Tag Archives: dr.shrikant shinde

शिंदे शिवसेनेकडून राज्यातील लोकसभा मतदार संघांच्या संपर्कप्रमुखांच्या नियुक्त्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने कंबर कसली

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पक्षाने राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे. यात मुंबईत सहा लोकसभा मतदार संघ आणि ठाणे लोकसभेची जबाबदारी शिवसेनेचे संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. …

Read More »

डॉ श्रीकांत शिंदे यांचे थेट आव्हान, खुमखुमी असेल तर लोकसभेत आमच्यासमोर या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेनंतर दिले आव्हान

“जर एवढीच खुमखुमी असेल तर पुढील लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा, ठाणे लोकसभा किंवा हवे त्या मतदारसंघातून आमच्यासमोर येऊन निवडणूक लढवावी.” असे थेट आव्हान खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मंत्री गणेश नाईक यांना दिले. गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर अंबरनाथमध्ये माध्यमांशी बोलताना …

Read More »

खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची मागणी, दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करा पाचवी आणि सहावी मार्गिका ‘सीएसएमटी’पर्यंत लवकर कार्यान्वित करा

लोकलमधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमींची खासदार डॉ. शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस …

Read More »

बौद्ध भंतेजींसाठी वर्षा निवासस्थानी चिवरदान, धम्मदान व भोजनदान सोहळा जगाला युद्ध नको बुद्ध हवाय- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

जगात आज अनेक ठिकाणी संघर्ष आणि युद्धाची परिस्थिती असताना जगाला युद्ध नको बुद्ध हवाय, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षावर आज रविवारी वर्षावास या पवित्र महिन्यानिमित्त भंतेजींसाठी चिवरदान, धम्मदान व भोजनदान सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले …

Read More »

शिंदे गटाकडून अखेर डॉ श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांना लोकसभेची उमेदवारी जाहिर

कल्याणचे भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि तेथील स्थानिक शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख यांच्यात एका जमिनीवरून वाद निर्माण झाला आणि त्या वादाचे पर्यावसन थेट पोलिस ठाण्यात गोळीबार झाल्याच्या घटनेत झाले. त्यानंतर हा मतदारसंघ भाजपाकडून पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुत्राला सोडणार का अशी चर्चा सुरु असतानाच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

महेश तपासे यांचा हल्लाबोल, मुख्यमंत्री करू शकले नाहीत स्वतःच्या मुलाच्या नावाची घोषणा

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी भाजप नेते व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केली. यावरूनच दिसून येते की एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपचा किती दबाव आहेत. स्वतःच्या मुलाची आणि स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराची मुख्यमंत्री शिंदे घोषणा करू शकले नाही किंबहुना भारतीय जनता पार्टीने त्यांना …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांच्या चिरंजीवाची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जाहिर

लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यापासून राज्यातील सत्तास्थानी असलेल्या शिवसेना शिंदे गटाला किती जागा, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला किती जागा सोडणार याबाबत प्रसारमाध्यमातून तर्क-वितर्क लढविले जात होते. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एका मतदारसंघात जाहिर करण्यात आलेला उमेदवार बदलण्याची नामुष्की आली. तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्याच मुलाच्या अर्थात डॉ श्रीकांत शिंदे यांना …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर

नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये देशात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच विविध विकासकामाचे दुरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक …

Read More »

सुप्रिया सुळे यांची टीका, रात्रीची ती घटना म्हणजे राजकीय गुंडगिरीचा कळस

मुंबई उपनगरातील उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्यात जमिनीच्या वादातून स्थानिक भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यातच शिंदे गटाचे समर्थक महेश गायकवाड यांच्यासह राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रात्री झालेली घटना म्हणजे राजकिय गुंडगिरीचा …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी

राज्यात सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने सहयोगी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार केल्याची घटना महाराष्ट्रातील पहिलीच असावी. मुंबई उपनगरातील उल्हासनगरमधील हिललाईन पोलिस ठाण्यात पोलिसांसमोरच भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांवर गोळीबार केला. यात महेश गायकवाड आणि त्यांचा साथीदार राहुल पाटील यांची प्रकृत्ती चिंताजनक असल्याची माहिती …

Read More »