ग्रामीण भागात नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या बहुतांश प्रादेशिक पाणीपुरवठा योजना थकीत वीजबिल आकारणी अभावी बंद झालेल्या आहेत, या योजनांना शासनाने वीजबिलात माफी किंवा सवलत द्यावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात केली. नागपूर हिवाळी अधिवेशनात बाळासाहेब थोरात यांनी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा मुद्दा लावून धरला. बाळासाहेब थोरात म्हणाले, …
Read More »महादेव अॅप प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत मोठी माहिती
‘महादेव ॲप’ या ऑनलाइन जुगार चालवणाऱ्या विरोधात विविध राज्यात दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राज्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. राज्यातील अशा प्रकारचे गुन्हे आणि गैरप्रकार रोखण्यासाठी आता राज्य शासन डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, …लुट करणाऱ्या कंपनीवर कारवाई करणार का?
ठाणे जिल्ह्यातील मीरा भायंदर येथील ८९९४ एकर जमीन तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने २००८ रोजी इस्टेट इन्व्हेस्टमेंट या खाजगी कंपनीला बेकायदेशीरपणे हस्तांतरीत करण्यात आली असून या कंपनीचे ७/१२ उताऱ्यावर नावही आहे. येथील जमीन व्यवहार करताना जनतेला या कंपनीला पैसे द्यावे लागतात. सरकारी जमिनीवरून अशा पद्धतीने पैसे वसूल करण्याचा या कंपनीला अधिकार आहे …
Read More »नाना पटोले यांची टीका,…भयावह परिस्थितीत सरकारचे दुर्लक्ष आणि जनता वाऱ्यावर
छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात वणवा पेटवून भाजपाला काय मिळते? महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, पाण्याची टंचाई आहे तसेच आरक्षणावरून महाराष्ट्र अशांत करण्याचे पाप केले जात आहे. राज्यातील परिस्थिती अत्यंत भयावह आहे. वाऱ्यावर सोडणार नाही असे मुख्यमंत्री सांगतात पण भाजपाप्रणित सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …
Read More »Security Breach प्रकरणी विरोधक आक्रमकः १५ खासदार निलंबित
संसदेत दोन तरूणांनी घुसखोरी करत आंदोलन लोकसभेच्या सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर तानाशाही नही चलेगी आणि भारत माता की जय अशा घोषणा देत आंदोलन केले. यावरून आणि संसदेची अभेद्य Security Breach (सुरक्षेतील) त्रुटीवरून विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत चर्चची मागणी केली. मात्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभा …
Read More »छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती,… त्यांना वेगळ आरक्षण द्या, मात्र ही झुंडशाही थांबवा
मराठा समाजाला आरक्षण देण्यासासाठी आपला विरोध नाही. त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे.ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. सारथी, प्रमाणे महाज्योतीसह इतर संस्थाना समान निधी द्यावा. ओबीसी समाजाचा सरकारी नोकऱ्यांमधील अनुशेष भरून काढण्यात यावा यासह विविध मागण्या मांडत नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावरील नियम …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, गृह विभागात २३ हजार ६२८ पदांची पोलिस भरती
गृह विभागातील १९७६ पासून आकृतीबंध नुसार पदभरती केली जात होती. आता लोकसंख्यनुसार किती अंतरावर पोलिस स्टेशन, कर्मचारी, युनिट असले पाहिजे याबाबत नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला असून याअंतर्गत २३ हजार ६२८ पोलिस शिपाई पदे भरली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. गृह विभागातील पोलीस शिपाई …
Read More »नाना पटोले यांची मागणी, आरक्षणाच्या वादावर एकच पर्याय…
राज्यात आज विविध समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. मराठा, धनगर, हलबा, गोवारी, ओबीसी समाज आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला, हे बीज कोणी रोवले? भाजपाने सत्तेत येण्यासाठी २०१४ मध्ये या समाज घटकांना आरक्षणाचे आश्वासन दिले होते मग सत्ता आल्यानंतर आरक्षण देण्यापासून तुम्हाला कोणी थांबवले आहे का? आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीतच …
Read More »प्रसूतीदरम्यान महिलांच्या मृत्यूवरून विरोधकांचा गदारोळ आणि सभात्याग काँग्रेसच्या सदस्यांनी आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी घेरले
गडचिरोली जिल्ह्यातील दोन आणि अकोला जिल्ह्यातील एक अशा तीन महिलांचे योग्य व वेळीच उपचार न मिळाल्याने प्रसूति दरम्यान मृत्यू झाल्यामुळे आज विधानसभेत प्रश्नोत्तर तासात प्रचंड गदारोळ झाला.आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सर्व विरोधी सदस्यांनी निषेध करीत सभात्याग केला. विधानसभेचे नियमित कामकाज सुरु …
Read More »अजित पवार यांचे सारथीच्या फेलोशिप संदर्भात मोठे वक्तव्य
राज्य सरकारच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून (सारथी) मराठा समाजातील पीएच.डी. करणाऱ्या केवळ २०० विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात येणार आहे. मुळात यासाठी १३८९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. सरकारने जाहिरात काढताना विद्यार्थ्यांच्या मर्यादा संख्येचा त्यात उल्लेख नव्हता. त्यामुळे २०२३ च्या बॅचमधील संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्या, अशी मागणी …
Read More »
Marathi e-Batmya