Tag Archives: devendra fadnavis

आदित्य ठाकरे यांचे शिंदे गटाला आव्हान, ….तर मी काहीही हरायला तयार

२० जून हा जागतिक खोके दिन आहे. कारण ज्या लोकांनी आपल्याशी गद्दारी केली त्यांच्या गद्दारीची दखल ३३ देशांनी घेतली असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. तसेच आम्ही जे मुंबईत काम केलय तसंच काम केल्याचं प्रेझेन्टेशन शिंदे गटातील कोणत्याही मंत्र्याने द्यावे मी काहीही हारायला तयार असल्याचे आव्हाही …

Read More »

सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर अजित पवार यांची स्पष्टोक्ती,… फारसे मनावर घेऊ नका

मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी बारामतीत अडवलं होते. ते पाणी पुन्हा मराठवाड्याच्या वाट्याला देण्याचं काम आमचं सरकार आल्यानंतर करत आहे, असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पवार कुटुंबाला अप्रत्यक्षपणे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. याला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बारामतीचं नाव घेतलं की, वेगळं महत्व प्राप्त होतं. ब्रेकिंग आणि हेडलाईन …

Read More »

जयंत पाटील यांचा सवाल,… पोलिस व गुप्तहेर खाते नक्की काय कारवाई करतेय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात दंगली, दगडफेक, महिलांवर अत्याचार असे प्रकार वारंवार घडत असताना राज्यातील पोलिस व गुप्तहेर खाते नक्की काय कारवाई करीत आहे, असा प्रश्न सामान्य लोकांच्या मनात निर्माण झाला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगतानाच यावर प्रकाश टाकणारे पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना पाठविले आहे. …

Read More »

सुधारीत जाहिरात प्रश्नी मुख्यमंत्री शिंदे यांची स्पष्टोक्ती, अतिउस्ताही कार्यकर्त्या…

गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या शिंदे गटात तणाव असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघावरून दोन्ही पक्षांमधील नेते भिडले. त्यापाठोपाठ राज्यातल्या सर्व प्रमुख वर्तमान पत्रांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याची जाहिरात प्रसिद्ध झाली. तसेच या जाहिरातीत केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल, महिलांवरील वाढत्या अत्याचाराला राज्याचे गृहखाते जबाबदार

केंद्र व राज्य सरकार महिलांच्याबाबतीत अतिशय असंवेदनशील आहे. दिल्लीत महिला कुस्तीपटूंची केस ज्यापद्धतीने पोलिसांनी हाताळली हा पहिला मुद्दा आणि महाराष्ट्रात सातत्याने महिलांच्या विरोधात ज्या पध्दतीच्या घटना वाढत चालल्या त्याला सर्वस्वी राज्याचे गृहखाते जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान मरीन ड्राईव्ह …

Read More »

लोकसभा अध्यक्ष, विधानसभाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय विधायक संमेलनाचे उद्धघाटन

जनहिताची जपणूक करण्याची राज्यघटनेने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘एमआयटी’च्यावतीने जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे देशातील विधानसभा आणि विधानपरिषदेचे लोकप्रतिनिधी यांचे राष्ट्रीय विधायक संमेलन भारत २०२३ चे आयोजन करण्यात आले. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, विधानपरिषद …

Read More »

अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी शासनाचा प्रयत्न

गिरणी कामगारांचे मुंबईच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी जागेचा शोध घेतला जात असून त्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गिरणी कामगारांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे सन २०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सदनिका …

Read More »

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत बैठक

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असून राज्यातील ऊस तोड कामगार आणि शेतमजुरांची ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याची मोहिम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे ऊस दर नियंत्रण समिती व शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री …

Read More »

शिंदे-फडणवीसांमध्ये दिलजमाई? वर अजित पवार यांची स्पष्टोक्ती, मला काहीही वाटत नाही…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सारंकाही आलबेल नसल्याच्या चर्चा गेल्या दोन दिवसांपासून रंगल्या आहेत. मंगळवारी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त लोकप्रिय असल्याचा दावा करणारी जाहिरात सर्व प्रमुख मराठी वर्तमानपत्रांमध्ये झळकली होती. त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्यानंतर बुधवारी शिंदे गटाकडून नवी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून …

Read More »

एकत्र जाऊनही एकमेकांकडे न पाहणारे, नंतर मात्र मुख्यमंत्री म्हणाले, ये फेव्हिकॉल का मजबूज जोड

दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून हवे असल्याचा एका सर्व्हेचा अहवाल देत बहुतांष प्रसारमाध्यमांमध्ये मोठ मोठ्या जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपामध्ये खट्टास निर्माण झाल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली. तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या वादप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »