनिधी पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे, भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे, यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे, माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले. यावेळी श्री …
Read More »आपत्ती आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले हे आदेश अनपेक्षितरीत्या कोणतीही दुर्घटना होणार नाही यासाठी सतर्क राहावे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई: प्रतिनिधी हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस दिलेला पावसाचा इशारा लक्षात घेता मुंबई महानगरपालिका तसेच इतर सर्व यंत्रणांनी अपेक्षित तसेच अनपेक्षितरीत्या देखील घडणाऱ्या दुर्घटनांच्या बाबतीत अतिशय सावधगिरी बाळगावी व समन्वयाने काम करावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. आज त्यांनी मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे …
Read More »मुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार दरड, भिंत कोसळून २२ जणांचा मृत्यू
मुंबई: प्रतिनिधी मध्यरात्रीपासून सतत मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे निसर्गाने चांगलाच आपले आक्राळविक्राळ रूप दाखविले असून भांडूप, विक्रोळी, चेंबूर आदी ठिकाणी दरड, भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये २२ जण मृत्यूमुखी पडल्याची तर ४ जण जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच चांदीवली, पवई येथेही दरड कोसळल्याची माहिती पुढे आली आहे. तर वसई-विरार भागात …
Read More »मुख्यमंत्र्यांचे निर्देश: ३ री लाट आली तरी उद्योग, अर्थचक्र, जीवनचक्राची गती कायम ठेवा उद्योगक्षेत्र सुरळित सुरु राहील याचे काटेकोर नियोजन करा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील उद्योजकांशी संवाद साधून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतही उद्योग सुरु राहतील यादृष्टीने काटेकोर नियोजन करावे, त्याचा एक परिपूर्ण आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कामगारांची राहण्याची व्यवस्था त्यांच्या उद्योगाच्या आवारात करण्याची तयारी पूर्ण करावी व ज्यांना हे …
Read More »राजकिय सभांवरून मुख्यमंत्री ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना दिला हा उपरोधिक सल्ला राजकीय कार्यक्रम, आंदोलने तसेच धार्मिक कारणांमुळे होणारी गर्दी थांबविण्यासाठी राष्ट्रीयस्तरावर व्यापक धोरणाची गरज
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी पश्चिम बंगालमध्ये घेतलेल्या लाखोंच्या सभा त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारच्या विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी झालेली हजारो नागरीकांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा झाली. तसेच …
Read More »अखेर फडणवीसांच्या सूचनेसमोर मविआ सरकार झुकलेः ओबीसींचे सर्वेक्षण होणार भटक्या विमुक्तांचे स्वतंत्र लोकसंख्येवर आधारित सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करणार-विजय वडेट्टीवार यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी ओबीसींचे संपुष्टात आलेले आरक्षण पुन्हा परत मिळविण्यासाठी नुकत्या झालेल्या पावसाळी अधिवेशनात मोठे रणकंदन माजले. मात्र अखेर विधानसभेत ठराव एकमताने मंजूर करूनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडी सरकारकडून ओबीसी समाजाचे सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज घेतला. पावसाळी अधिवेशनात फडणवीस …
Read More »शिक्षणसम्राट मंत्र्यांनी फी सवलतीचा निर्णय हाणून पाडल्यानंतरही मुख्यमंत्री मूग गिळून बसले भाजपा आ. अतुल भातखळकर यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय कालच्या कॅबिनेट मध्ये घेऊन त्याचा अध्यादेश काढू अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मागील आठवड्यात केली खरी, परंतु महाविकास आघाडी सरकारमधील शिक्षण सम्राट मंत्र्यांनी त्याला विरोध करत हा निर्णय हाणून पाडला व सवयीप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री यावर सुद्धा मूग गिळून गप्प …
Read More »आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, कोरोनामुळे सर्व निर्बंध जैसे थे नियमात शिथिलता नाहीच
मुंबईः प्रतिनिधी देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला. देशाच्या तुलनेत राज्यात रुग्णवाढीचा दर कमी असला तरी करोनाचा धोका पाहता राज्यात कोरोना रोखण्यासाठीच्या नियमांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नसून सध्या लागून असलेले निर्बंध यापुढेही कायम लागू राहतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. …
Read More »राज्य सरकारच्या सर्व महामंडळे, प्राधिकरणांना या महिन्यापासून ७ वेतन आयोग लागू १ जुलै २०२१ पासून मिळणार सुधारीत वेतनश्रेणी मिळणार
मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारची अंगीकृत सार्वजनिक उपक्रमांतर्गत असलेली सर्व महामंडळे, प्राधिकरातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लवकरच लागू करण्यात येणार असून त्यासाठी निकष ठरविण्याच्या कामाला आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर हे निकष तयार करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर १ जुलै २०२१ पासून त्याची अंमलबजावणीस सुरुवात होणार आहे. …
Read More »
Marathi e-Batmya