“नको नको ते तुम्ही खाल्ले, त्यामुळे तुमचे कंबरडे मोडले. आता हंबरडा मोर्चा काढून काही उपयोग नाही. कंबरडे मोडल्यावर हंबरडा फोडण्यात काही अर्थ नाही,” अशा शब्दांत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. “स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या असतील, तर आपापसातील मतभेद गाडून एकदिलाने कामाला लागा. ‘शिवसेना माझी’ या भावनेने …
Read More »कर्नाटकाच्या विधिमंडळात आरएसएसचे गीत, उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांची माफी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आरएसएसचे गीत
गेल्या आठवड्यात राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चे गीत नमस्ते सदा वत्सले मातृभूमे गाऊन वाद निर्माण करणारे केपीसीसी अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी २६ ऑगस्ट रोजी ‘काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत’ त्यांची माफी मागितली. १९८० पासून काँग्रेस पक्ष आणि गांधी कुटुंबाप्रती …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मिसिंग लिंक प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून मुंबई – पुणे एक्सप्रेस वेच्या मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी
यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. या प्रकल्पतील एक बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असून या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ अर्धा तासाने कमी होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पच्या कामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत …
Read More »अमित शाह यांची घोषणा, सहकारी तत्वावर राष्ट्रीय टॅक्सी चालवणार चालक मालक थेट नफ्यात, नफाही हस्तांतरित करणार, ऑगस्ट महिन्यात त्रिभुवन सहकारी विद्यापीठाचे भूमिपूजन
देशातील पहिल्या त्रिभुवन सहकारी विद्यापीठाचे भूमिपूजन ऑगस्ट महिन्यात केले जाईल. भारत सरकारने या विद्यापीठाच्या स्थापनेसाठी विधेयक मंजूर केले आहे. या कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले की, सहकार तत्वावर राष्ट्रीय टॅक्सीची स्थापन केली जाईल, ज्यामध्ये प्रत्येक चालक टॅक्सीचा मालक असेल आणि नफा थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाईल. लवकरच सहकारी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, ५५ हजार कोटींचा समृद्धी महामार्ग ७० हजार कोटींचा कसा झाला? समृद्धी भ्रष्ट महामार्गाची श्वेतपत्रिका काढा, १५ हजार कोटींचा भ्रष्टाचार उघड होईल
देवेंद्र फडणवीस सरकार समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन करून स्वतःची वाहवा करून घेत आहे परंतु हा महामार्ग भ्रष्टाचाराचे कुरण ठरला आहे. ५५ हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग शेवटी ७० हजार कोटी रुपयांवर गेला. १५ हजार कोटी रुपयांनी प्रकल्पाचा खर्च फुगवला यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे, त्यामुळे सरकारमध्ये नैतिकता शिल्लक असेल …
Read More »आमदार रईस शेख यांची माहिती, पशुवधाच्या तपासणी शुल्कात निम्मी कपात मांस ग्राहकांना निर्णयाचा लाभ होणार असल्याचा आमदार शेख यांचा दावा
‘बकरी ईद’ सणाच्या तोंडावर ‘राज्य गोसेवा आयोगा’ने जनावरांचे बाजार बंद पाडून मुस्लीम धर्मियांच्या ‘कुर्बानी’ची कोंडी केली होती. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कत्तलीसाठी पशु तपासणीच्या दोनशे रुपयांच्या शुल्कात मोठी कपात करत पशुपालक व मुस्लीम समाजाला दिलासा दिला आहे. शुल्क कपातीसाठी समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, घोडबंदर-भाईंदर बोगदा प्रकल्पात ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार राज्यात भ्रष्टाचाराचे मोठे रॅकेट, तब्बल १ लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा संशय, सर्व मोठ्या प्रकल्पांची न्यायालयीन चौकशी करा
नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, या प्रकल्पातून दुसऱ्या निविदाधारकाचे टेंडर तांत्रिक बाबीचे कारण देत रद्द केले, या कामाचे टेंडर ज्या कंपनीला दिले ती मेघा इंन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कोणाची आहे? यामागे काय गौडबंगाल होते? हे आता सर्वांसमोर आले आहे. एमएमआरडीएने आता टेंडर रद्द केल्याने हा …
Read More »मुंबई मेट्रोचा प्रवास सुसाट; बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्गाचे लोकार्पण मेट्रो तीनच्या अंतिम मार्गाचे ऑगस्टमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 मार्गिकेवरील टप्पा 2 अ बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानका दरम्यानच्या (९.७७ किमी) सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मेट्रो तीनच्या आचार्य अत्रे चौक ते कुलाबा या मार्गावरील अंतिम टप्प्याचा शुभारंभ येत्या ऑगस्ट महिन्यात प्रधानमंत्री …
Read More »अजित पवार म्हणाले, जयंतराव ऊसाचं टनेज वाढलं की नाही… पण तुमचा… संबध नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस आणि अजित पवार यांच्यातही मिश्कील संवाद
राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सध्या राज्यात सुरु आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावरील चर्चेला आज अर्थमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यावेळी सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ही उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार हे सातत्याने जयंतराव पाटील यांना …
Read More »बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद सोमवारी पुण्यात पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती
राज्यातील बाजार समित्यांच्या विविध विषयांसंदर्भात संवाद साधण्यासाठी सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी पुणे येथे बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पणन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी दिली. या परिषदेत राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक व सचिव सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र …
Read More »
Marathi e-Batmya