Tag Archives: congress

विजय वडेट्टीवार यांचा इशारा, नथुराम गोडसेचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही

महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. देशासाठी त्यांनी संपूर्ण जीवन समर्पित केले. स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधींच्या अतुलनीय योगदानामुळे आजचा प्रजासत्ताक दिन आपण मोठ्या अभिमाने साजरा करतो आहे. पण प्रजासत्ताक दिन साजरा करण्याऐवजी महात्मा गांधी यांची हत्या केलेल्या नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ पंढरपुरात काही समाजकंठकांनी जयजयकाराच्या घोषणा देत पोस्टरबाजी …

Read More »

नाना पटोले यांचे आवाहन, धर्मांध शक्तींना सत्तेतून बाहेर फेका…

देशाची सत्ता ज्या दिवशी धर्मांध शक्तींच्या हातात जाईल त्या दिवशी लोकशाही संपुष्टात येईल, असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते ते आज स्पष्ट दिसत आहे. देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी मोठी लढाई लढावी लागली, बलिदान द्यावे लागले. सत्तेत आज धर्मांध शक्ती आहेत आणि लोकशाही, संविधान, सर्व लोकशाही व्यवस्था पायदळी तुडवली …

Read More »

महाविकास आघाडीचे वंचितला निमंत्रण, पण प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

आगामी लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्राच्या प्रमुख विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला सहभागी करणार की नाही यावरून उलट-सुलट चर्चेला उधाण आले होते. त्यातच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी निवडणूका जाहिर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे जाहिर केले. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर …

Read More »

अलका लांबा यांचा आरोप, ‘बेटी बचाओ,…’चा नारा देणारे भाजपाच्या राज्यातच अत्याचारी मोकाट

स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाने पंचायत राजमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊन राजकारणातील महिलांचा सहभाग वाढवला आहे. महिलांचा राजकारणातील सहभाग वाढवण्याचा काँग्रेस पक्षाचा सातत्याने प्रयत्न राहिलेला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये ४० टक्के महिलांना उमेदवारी देऊन काँग्रेसने एक ऐतिहासिक पाऊल उचलले होते. महिला आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी केंद्रातील भाजपा …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणारे दोन मंत्री आता कुठे लपले?

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे, सरकारने त्यांच्याशी चर्चा केली, राणाभिमदेवी थाटात अनेक घोषणा केल्या. मराठा समाजाला आरक्षण देणारच असे जाहीरपणे सांगितले तरीही अद्याप आरक्षण मात्र दिलेले नाही. सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. मुंबईत येण्याचा इशारा दिल्यानंतरही सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत. …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल… उदयनिधी स्टॅलिनची मते उद्धव ठाकरेंना मान्य आहेत का ?

सनातन हिंदू धर्माला संपवण्याची उद्दाम भाषा करणा-या उदयनिधी स्टॅलिन यांच्यासोबत इंडी आघाडीमध्ये रहाणे उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का असा परखड सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी केला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांचे सुपूत्र क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन हे सनातन हिंदू धर्माला संपवण्याची उद्दाम भाषा वारंवार करत …

Read More »

राहुल गांधी यांनी ठणकावले, आणखी ५० गुन्हे दाखल करा, मी घाबरत नाही

मणिपूरहून १४ जानेवारी २०२४ रोजी झालेली भारत जोडो न्याया यात्रा उद्या पश्चिम बंगालमध्ये पोहोचत आहे. दरम्यान आसाममधील यात्रेच्या प्रवासा दरम्यान आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्व सरमा यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर विविध कलमांखाली जवळपास ५० गुन्हे दाखल केले. यापार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी येथील जाहिर सभेत बोलताना भाजपा, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ …

Read More »

काँग्रेसचा सवाल, महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्नांवर पंतप्रधान एक शब्दही का बोलत नाहीत ?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वेळा महाराष्ट्रात आले, पण राज्याला काहीच दिले नाही. पंतप्रधान मोदी प्रत्येक राज्यात तीन-चारवेळा जात आहेत पण जनतेला भेडसावत असलेल्या मुलभूत प्रश्नांवर काहीच बोलत नाहीत. देशात आज शेतकरी, कष्टकरी कठीण परिस्थितीत जगत आहे, बेरोजगार तरुण नोकरीची प्रतिक्षा करत आहेत, परंतु पंतप्रधान मोदी फक्त राम मंदिर या …

Read More »

नाना पटोले यांची टीका, राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखण्याचे कृत्य सत्तेचा…

भारत जोडो यात्रेला ईशान्य भारतात प्रचंड जनसमर्थन मिळत आहे. यात्रेला मिळत असलेला जनतेचा प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्ष घाबरला असून या भितीतून भारत जोडो न्याय यात्रेवर भ्याड हल्ले करण्यात येत आहेत. आज राहुल गांधी आसाममधील मंदिरात दर्शन करण्यास जात असताना त्यांना मंदिरात जाऊ दिले नाही. मंदिरात जाण्यास आता भाजपाची परवानगी …

Read More »

आसाममध्ये राहुल गांधी यांना मंदिर प्रवेश नाकारला

एकाबाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करोडो लाखो-रूपये खर्चुन उभारण्यात आलेल्या राम मंदिरात राम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सकाळपासून अयोध्येत शासकिय राजशिष्टाचाराला डावलून मग्न राहिले. तर दुसऱ्याबाजूला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सध्या सुरु असलेल्या भारत जोडो न्याय यात्रा आसाममधून पुढे सरकत आहे. परंतु आसाम नागरिकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री श्री शंकरदेव …

Read More »