Tag Archives: congress

सर्वोच्च न्यायालयाचा ईडीला थेट सवाल, राजकीय लढाईत ईडीचा का वापर केला जातोय? कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधातील खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सवाल करत याचिका फेटाळून लावली

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी बीएम पार्वती यांना बजावण्यात आलेले समन्स रद्द करण्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने दाखल केलेली अपील सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. पार्वती म्हैसूर शहरी विकास प्राधिकरण (MUDA) घोटाळ्यातील आरोपी आहेत. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (CJI) बी आर गवई आणि न्यायमूर्ती के विनोद …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदी यांना सवाल देशाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार

मे महिन्यात भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान “पाच जेट विमान पाडण्यात आले” असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला. त्यापाठोपाठ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यांनीही शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न याबाबत विचारत म्हणाले की, देशाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. राहुल गांधी यांनी पुढे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मोदीजी, …

Read More »

वर्षा गायकवाड म्हणाल्या, उत्तर भारतीय समाजाला जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ अभियान उत्तर भारतीयांच्या विकासात काँग्रेसचे योगदान

उत्तर भारतीय समाज, मुंबई व काँग्रेस पक्ष यांचे एक घट्ट नाते आहे. मुंबईत आलेल्या उत्तर भारतीय समाजाला काँग्रेस हा मोठा आधार राहिलेला आहे. आजही काही लोक उत्तर भारतीयांविरोध आग ओकत असताना काँग्रेस मात्र या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि आगामी काळात उत्तर भारतीय समाजाला काँग्रेस पक्षाशी मजबूतपणे जोडण्याचे काम …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, काँग्रेसमध्ये लोक कामगिरी करतात, तर भाजपात फक्त बोलतात साधना समावेशा कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची भाजपावर टीका

१९ जुलै रोजी म्हैसूर येथे साधना समवेशा कार्यक्रमाला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, काँग्रेस पक्षात लोक कामगिरी करतात, तर मोदींच्या भाजपामध्ये लोक फक्त बोलतात. मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संविधानाचा ‘खून’ केल्याचा आरोप केला आणि असे प्रतिपादन केले की भारतातील लोक भाजपा आणि आरएसएसला त्यात बदल …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, मारामारीचे प्रायश्चित म्हणून मुख्यमंत्री फडणवीसांनी राजानीमा द्यावा पावसाळी अधिवेशनात शेतकरी, कष्टकरी, महिला, बेरोजगारांच्या प्रश्नांना सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाने जनतेला काय दिले तर ‘राजा उदार झाला आणि हाती भोपाळा दिला’, असेच म्हणावे लागेल. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे, महिला सुरक्षित नाहीत, ड्रग्जचा सुळसुळाट जोरात सुरु आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कर्जमाफी, पीकविमा, बेरोजगारी यातील एकाही प्रश्नावर ना सविस्तर चर्चा झाली ना काही निर्णय. हे अधिवेशन लक्षात राहिल …

Read More »

संसदेच्या लेखा समितीकडून आधार बायोमेट्रिकबाबत व्यक्त केली चिंता अनेक लाभार्थी योजनेतून वगळले जाण्याची शक्यता

संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीने भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या कामकाजाचा आढावा घेण्याची मागणी केली आहे, ज्यामध्ये आधार बायोमेट्रिक पडताळणीच्या उच्च दरासह अनेक चिंता व्यक्त केल्या आहेत ज्यामुळे अनेक लाभार्थी सामाजिक कल्याणकारी योजनांमधून वगळले जाऊ शकतात. गुरुवारी (१७ जुलै, २०२५) झालेल्या बैठकीत, ज्येष्ठ काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीला …

Read More »

नाना पटोले यांचा विधानसभेत गौप्यस्फोट, मंत्रालय, ठाणे, नाशिक हनी ट्रॅपचे केंद्र पेन ड्राईव्ह दाखवित मंत्री, अधिकारी गुंतल्याचा आरोप

मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचे केंद्र बनले आहे. या माध्यमातून राज्यातील गोपनीय दस्तऐवज थेट असामाजिक तत्वांच्या हाती पोहोचत आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे जेष्ठ आमदार नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना केला. यावेळी नाना पटोले यांनी हनी ट्रॅपचे चित्रीकरण असलेला पेन ड्राइव्ह सभागृहात दाखवला. काँग्रेस नेते नाना …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन, झुडपी जंगल क्षेत्रावर घर असलेला कुणीही बेघर होणार नाही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाननुसार काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या प्रश्नावरील उत्तरा दरम्यान माहिती

सर्वोच्च न्यायालयाने २२ मे २०२५ रोजी आदेश पारित करून विदर्भातील झुडपी जंगल जमीन वन क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे पालन करीत झुडपी जंगल क्षेत्रावर घर असलेल्या नागरिकांना शासन बेघर होऊ देणार नाही, अशी ग्वाही विधानसभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. विदर्भातील सहा जिल्ह्यातील …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, भाजपा चेटकीण; दुसऱ्या पक्षातील नेते खाण्याचा रोग दारु परवाने कंपन्यांसाठी खुले करण्यामागे पुण्याचे पालकमंत्री; Conflict of interest विचारात घेऊन उत्पादन शुल्क खाते काढून घ्या

भाजपाकडे मोठे चमत्कार करणारे ५६ इंच छातीचे नेतृत्व असून सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा ते करत असतात पण तो दावा पोकळ आहे. स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देण्याचे सोडून दुसऱ्या पक्षातील नेते व पदाधिकारी यांच्यावर दबाव आणून, धमक्या देऊन भाजपात घेत आहेत. भारतीय जनता पक्ष चेटकीण आसाहे, तीला दुसऱ्या पक्षातील लोक …

Read More »

राहुल गांधी यांच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका वाचण्याचे निर्देश राहुल गांधी यांना द्यावे म्हणून याचिका

मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी एक जनहित याचिका (पीआयएल) फेटाळून लावली ज्यामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल “अपरिपक्व” टिप्पणी करून याचिकाकर्त्याच्या अधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. अभिनव भारत काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पंकज फडवणीस यांनी दाखल केलेल्या याचिकेत राहुल गांधी यांना विनायक दामोदर …

Read More »