Breaking News

Tag Archives: eknath shinde

आदित्य ठाकरे यांचा सवाल, मुंबईतल्या प्रकल्पासाठी चेन्नईत का मुलाखती? सात वर्षे एमएसआरडीसीचे मंत्री असलेल्यांनी उत्तर द्यावे

वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क प्रकल्पासारखे मोठे प्रकल्प परराज्यात गेल्याची माहिती समोर आणल्यानंतर आता शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला. मुंबईतील वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी नोकर भरतीसाठीच्या मुलाखती चेन्नईमध्ये होणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आणली. लोकांच्या हिताचं काम करणाऱ्या मविआ सरकारला पाडून आलेल्या या …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांच्या ‘त्या’ वक्तव्याने संभ्रम, शिवसेनेत आहे की नाही? जळगांवच्या सभेत बोलताना शिवसेनेत असताना असा शब्द प्रयोग केल्याने संभ्रम

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित वेगळी चूल मांडणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांनाही सोबत नेले. बंडाचे निशाण फडकाविल्यापासून एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या ४० आमदारांकडून शिवसेना आमचीच खरी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आज एकनाथ शिंदे यांनीच जळगांव येथील जाहिर सभेत बोलताना पाणी …

Read More »

अजित पवार यांचे आव्हान, ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाऊ द्या देशात चित्ते आले ठिक आहे परंतु यातून लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का?

तुमच्या – माझ्या देशात व महाराष्ट्रात जे महागाईचे, बेरोजगारीचे व कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत त्यांना व्यवस्थितपणे बाजूला ठेवून तिसरेच प्रश्न पुढे आणले जातात. आता देशात चित्ते आले ठिक आहे. ते वाढावेत, पशूधन वाढावे हे ही ठीक आहे. परंतु यातून लोकांच्या रोजी-रोटीचा प्रश्न सुटणार आहे का? वेदांताचे काय होणार आहे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे मराठी कलाकारांसोबत, ‘मला तुमचं ऐकायचंय…आता एकमेकांशी बोलुया’

‘आपली संस्कृती, कला जोपासलीच पाहिजे. ती आपली जबाबदारी आहे. त्यामुळे मराठी नाट्य, चित्रपट आणि कला क्षेत्राला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,’अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी ‘मला तुमचं ऐकायचंय…! आपण एकमेकांबद्दल बोलत असतो. आता एकमेकांशी बोलुया.., असं म्हणत …

Read More »

तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाची शिंदेंकडून कॉपी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा कार्यगट स्थापन

केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कार्यगटात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण, शालेय शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्ये, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय, कौशल्य विकास व उद्योजकता या खात्यांचे मंत्री यांचा समावेश केला होता. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांच्या ‘या’ आश्वासनानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबद्दल शासन सकारात्मक असून जनतेला दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि अखंडित सेवा पुरविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर २७ सप्टेंबर रोजी पुकारलेले ‘लक्षवेध दिन’ आंदोलन मागे घेत असल्याचे महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाने जाहीर केले आहे. महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी- कर्मचारी महासंघाच्या विविध मागण्यांसंदर्भात …

Read More »

कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेनी दिली ‘ही’ माहिती प्रकल्पाचे सुमारे ६२ टक्के काम पूर्ण; २०२३ अखेर प्रकल्प पूर्ण होईल

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) अर्थात मुंबई कोस्टल रोडचे सुमारे ६२ टक्के काम पूर्ण झाले असून पुढील वर्षाअखेरीस हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. मुंबई कोस्टल रोडच्या प्रगतिपथावर असलेल्या कामाची पाहणी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री …

Read More »

अंबादास दानवे यांचा निशाणा, “शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र” ही मुख्यमंत्र्यांची घोषणा…

राज्यात शेतकऱ्यांच्या मोठया प्रमाणात आत्महत्या होत आहेत ही विघातक परिस्थिती आहे. राज्याला “शेतकरी आत्महत्यामुक्त करु” हे मुख्यमंत्र्यांनी दिलेले अभिवचन घोषणेत विरले अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. विदर्भ दौऱ्यावर असताना आज यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीनंतर ते प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. अतिवृष्टीमुळे …

Read More »

भाजपाचा दावा, ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हीच नंबर वन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी भाजपा – शिवसेना युतीला स्पष्ट कौल दिला असून ५८१ पैकी २९९ ग्रामपंचायतींमध्ये युतीचे सरपंच निवडून आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जनतेने या निकालाद्वारे विश्वास व्यक्त केला असून आपण दोन्ही नेत्यांचे अभिनंदन करतो, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी …

Read More »

साखर उत्पादनात महाराष्ट्र ठरला जगात तिसरा

राज्याचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषीमंत्री अब्दुल …

Read More »