Tag Archives: devendra fadnavis

बच्चू कडू यांची स्पष्टोक्ती, मतदारसंघ शिवसेनेचा, अन् उमेदवार… भाजपाच्या हस्तक्षेपावरून सरळ सरळ टीका

काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीत राज्यात महायुतीला अवध्या १८ जागा मिळाल्या. या अठरा जागांना भाजपाचे धोरण कारणीभूत ठरल्याची चर्चा तेव्हापासून राज्याच्या राजकारणात आहे. तसेच शिवसेना शिंदे गटाने नाशिकचा उमेदवार जाहिर केला म्हणून पुढील कोणताच उमेदवार शिवसेना शिंदे गटाने जाहिर करायचा नाही अशी बंधने भाजपाने शिवसेनेवर घातल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु …

Read More »

महाराष्ट्रातील वीज खरेदीचे कंत्राट अदानीला; जयराम रमेश यांचे पाच प्रश्न जयराम रमेश यांचा आरोप, पराभवाच्या छायेखाली असतानाही कंत्राट अदानीलाच

राज्याच्या ऊर्जा विभागाने नुकतेच वीच खरेदी संदर्भात निविदा काढली होती. मात्र हि निविदा अदानीलाच मिळावी यासाठी निविदेतील नियमावली त्या पद्धतीने तयार करण्यात आली. तसेच पराभवाच्या छायेत असलेल्या राज्य सरकारने सत्तेच्या शेवटच्या दिवसातही अदानी कंपनीला कंत्राट मिळावे यासाठी पाठपुरावा केला असल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी करत या कंत्राटाच्या अनुषंगाने …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसची पोलिसात तक्रार फेक न्यूज पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न- काँग्रेसची कुलाबा पोलीस स्थानकात तक्रार

कर्नाटकातील गणपती विसर्जनाबाबत फेक न्यूज पसरवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केली. यासंदर्भात कुलाबा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. कर्नाटकातील घटनेची सत्य माहिती १३ सप्टेंबर रोजी बेंगलूरूच्या टाऊन …

Read More »

डबेवाले आणि चर्मकार समाजाचे घरांचे स्वप्न होणार साकार १२ हजार घरांच्या निर्मितीसाठी सामंजस्य करार

मुंबईतील डबेवाले आणि चर्मकार समाजबांधवांसाठी १२ हजार घरांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी आज विकासक आणि शासनामार्फत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यातून डबेवाल्यांचे ६० वर्षांपासूनचे स्वप्न येत्या ३ वर्षांत साकार होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ सभागृहात यासंदर्भातील …

Read More »

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि एमएमआरडीए यांच्यात सामंजस्य करार मुंबई जगातील सात महत्वाच्या महानगरांमध्ये स्थान पटकावेल – प्रा. श्र्वाब

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण- एमएमआरडीए यांच्यातील सामंजस्य करारामुळे मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्राचे स्वप्न दृष्टीपथात आले आहे. यातून आगामी काळात मुंबईचा जीडीपी – सकल उत्पन्न दुप्पट होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले. तर निती आयोगाने महाराष्ट्राच्या एक लाख कोटी डॉलर्स – वन ट्रिलीयन डॉलर्स …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, मरिन लाईन्स ते वांद्रे सी लिंक अंतर १० मिनिटात धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याचे उद्घाटन

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा मुंबईसाठी गेमचेंजर ठरणारा प्रकल्प आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकारक, जलद, दिलासादायक आणि वेळेची बचत करणारा होणार आहे. हा प्रकल्प मुंबईच्या पायाभूत सुविधा विकासातील पुढचे पाऊल असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाच्या लोकार्पणाप्रसंगी सांगितले. या प्रकल्पामुळे मरिन ड्राईव्ह ते …

Read More »

नाना पटोले यांचा खोचक सल्ला,… फडणवीस-शिंदेंनी अभ्यास करून बोलावे भाजपा व RSS हेच खरे आरक्षणविरोधी; आरक्षण व संविधानावर भाजपाने बोलूच नये

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातील विधानाचा चुकीचा अर्थ काढून भारतीय जनता पक्ष त्यांच्या अंगभूत सवयीप्रमाणे खोटा प्रचार करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या जगातील सर्वश्रेष्ठ संविधानाला भाजपाची मातृसंस्था आरएसएस मानत नाही. आरक्षणाला RSS चाच विरोध आहे, सरसंघचालक मोहन भागवत यांनीही आरक्षण संपुष्टात आणले पाहिजे अशी जाहीर वक्तव्ये …

Read More »

महानिर्मिती, महापारेषण, महावितरणमधील कंत्राटी कामगारांच्या वेतनामध्ये १९ टक्के वाढ उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

राज्याच्या विविध भागातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये १९ टक्के वाढ करण्यात येत असल्याची घोषणा ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्यादी अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत केली. ही वाढ मार्च २०२४ पासून लागू करण्यात आली आहे. राज्यातील ऊर्जासंबंधी कार्यरत या तीनही कंपन्यांमध्ये काम …

Read More »

राज्यातील आरटीओ कर्मचारी २४ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित अंमलबजावणी नाहीच

मोटार वाहन – आरटीओ विभागासाठी आकृतीबंध मान्यतेचा शासन निर्णय जारी झाला. अत्यंत नगण्य अशा पदोन्नतीच्या संधी असल्याने सदर शासन निर्णयाने कर्मचा-यांमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले. परंतु मागील दोन वर्षात काही तांत्रिक बाबींचा बाऊ करुन आकृतीबंधाच्या अंमलबजावणीस टोलवाटोलवी करत या शासन निर्णयाची अंमबलबजावणी केली जात नसल्याच्या निषेधार्थ आरटीओ कर्मचारी संघटनेने बेमुदत …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, केंद्रासाठी महाराष्ट्र लाडका नाही का? मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महायुतीने केंद्राच्या पाया पडावं

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असताना महायुती सरकारला, राज्याच्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची चूल पेटली नाही तरी देखील राज्याचे कृषी मंत्री सिनेतारकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी मदत मागायची कुणाकडे हा खरा प्रश्न आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आंध्र प्रदेश आणि …

Read More »