Breaking News

Tag Archives: eknath shinde

मुख्यमंत्री शिंदेच्या भेटीनंतर शिंदे गट म्हणतो ते आमच्याकडे, तर खोतकर म्हणाले… मी अद्याप तसा निर्णय घेतलेला नाही

एकेकाळी उध्दव ठाकरे यांच्या जवळचे आणि विश्वासू म्हणून ओळखले जाणारे जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी आज सोमवारी २५ जुलै रोजी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे गटाकडून अर्जून खोतकर यांनी पाठिंबा जाहिर केल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसऱ्याबाजूला अर्जून खोतकर यांनी अद्याप मी तसा कोणताही निर्णय …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा बंडखोरांवर निशाणा, तुम्हाला माझे वडीलही चोरायचेत आणि पक्षही… एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरांवर केली टीका

शिवसेनेतील फुटीनंतर आता शिवसेना नेमकी कोणाची यावरून बंडखोर गटाचे मुख्यंत्री एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्यातील संघर्ष आता चांगलाच सुरु झालेला आहे. त्यातच निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या दोन्ही गटांना ८ ऑगस्टपर्यत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले. यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बंडखोर एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधत म्हणाले, तुम्हाला माझे …

Read More »

नाशिक-मालेगावच्या नगरसेवकांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेत व्यक्त केला ‘हा’ निर्धार ४० नगरसेवक उध्दव ठाकरे यांच्यासोबतच राहणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेच्या विरोधात बंड करत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकल्यानंतर अनेक आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात जात आहेत. मात्र नाशिक आणि मालेगांव येथील नगरसेवकांनी मात्र शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेत आज मातोश्री येथील निवासस्थानी ठाकरे …

Read More »

अक्कलकोट-मैंदर्गी मार्गावर एसटी अपघात; मुख्यमंत्री शिंदेंनी दखल घेत दिले ‘हे’ निर्देश ३५ प्रवासी जखमी, जखमींना ५० हजाराची मदत जाहीर

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातून पुण्याला येणाऱ्या राज्याच्या एसटी बसचा अपघात होवून १३ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना ताजी असतानाच आज सोलापूर जिल्ह्यात आणखी एक एसटी बसला अपघात झाला. मात्र सुर्देवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र ३५ प्रवासी जखमी झाले. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट-मैंदर्गी मार्गावर गाणगापूर येथील एसटी बसला …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा: २ वर्षात मुंबई होणार रस्ते खड्डेमुक्त, सिमेंटचे रस्ते सध्या २३६ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु तर ४०० किलोमीटरची कामे प्रस्तावित

मुंबई महानगरात चांगल्या प्रतीचे रस्ते बांधण्यासाठी होत असलेली कामे आणि रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करून होत असलेल्या सुधारीत रस्त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आढावा घेतला. जोरदार पावसामुळे रस्त्यांवर झालेले खड्डे लवकरात लवकर भरून काढून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला केल्या. मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाला …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, हिंदुत्व विचारासाठी सत्ता परिवर्तन, पण… भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत प्रतिपादन

हिंदुत्व विचाराच्या रक्षणासाठी राज्यात सत्ता परिवर्तन झाले असून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार भाजपा बरोबर आले आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पनवेल येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोप प्रसंगी करत ते पुढे म्हणाले, जरी सरकार राज्यात आलेले असले तरी सर्वांच्याच अपेक्षा पूर्ण होतील असे नाही. अनेकांना …

Read More »

महेश तपासे यांचा टोला, भाजपा हा मोठा दगड कधी दुसर्‍याच्या गळयात बांधून… चंद्रकांत पाटील यांना शिंदे सरकार असंविधानिक आहे हे माहीत आहे

शिंदेसरकार बेकायदेशीर आणि असंविधानिक पद्धतीने तयार झाले आहे असे लोकांची धारणा असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हे सरकार चालणार नाही म्हणूनच भाजपाने आपल्या मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले आहे व येणाऱ्या काळात भाजपा आपल्या मनावर ठेवलेला हा मोठा दगड कधी दुसर्‍याच्या गळयात बांधून कुणाला बुडवेल? हे लवकरच …

Read More »

भाजपाच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत मंजूर केले ‘हे’ ठराव भाजपा प्रदेश कार्यसमिती बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाच्या विचारांचा वारसा घेऊन युतीतून जन्माला आलेल्या सरकारचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्ष कार्यकर्त्यांना त्यागाचा आदर्श घालून देणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आजच्या भाजपाच्या प्रदेश भाजपा कार्यसमितीत मंजूर करण्यात आल्याची माहिती भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी दिली. प्रदेश कार्यसमिती बैठक …

Read More »

शरद पवार यांचा भाजपाला खोचक टोला, त्यांनी दगड मनावर ठेवावा की डोक्यावर… चंद्रकांत पाटील यांच्यावर वक्तव्यावरून लगावला टोला

मागील महिनाभरापासून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाचे समर्थन भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने समर्थन करण्यात येत आहे. मात्र फडणवीस हे समर्थन करत असले तरी त्यांच्याच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्यातील खदखदीला वाट मोकळी करून देत म्हणाले की, मनावर दगड ठेवत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले …

Read More »

चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली खदखद, एकनाथ शिंदे यांना मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री… वक्तव्यानंतर भाजपाकडून सारवा सारव

शिवसेनेत बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री पदावर शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे एकप्रकारची खदखद भाजपामध्ये निर्माण झाली. या खदखदीला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच वाट मोकळी करून देत म्हणाले, मनावर दगड …

Read More »