मागील काही महिन्यापासून उत्तर प्रदेशात झालेल्या जातीय हिंसाचाराला फक्त विशिष्ट समुदायातील व्यक्तींना जबाबदार ठरवून त्या व्यक्तींच्या घरावर बुलडोझर चालवित नेस्तानाभूत करण्याचे प्रकार उत्तर प्रदेशातील योगी सरकारने सुरू केले. या निर्णयामुळे अनेक निष्पाप व्यक्तींवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे आणि त्या व्यक्तींच्या घरांवर जाणीवपूर्वक बुलडोझर चालवित बेघर करण्याच्या घटना उघडकीस आल्यानंतर …
Read More »योगीं आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशातील ३७ वर्षाचा रेकॉर्ड मोडलाः दुसऱ्यांदा सत्ता ग्रहण मतांची टक्केवारीही वाढली
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहीलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीत ३७ वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडून काढत पुन्हा एकदा मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ सरकारने आपला करिश्मा दाखवित दुसऱ्यांदा विजय मिळविला. त्यामुळे युपीत पुन्हा एकदा योगी आदित्यनाथचाच डंका वाजणार असल्याचे सिध्द झाले. त्याचबरोबर भाजपाच्या मतांच्या टक्केवारीतही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सकाळी मतमोजणीस …
Read More »“दलित-मागसांकडे दुर्लक्ष होतेय” युपीतील आणखी एका मंत्र्याचा राजीनामा २४ तासात दुसरे मंत्री पर्यावरण मंत्री दारासिंग चौहान यांनी दिला
मराठी ई-बातम्या टीम निवडणूकीच्या तारखेची घोषणा झाल्यापासून भाजपामधील आमदार आणि मंत्र्यांनी पक्षाचा राजीनामा देण्याचे सत्र काही थांबायला तयार नाही. काल कामगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्या यानी राजीनामा देवून २४ तास उलटत नाही तोच आज उत्तर प्रदेशचे पर्यावरण मंत्री दारासिंग चौहान यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यातील दलित-मागासवर्गीय समाजाच्या प्रगतीकडे …
Read More »प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची आता थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडे धाव विखारी वक्तव्य करणा-या शरजिल उस्मानीला तातडीने अटक करण्याची मागणी
मुंबई: प्रतिनिधी हिंदू समाज सडलेला आहे.. असे विखारी वक्तव्य करणारा उत्तर प्रदेशचा नागरिक शरजिल उस्मानी याला तातडीने अटक करण्याची मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री योगी यांना पाठविलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की, पुणे येथे झालेल्या …
Read More »‘बेटी बचाओ’चा नारा देणारे पंतप्रधान मूग गिळून गप्प का? हाथरस पीडित कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी सोमवारी काँग्रेसचा सत्याग्रह: थोरात
मुंबई: प्रतिनिधी उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेने देशाला शरमेनं मान खाली घालायला लावली पण भाजपाच्या योगी आदित्यनाथ सरकारची थोडीही संवेदना जागी झाली नाही. हे प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे व हुकुमशाही पद्धतीने हाताळण्यात आले. पीडित कुटुंबाला न्याय देण्याऐवजी त्यांना धमक्या देण्यापर्यंत उत्तर प्रदेश सरकारची मजल गेली. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष …
Read More »मोदी धृतराष्ट्र झाले का? गांधी जयंती दिवशी युपीमध्ये लोकशाहीचे किळसवाणे वस्त्रहरण! काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिवशी उत्तर प्रदेश सरकारने सत्तेच्या धुंदीत लोकशाहीचे चालवलेले किळसवाणे वस्त्रहरण सर्व देश पहात आहे. महाभारतात देखील महिलेवर दुर्योधन, दु:शासन अत्याचार करत असताना धृतराष्ट्रासह सर्वजण हातावर हात धरून गप्प बसले होते. आज हाथरसमध्ये एका दलित परिवारातील मुलीवर बलात्कार करुन तीची हत्या झाली आणि ते …
Read More »मंत्री राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतले ताब्यात दलित सरपंचाच्या कुटुंबियाच्या भेटीसाठी गेले असता कारवाई
आझमगड-मुंबई: प्रतिनिधी उत्तर प्रदेशातील जिल्हा आझमगड येथील बांसा गाव येथील दलित सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी मारून क्रूर हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशातील दलितांच्या या वाढत्या हल्ल्याची गंभीर दखल अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने घेतली. यासाठी या विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत …
Read More »पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघातील गावाची बातमी केली म्हणून पत्रकारावर गुन्हा scroll.in च्या पत्रकारावर उत्तर प्रदेशात गुन्हा दाखल
मुंबई: प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेल्या गावातील लोकांना सरकारने कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे तेथील लोकांवर उपासमारीची वेळ आल्याची बातमी प्रसिध्द केली म्हणून scroll.in या संकेतस्थळाच्या पत्रकारावर उत्तर प्रदेशात गुन्हा दाखल करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी जिल्ह्यातील डोमरी या अनेत गावात …
Read More »
Marathi e-Batmya