Breaking News

Tag Archives: devendra fadnavis

राज्य सरकारच्या आवाहनाला भाजपाचा प्रतिसाद भाजपातर्फे सेवाकार्य अभियानातंर्गत १ लाख २५ हजार कार्यकर्त्ये कामाला

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यावर आलेल्या कोरोना आजार संकटाच्या मुकाबल्यासाठी सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षांनी एकजूट दाखवित एकत्र येण्याचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. या आवाहनाला प्रदेश भाजपाने सकारात्मक प्रतिसाद असून राज्यातील गरजू लोकांना जेवण, त्यांना दैनंदिन वस्तुंचा पुरवठा, रक्तदान शिबीरे आदी गोष्टींसाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला …

Read More »

सुशिक्षित पण अडाणी वागणाऱ्या नागरिकांसाठी संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू लोकहितासाठी कठोर निर्णय घेत असल्याचे उध्दव ठाकरे यांची घोषणा

मुंबईःखास बातमीदार कोरोनाला रोखण्यासाठी वेळोवेळी नागरिकांना आवाहन करूनही सुशिक्षित असूनही अडाणी व्यक्तींसारख्या नागरीकांना ताळ्यावर आणण्यासाठी अखेर राज्य सरकारने संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. कोरोना विषयक सातत्याने माहिती देणे माझे कर्तव्य आहे , मी सर्वाना काळजीपोटीच आपल्याला या सुचना देतो. आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. आपण कोरोनाचा प्रादुर्भाव जर …

Read More »

४ तारखेला कोरेगांव-भीमा आयोगासमोर शरद पवार हजर राहणार अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबईः विशेष प्रतिनिधी दोन वर्षापूर्वी कोरेगांव भिमा येथे झालेल्या दंगलीची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या कोरेगांव भिमा चौकशी आयोगासमोर साक्ष देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे हजर राहणार आहेत. चार तारखेला ते साक्ष देण्यासाठी आयोगासमोर हजर राहणार असल्याचे यापूर्वीच आयोगाला कळविण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री …

Read More »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना सर्व माफ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खास सवलत

मुंबईः प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन आज पार पडले. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने त्यांना सर्व गोष्टी माफ असून त्यांनी किमान पुढील अधिवेशनात चर्चांना उत्तरे द्यावीत अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. अर्थसंकल्पिय अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर मंत्रालय व विधिमंडळात आयोजित पत्रकार परिषदेत ते …

Read More »

राष्ट्रवादी- शिवसेना म्हणाली, दूषित वातावरण होतेय भाजपाने बोलू नये एनपीआर, सीएएच्या कायद्यावरून विधानसभेत रणकंदन

मुंबईः विशेष प्रतिनिधी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या एनपीआर आणि सीएए कायद्यामुळे राज्यातील कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही. मात्र याबाबतच्या अफवा राज्याच्या मंत्र्यांकडूनच पसरविल्या जात असल्याने याप्रश्नी गृह विभागाने लक्ष घालण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यात माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन मंत्र्यांच्या नावाचा उल्लेख करून त्यांना बोलू न …

Read More »

प्रत्येक तालुक्याच्या विकासासाठी वर्षाला पाच कोटी देणार दूजाभाव केला नसल्याची अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती

मुंबईः विशेष प्रतिनिधी डोंगरी तालुक्याच्या निमित्ताने ज्या तालुक्यांना विकासासाठी ५० लाख मिळत होते, त्या तालुक्यांना १ कोटी रूपये देणार तर ज्या तालुक्यांना १ कोटी मिळतात त्यांना २ कोटी रूपये आणि मतदारसंघातील विकासकामासाठी आमदार निधी ३ कोटी रूपये असे मिळून वर्षाकाठी जवळपास ५ कोटी रूपयांचा निधी राज्यातील प्रत्येक तालुक्याला देणार असल्याची …

Read More »

चार दिवस सुनेचेही येतात… त्यामुळे चुकीला माफी नाही फडणवीस, मुनगंटीवारांवर अजित पवारांचा पलटवार

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सत्तेवर कधी समोरचे येतात तर सत्तेतले कधी समोर जातात. त्यामुळे सत्तेत यायची कधी संधी मिळाली तर असे पुन्हा वागू नका असा उपरोधिक सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देत सासूचे चार दिवस असले तरी सूनेचे चार दिवस येतात अशी कोपरखळी लगावत सुधीर …

Read More »

अर्थसंकल्प प्रादेशिक असमतोलाचा विरोधी पक्षनेते फडणवीस यांची अर्थसंकल्पावर टीका

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याच्या अर्थसंकल्पावर आज विरोधी पक्षांच्या सदस्यांनी चर्चेला नियम २९३ अन्वये सुरवात केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेला राज्याचा अर्थसंकल्प हा एकांगी तसेच प्रादेशिक असमतोल अर्थसंकल्प आहे. हा संयुक्त महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे का असा प्रश्न उपस्थित करतानाच या संयुक्त महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, …

Read More »

अजित पवारांच्या मनात आजही फडणवीसच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागितली माफी

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर त्यावरील चर्चा सुरु करण्यासंदर्भात आज दुपारी विधानसभेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होती. त्यावेळी अजित पवार यांनी अनावधाने फडणवीस यांचा उल्लेख विरोधी पक्षनेते असा करण्याऐवजी मुख्यमंत्री असा केला. मात्र लगेच आपली चूक …

Read More »

राज ठाकरेंना पडला प्रश्न सततच्या पराभवातून आलेली उद्विग्नता पडली बाहेर

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात स्पष्ट वक्ता, अचूक टायमिंग साधणारा नेता म्हणून मनसे प्रमुख राज ठाकरे यांची ओळख आहे. मात्र गेल्या ९ वर्षापासून राज ठाकरे अर्थात मनसे पक्षाला विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिकांमध्ये सपाटून मार खावा लागत आहे. त्यामुळे या पराभवाबद्दलची उद्विग्नता पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी व्यक्त करत मतदानाच्यावेळी लोक जातात …

Read More »