राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी सोहळा आज पार पडत आहे. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह अन्य केंद्रातील मंत्री उपस्थित राहणार आहेत. मात्र २०१४ साली पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पार्ट वन असल्याचे सांगण्यात येत होते. त्यावेळी त्या …
Read More »महायुतीत “सब कुछ (ठिक) ठाक है” एकनाथ शिंदे यांच्या सहभागाबाबत अनिश्चितता कायम देवेंद्र फडणवीस यांची विनंतीः गाडी अडली गृहमंत्री पदासाठी
राज्यात संशयातीत बहुमत मिळविल्यानंतरही मंत्री पदाच्या वाटपावरून महायुतीत सारेच काही आलबेल नसल्याचे चर्चा सुरु झाली आहे. महायुती सरकारने रितसर सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर उद्या संध्याकाळी ५.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महायुतीच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी पार पडणार आहे. मात्र राज्याचे विद्यमान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र सरकारमध्ये …
Read More »सत्ता स्थापनेच्या निमंत्रणानंतर महायुतीच्या नेत्यांचे पत्रकार परिषदेत एकमेकांना चिमटे अजित पवारांचा एकनाथ शिंदे यांना चिमटा तर एकनाथ शिंदे यांचा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना धक्का
राज्यात सत्ता स्थापनेचा दावा महायुतीच्या नेत्यांनी केल्यानंतर अखेर राज्यात महायुतीचे सरकार स्थानापन्न होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर महायुतीच्या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेत एकमेकांना चिमटे आणि धक्के दिले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदी राहिलेले एकनाथ शिंदे हे उद्याच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे …
Read More »अखेर महायुतीने दुपारी ३ वाजता राज्यपालांकडे जात केला सत्ता स्थापनेचा दावा महायुतीच्या दाव्यानंतर राज्यपालांकडून सत्ता स्थापनेचे निमंत्रण
राज्यातील संशयातीत बहुमतानंतर महायुतीतील सहभागी पक्ष असलेल्या काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा शिवसेना पक्ष, अजित पवार आणि त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्यावतीने देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी दुपारी ३ वाजता राजभवनावर जात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा नेमका कोणाला टोला, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे अडीच वर्षात कोणी सोडून गेलं नाही- जनतेचा कौल हिसकावून घेण्यात आला
राज्यातील महायुतीला संशयातीत बहुमत मिळविल्यानंतरही मुख्यमंत्री पदाचा घोळ तब्बल १० दिवस सुरु राहिला. त्यानंतर आज विधानसभेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाच्या विधिमंडळाच्या गटनेते पदी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये आयोजित या बैठकीला भाजपाचे केंद्रीय निरिक्षक गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी आणि केंद्रीय अर्थमंत्री …
Read More »शेवटी देवेंद्र फडणवीस पोहचले एकनाथ शिंदे यांच्या दरबारात भेट टाळण्याच्या नादात अखेर देवेंद्र फडणवीसच पोहोचले वर्षा निवासस्थानी
सत्ता स्थापनेच्या वाटाघाटी म्हणाव्या तशा जमल्यानसल्याने काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांना भेटण्याचे मागील सहा दिवसांपासून टाळत होते. परंतु आता राज्यातील सत्ता स्थापनेला काही तासांचा अवधी शिल्लक राहिलेला असताना अखेर भाजपाचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी भेटीसाठी यावे लागल्याचे आज दिसून …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची शेवटची घोषणा, महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला मुंबईत सुटी देशभरातून येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमी येथे येतात. त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुटी जाहिर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी …
Read More »काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांची हॉस्पीटलमध्ये तपासणी नंतर वर्षावर पोहोचले पांढऱ्या पेशी कमी- जास्त होत असल्याचे आणि लो बीपी, ताप आदींचा त्रास
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागील काही दिवसांपासून प्रकृती अवस्थामुळे घरी आराम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना सातत्याने ताप येणे, त्यांच्या रक्तातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण कमी-अधिक प्रमाणात होणे, कमी रक्तदाबाचा त्रास आदी तब्येतीच्या तक्रारीमुळे त्रस्त असल्याची माहिती पुढे येत आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …
Read More »उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चेवर खासदार श्रीकांत शिंदे यांची स्पष्टोक्ती, केंद्रात संधी… सत्तेतल्या पदाची लालसा नाही
राज्यातील महायुती सरकारच्या सत्ता स्थापनेच्या तयारी भाजपाकडून करण्यात येत असताना आणि सत्तेत कोण कोण विराजमान होणार याबाबत सर्वच प्रसारमाध्यमांकडून सूत्रांच्या हवाल्याने भाजपामधील अनेक आमदार आणि नेत्यांची नावे जाहिर केली. त्यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे या गावी गेल्यानंतर उपमुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र डॉ श्रीकांत शिंदे …
Read More »भाजपा तयारीत, शिंदे आरामात तर अजित पवार दिल्लीला शपथविधीवरून अद्यापही राजकिय परिस्थितीत तणाव
राज्यातील संशयातीत बहुमत मिळविलेल्या महायुतीकडून निकाल जाहिर झाल्यानंतर १० दिवस झाले तरी राज्यातील सत्ता स्थापनेबाबत अद्याप दावा केला नाही. त्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ५ डिसेंबला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नव्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होणार असल्याचे जाहिर केले. मात्र प्रत्यक्षात अद्यापही भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेत मुख्यमंत्री …
Read More »
Marathi e-Batmya