इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्तींची संख्या दहा वरून पन्नास करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. २०२२-२३ या चालू वर्षापासून त्याचा लाभ मिळेल. …
Read More »ठाकरेंच्या याचिकांवर निर्णय घेण्याआधी सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला दिलासा देत दिला निकाल
राज्यातील सत्तासंघर्षावरील शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या गटाने दाखल केलेल्या एकाही याचिकेवर निर्णय देण्याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने मागील सुनावणीवेळी एकनाथ शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज दिवसभर सुनावणी घेत शिंदे गटाला दिलासा देणारा निर्णय दिला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उध्दव ठाकरे गटाकडून शिंदे यांच्यासह १६ जणांच्या अपात्रतेसह जवळपास चार याचिका …
Read More »न्यायालयात सुनावणी सुरु असताना उध्दव ठाकरे म्हणाले, कितीही अफजलखान आले तरी… ज्यांच्यासाठी खस्ता खाल्या ते खोक्यात गेले
राज्यातील शिवसेना कोणाची यावर आज सर्वोच्च न्यायालयात सकाळपासून सुनावणी सुरु आहे. उध्दव ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यावर पुढील सुनावणी घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर एकनाथ शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेचा याचिकांवर निकाल द्यावा मात्र शिवसेनेबाबतची सुनावणी निवडणूक आयोगाने घ्यायला परवानगी द्यावी यावरून मागणी …
Read More »उध्दव ठाकरे यांना मोठा धक्का बाळासाहेबांचे विश्वासू सेवेकरी थापा एकनाथ शिंदे गटात शिंदे गटात गेल्यानंतर थापा म्हणाले, प्रत्येकाची विचारधारा वेगळी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सेवेकरी म्हणून ओळखले जाणारे चम्पासिंग थापा यांनीही उध्दव ठाकरे यांची साथ सोडत आज सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठींबा दिला. एकेकाळी मातोश्रीमधील एक सदस्य म्हणून ओळख असलेल्या थापा यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या असुन, उद्धव ठाकरेंसाठी हा …
Read More »देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मुनगंटीवार, सामंत यांचा गुजरात दौरा गुजरातच्या सि.एम. डॅशबोर्ड चा अभ्यास करण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात अहमदाबाद दौरा
राज्यात स्थानापन्न झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा कारभार प्रत्यक्ष कोण चालवतो यावरून सातत्याने विरोधकांकडून आरोप करण्यात येतात. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याऐवजी राज्याचा गाडा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच चालवित असल्याचा आरोपही करण्यात येतात. आता या आरोपांना पुष्टी देणारी एक घटना नुकतीच पुढे आली आहे. राज्याचे वनमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी …
Read More »नाना पटोले म्हणाले, सावंतांच्या विधानावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा मराठा समाजावर गरळ ओकणाऱ्या सावंतांची तात्काळ हकालपट्टी करा
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील सर्वच पक्ष प्रयत्न करत असताना शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठ्यांना ‘आरक्षणाची खाज’ सुटली आहे, असे अत्यंत आक्षेपार्ह व बेजबाबदार विधान केले आहे. तानाजी सावंत यांचे हे विधान मराठा समाजाची बदनामी करणारे व त्यांचा अपमान करणारे असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या निधीत वाढ
समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार आहे. माथाडी कामगाराच्या घरांचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मराठा समाजात नव उद्योजक तयार व्हावेत यासाठी स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. माजी …
Read More »नवे पालकमंत्री जाहीर: मात्र बहुतांश जिल्हे भाजपा मंत्र्यांकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा
राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पार पडल्यानंतर आणि अधिवेशन काळात नैसर्गिक संकट असल्याने पालकमंत्री नेमा अशी मागणी सातत्याने विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारकडे करण्यात येत होती. मात्र आता नैसर्गिक संकट काही प्रमाणात ओसरले असले तरी अद्यापही काही ठिकाणी पावसाची हजेरी आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर आज उशीराने का होईना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची नियुक्त्या …
Read More »पुण्यातील त्या घोषणेवरून मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा, असले नारे खपवून घेणार नाही.. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, त्यांना सोडणार नाही
पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. या घटनेची दखल राज्य सरकार व गृहविभागाने गांभीर्याने घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “ज्यांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या त्यांना सोडणार नाही,” असं म्हणत गंभीर इशारा दिला आहे. तर, आता या गंभीर …
Read More »आदित्य ठाकरे म्हणाले, आम्हाला गाजरं, चॉकलेट नको…मुख्यमंत्री फक्त स्वत:साठी दिल्लीत प्रकल्पाची कोणतीच माहिती मुख्यमंत्र्यांना नाही
मागील काही दिवसांपासून वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यापाठोपाठ बल्क ड्रग पार्क आणि मेडिकल डिव्हाईस प्रकल्प एकामागो एक महाराष्ट्रातून गेले. तसेच मुंबईतल्या वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी लागणाऱ्या अभियंत्याच्या मुलाखती महाराष्ट्राऐवजी चेन्नईत घेण्यात येत असल्यावरून युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर आज आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तळेगांव …
Read More »
Marathi e-Batmya