‘बंकिमचंद्र चॅटर्जी’ लिखीत ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताचे ३१ ऑक्टोबर रोजी पूर्ण गायन करावे, अशी राज्यातील सर्व शाळांवर लादण्यात आलेली सक्ती मागे घ्यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना केली आहे. सरकार गुणवत्तापूर्ण शिक्षणाऐवजी ज्ञानाच्या क्षेत्रात धार्मिक मुद्दे आणून ‘आरएसएस’चा सांस्कृतिक अजेंडा …
Read More »दादाजी भुसे यांचे आवाहन,शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग करा शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार निधी वापरा
राज्यात एक लाखांहून अधिक शाळांमधून दोन कोटींपेक्षा अधिक विद्यार्थी शालेय शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना राष्ट्र प्रथम या संकल्पनेवर आधारित गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण दिले जाते. शासनाच्या माध्यमातून शाळांमध्ये विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. याचबरोबर विविध उद्योग सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून देखील सहकार्य करतात. यामध्ये सुसूत्रता आणून शाळा …
Read More »दादाजी भुसे यांची माहिती, शाळांमध्ये मराठी भाषा राज्यगीत गायन अनिवार्य सर्व शिक्षण मंडळाच्या समन्वयक, प्राचार्य यांची सहविचार बैठक
राज्य शिक्षण मंडळासह अन्य सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्ययन व अध्यापन अनिवार्य असून राज्यगीत गायन सुद्धा केले जावे, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केली. राज्यातील सर्व शिक्षण मंडळाच्या समन्वयक, प्राचार्य आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांची सहविचार बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शालेय शिक्षण मंत्री भुसे बोलत …
Read More »अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीच्या पार्व्शभूमीवर निर्णय
राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या ३० सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीतील निर्देश यांचा विचार करुन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची शेवटची संधी देण्यात येत …
Read More »प्राथमिक शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी परिस्थितीचे भान राखणाऱ्या शिक्षकांचे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून कौतुक
राज्यात मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना शासनामार्फत सर्वतोपरी साहाय्य केले जात आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खारीचा वाटा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी एक दिवसाचे वेतन देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे कळविले आहे. राज्यातील पूर परिस्थितीचे भान राखून मदतीचा निर्णय …
Read More »दादाजी भुसे यांची घोषणा विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण बालमनापासून शिस्त लागावी यासाठी प्रशिक्षण देण्याचा मानस
राज्यातील विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये देशाविषयी आदर निर्माण व्हावा, यासाठी एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा मानस असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. यादृष्टीने त्यांनी एनसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. मुलांना पहिलीपासून सैनिकी शिक्षण अथवा एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा मानस मंत्री दादाजी भुसे यांनी जाहीर केला होता. त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या …
Read More »-मुख्यमंत्र फडणवीस यांच्या उपस्थितीत खान अकॅडमी व श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्टसोबत सामंजस्य करार दर्जेदार व अनुभवाधिष्ठित शिक्षणातून राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रास नवी दिशा
राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व अनुभवाधिष्ठित शिक्षण मिळावे, या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने ‘खान अकॅडमी’ आणि ‘श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’ या दोन नामांकित संस्थांशी शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण दोन स्वतंत्र सामंजस्य करार (MoU) केले. या करारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या सामंजस्य करारप्रसंगी …
Read More »आशिष शेलार यांची माहिती, अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ आशिष शेलार यांची माहिती, अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ
अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ, असे आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार यांनी दिले. अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या अॅड आशिष शेलार यांनी कॅलिफोर्निया राज्यातील सॅन फ्रान्सिस्को येथील बे एरिया येथे मराठी शाळा चालवणाऱ्या महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. सेवा भावाने एकत्र आलेली मराठी माणसे …
Read More »दादाजी भुसे यांची स्पष्टोक्ती, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा प्रयत्न यु-डायस प्रणालीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांची संख्या घसरलेली
शासन विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या, शाळाबाह्य विद्यार्थी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात गंभीर असून सर्वंकष उपाययोजना राबवत आहे. यु-डायस (UDISE) प्रणालीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांची संख्या काहीशी घसरलेली असली तरी त्यामागील कारणे समजून घेऊन योग्य ती कार्यवाही केली जात आहे, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले. नियम ९२ अन्वये अर्धातास चर्चेला उत्तर देतं मंत्री भुसे बोलत …
Read More »वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल, ज्या माशेलकर समितीचा संदर्भ दिला जातोय ती विभागाची नाही सत्ताधारी आणि सरकारचे दलाल खोट्या अफवा पसरवतायत
भाजपाच्या हिंदी सक्तीच्या अजेंडाविरुद्ध आज उभा महाराष्ट्र एकवटला असताना ही एकजूट होऊ नये आणि भाजपच्या महाराष्ट्र व मराठी द्वेषी धोरणाविरुद्ध मराठी माणूस लढा उभारू नये यासाठी सत्ताधारी मंडळी आणि सरकारचे दलाल खोट्या अफवा पसरवून तसेच चुकीचा संदर्भ देऊन कसं उपद्रव माजवत आहेत, असा आरोप मुंबई काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी …
Read More »
Marathi e-Batmya