Tag Archives: cm yogi adityanath

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, योगी सरकारने प्रत्येकी १० लाख रूपयांची नुकसान भरपाई द्यावी अतिक अहमद याचे घर बेकायदेशीररित्या पाडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर कडक ताशेरे ओढत आणि प्रयागराज नागरी संस्थेला २०२१ मध्ये ज्यांचे घर दिवंगत गुंड-राजकारणी अतिक अहमद यांचे आहे या खोट्या आधारावर पाडण्यात आले होते त्या प्रत्येक याचिकाकर्त्याला १० लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देश दिले. प्रयागराज नागरी अधिकाऱ्यांना त्यांच्या “असंवेदनशीलतेबद्दल” फटकारत सर्वोच्च …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार रामसिंगची कोठी असलेल्या जागेचे अधिग्रहण करणार

आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या रामसिंगच्या कोठीत ठेवण्यात आले होते ती सध्याच्या मीनाबाजार भागातील जागा महाराष्ट्र सरकार अधिग्रहित करणार असून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रा येथे केली. यासंदर्भात आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही यावेळी …

Read More »

महाकुंभ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डुबकी आणि दिल्लीतील मतदान सर्वाधिक डुबकी तर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या नावावर

नवीन कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रद्धेच्या ठिकाणी काहीतरी करतात, जो चर्चेचा विषय बनतो. आता प्रयागराजची महाकुंभ मेळा घ्या. येथील पवित्र संगमामध्ये त्यांनी केलेली डुबकीदेखील चर्चेचा विषय आहे. ते अशा वेळी दिल्लीतील दिल्लीकर मतदान करत होते, सत्ताधारी पक्षाची किंवा विरोधी पक्षाची बोट बुडवण्यासाठी मतदान करत होते. तसे पाहता, सनातन धर्मावर विश्वास …

Read More »

महाकुंभ मेळ्यात पहाटेच्यावेळी चेंगराचेंगरीची घटना, १५ जण मृत्यूः संख्या वाढण्याची शक्यता मध्यरात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास शाही स्थानासाठी उडालेल्या झुंबडमुळे चेंगराचेंगरी

बुधवारी (२९ जानेवारी २०२५) पहाटे महाकुंभाच्या संगम परिसरात मौनी अमावस्येनिमित्त पवित्र स्नान करण्यासाठी कोट्यवधी यात्रेकरू जागेसाठी धावपळ करत असताना चेंगराचेंगरी झाली आणि त्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. सध्या उत्तर प्रदेश सरकारकडून १५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चेंगराचेंगरीत उत्तर प्रदेश सरकारने …

Read More »

आंदोलक विद्यार्थी ठामः उत्तर प्रदेश सरकारची एका दिवसात परिक्षा घेण्याची तयारी प्रांतीय परिक्षा एका दिवसात घेण्यास तयार

उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी उमेदवारांनी प्रयागराजमध्ये केलेला निदर्शने गुरुवारी चौथ्या दिवशीही करण्यात आली. अखेर उत्तर प्रदेश राज्य सरकारने जाहीर केले की, ते प्रांतीय नागरी सेवा परीक्षा (पीसीएस) प्राथमिक परीक्षा एकाच वेळी एकाच दिवशी घेणार आहेत – मुख्य मागण्यांपैकी एक आंदोलक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्तक्षेपानंतर हे पाऊल …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही बटेंगे… चा पुढचा नारा “एक है तो सेफ है” धुळ्याच्या प्रचार सभेत दिला नारा

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराच्या निमित्ताने भाजपाचे नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा आणि महायुतीच्या प्रचाराला आजपासून सुरुवात केली. परंतु धुळ्यातील पहिल्याच जाहिरसभेत बोलताना नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगेचा नारा देत पुन्हा एकदा हिंदू मतांचे धुव्रीकरणाच्या धर्तीवर पुढचा नारा देत एक …

Read More »

अयोध्येतील महाराष्ट्र सदनासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून भूखंड मंजूर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी २.३२७ एकरचा भूखंड मंजूर केला आहे. अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यातील अतिथी, भाविक व पर्यंटकांच्या सोयी सुविधांसाठी उभारण्यात येणारे हे महाराष्ट्र सदन येत्या २ वर्षांत पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. उत्तर प्रदेश सरकारच्या नियोजन …

Read More »

मंदिराचे ट्रस्टी आता समर्थ रामदास तर योगी आदित्यनाथ छत्रपती शिवाजी महाराज ?

तसेही देशात हिंदूत्ववादी राजकारणाला देशातील आणि विशेषत पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेने स्विकारण्यास सुरुवात केली आहे. तसे उत्तर भारतातील केवळ भगव्या कपनीने स्वतःला विद्वान (?) समजणाऱ्यांची संख्या वाढीस लागली आहे. त्यामुळे उत्तर भारतातील अनेक कथित भगवी कपनी धारण करणाऱ्यांना महाराष्ट्राचा आणि देशाच्या इतिहासाचा नव्याने शोध लावण्याचा प्रकार सर्रास सुरु झाला आहे. पुणे …

Read More »

अखिलेश यादव यांचे भाकित,…तर भाजपाचा ८० जागांवर पराभव होईल.. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी वैद्यकीय महाविल्यालयांना भेटी द्याव्या मग कळेल

उत्तर प्रदेशात काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीत समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी चांगलीच लढत देत भाजपाचा जवळपास ५० जागांवर पराभव केला. तसेच ३०० पार असलेल्या भाजपाला २५० जागांवर रोखले. त्यानंतर आगामी लोकसभा निवडणूकीत ८० जागांवर भाजपाचा पराभव होऊ शकतो असे भाकित केले. विशेष म्हणजे भाजपाने आगामी २०२४ च्या लोकसभा …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसचा सल्ला, मुख्यमंत्री भाजपाच्या कुटील डावाला बळी पडू नका मुख्यमंत्री महाराष्ट्रातील भूमीपूत्रांच्या नोकरीचे आणि गुंतवणूकीचे संरक्षण करा

महाराष्ट्रातील भूमीपूत्रांच्या नोकरीचे आणि गुंतवणूकीचे संरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावे आणि भाजपाच्या कुटील डावाला बळी पडता कामा नये अशी भूमिका घ्यावी असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन बॉलिवूड आणि उद्योग उत्तरप्रदेशमध्ये नेण्याचे केलेल्या विधानाचा महेश …

Read More »